शतायुषी व्हायचे आहे काय?

Submitted by SureshShinde on 13 October, 2021 - 12:59

जपान मध्ये एक छोटसं बेट आहे त्याचं नाव आहे, ओकिनावा. या बेटाचे वैशिष्ट्य असे आहे की येथील सर्व माणसे शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात. संपूर्ण जपान मध्ये शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या दर एक लाखांमध्ये 65 आहे अनेक प्रगतीशील देशांमध्ये ही संख्या 30 पर्यंत आहे तर आपल्या देशामध्ये ही संख्या फक्त तीनच आहे. दीर्घायुषी होणे म्हणजे एका अडचणींची शर्यतच आहे जणू!
मी लहान असताना एक गरीब बाई आमच्या घरी खेळणी विकण्यासाठी येत असे माझ्याकडे बघून ती माझ्या आईला म्हणत असे की बाई तुझा लेक म्हातारा होईल. मला त्या बाईचा खूप राग येत असे पण आता मला समजते की म्हातारा होणं खूप कठीण आहे, त्याला आशीर्वादाची गरज आहे. आपल्या देशामध्ये साथीचे रोग, आरोग्याविषयी अज्ञान, गरिबी आणि अशा अनेक कारणांमुळे आयुर्मर्यादा कमी आहे.
मृत्यू म्हणजे काय, तो का आणि केव्हा, याची थोडी ओळख आपण करून घेतली पाहिजे. अनैसर्गिक मृत्यू ची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाची आहेत, साथीचे आजार, संसर्गजन्य रोग आणि जीवनशैलीचे आजार. या कारणांमुळे अनैसर्गिक मृत्यू ओढवू शकतो.

वृद्धत्व आणि दीर्घायुष्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्ती लवकर वृद्ध होतात तर काही व्यक्ती नव्वदी नंतर देखील अतिशय उत्तम आरोग्यपूर्ण जीवन जगताना दिसतात. खरोखर काय असेल बरं या दीर्घायुष्याचे रहस्य? मानवाला अनादिकालापासून हे दीर्घायुष्याचे रहस्य सोडवण्याची उत्सुकता असलेले आपणास दिसते. शास्त्रज्ञांनी असे प्रयोग प्राण्यावर अथवा कीटकांवर करून पाहिले आहेत. कीटकांवर करून पाहिले आहेत. मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करत असताना पांढऱ्या उंदरांचा अभ्यास करून खूप मोठी माहिती मिळते. अशाच एका प्रयोगातून असं दिसलं की ज्या उंदरांना कमी जेवण दिलं गेलं, थोडसं उपाशी ठेवले गेलं असे उंदीर त्यांना पोटभर जेवण मिळालं अशा लठ्ठ उंदरांपेक्षा 50% जास्त जगले.
अशी एक म्हण आहे की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुमच्या आयुष्यभराचे खाद्य तुमच्या पाठीवर घेऊन येता, जर तुम्ही लवकर लवकर खाल्ले तर हे अन्न लवकर संपून जाते. म्हणजेच आयुष्यमान कमी होते. म्हणून पूर्वजांनी कमी खा असा सल्लाच आपल्याला दिलेला आहे. याला काही शास्त्रीय पुरावा आहे काय हे समजण्यासाठी आपल्याला शरीरशास्त्रविषयी थोडीशी माहिती असणे आवश्यक आहे. आपला देह हा एका पेशीतून जन्माला येऊन 30 दशलक्ष दशलक्ष इतक्या पेशींचा बनला आहे. या प्रत्येक पेशीला जगण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा ग्लुकोज नावाच्या साखरेपासून मिळते. ग्लुकोज आणि हवेतील प्राणवायू यांचा संयोग होऊन कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाणी तयार होते व ऊर्जा निर्माण होते. श्वासाबरोबर शरीरात जाणारा प्राणवायू प्रत्येक पेशी पर्यंत पोचतो आणि त्याचे ग्लुकोज बरोबर संक्रमण होते. ज्या व्यक्तींना काही आनुवंशिक आजार नाही अशा व्यक्ती शंभरच काय परंतु 150 वर्षांपर्यंत जगू शकतील अशी रचना निसर्गाने केली आहे. परंतु काही कारणामुळे म्हणजेच ज्याला आपण आजार म्हणतो अशा कारणांमुळे ही आयुर्मर्यादा अवेळीच संपुष्टात येते. असे आजार मुख्यत्वेकरून दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे संसर्गजन्य आजार सध्या चालू असलेल्या करोना या साथीमुळे कितीतरी व्यक्ती प्राणास मुकले आहेत / मुकल्या आहेत. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये नवनवीन संशोधन झाल्यामुळे बरेचसे साथीचे आजार आटोक्यात आले आहेत. परंतु त्याच बरोबर आहार विषयक आजार मात्र वाढले आहेत. एका बाजूला कुपोषण तर दुसऱ्या बाजूला अतिपोषण, अशी दोन्ही भिन्न चित्रे आपल्याला दिसतात. अति आहाराचे मुख्य कारण कारणे म्हणजे आहाराची मुबलक उपलब्धता, वैविध्य, तसेच आकर्षक जाहिराती आणि आरोग्यविषयक सामान्य ज्ञानाचा अभाव अशी असून, अशा अनेक कारणांमुळे स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सर यासारखे जीवनशैली मुळे होणारे आजार बळावलेले आहेत. साथीच्या आधारावर पेक्षाही भयानक प्रमाणामध्ये वाढले आहेत. विनोदाने असे म्हणतात की धूम्रपान करणारी व्यक्ती कधी म्हातारी होत नाही. यातला लपलेला अर्थ असा की धूम्रपानामुळे अकाली मृत्यु होतो. सध्याचा जीवन संघर्ष इतका बिकट झाला आहे की वयाची शंभरी गाठणे खूप कठीण झाले आहे.

