असशी तरी कुठे तू?

Submitted by निखिल मोडक on 22 October, 2021 - 14:15

असशी तरी कुठे तू? येथेच ये उशाशी
तू नसता सांग जवळी बोलू तरी कुणाशी?

आभाळ तेच आहे त्या कालच्याच तारा
तू नसता मात्र जवळी त्या भासतील गारा

कलता करून पडदा आडून वात पाहे
तुज पाहिले न जवळी तो फिरुनी न वाहे

समयीची ज्योत शांत मान उंचावून पाही
तू न दिसता कुठेशी खोल घुसमटून जाई

ही शेज तीच आहे रात्र कालच्यापरी आज
नसे श्वासांची अंगाई येई न आज नीज

येई सखे निघोनी असे प्राणांशीच गाठ
असल्यास तू न जवळी ते सोडतील साथ

©निखिल मोडक

Group content visibility: 
Public - accessible to all site users