आपण जो आहार घेतो तो बऱ्याच प्रमाणात वनस्पतिजन्य असतो. वनस्पती सूर्याच्या ऊर्जेचा आणि मानवी उत्सर्जित कार्बन डाय-ऑक्साइड, युरिया इत्यादींचा वापर करून अन्न तयार करतात. हे अन्न खाल्ल्यामुळे सूर्यापासून मिळालेली ऊर्जाच आपण एक प्रकारे वापरत असतो. म्हणजेच सूर्य हा आपल्या जीवनाचा मूळ स्त्रोत आहे. म्हणूनच आपले पूर्वज सूर्याची उपासना करताना दिसतात, असो. तेव्हा दीर्घायुषी होण्यासाठी काय करायला हवे याचा थोडक्यात आढावा घेऊ या.
सध्या मानवाची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती यावर बरीच चर्चा चालू आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आहार. आपली दैनंदिन गरज किती आहे यावर आपला आहार अवलंबून असला पाहिजे. म्हणजे आहाराचे प्रमाण या पेक्षा जास्त नसावे. वयोमानाप्रमाणे आहार बदलला पाहिजे. वाढत्या वयामध्ये तीन वेळा जेवण, मध्यम वयामध्ये दोन वेळा जेवण आणि उतार वयामध्ये केवळ एक वेळा जेवण घेणे संयुक्तिक ठरते. अर्थात आपल्या दैनंदिन जीवनशैली प्रमाणे यात बदल होऊ शकतो.
अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त जेवणे हेच असते, असे अनेक वेळा लक्षात येत असते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही ऊक्ती लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
वाढणारे वजन आणि पोटाचा घेरा या दोन गोष्टी याबाबत मार्गदर्शक ठराव्यात. मिताहार अंगीकारताना आहारामध्ये काय घटक आहेत याचाही विचार करणे आवश्यक आहे. आहार समतोल असणे, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या यांचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश असणे, आहारामध्ये तेल, तूप यासारखे स्निग्ध पदार्थ, तसेच दुधापासून बनणारे पदार्थ व मैद्या पासून बनणारे पदार्थ यांचा अतिरेक नसावा. माफक प्रमाणामध्ये मांसाहार करण्यासही हरकत नाही. परंतु आहारामध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे. त्याच बरोबर व्यसनाधीनता हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तंबाखू, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. म्हणजे सारासार बुद्धीचा विचार करून मोह टाळणं आवश्यक आहे. यासाठी आरोग्यविषयक वाचन करणे, मित्रांबरोबर चर्चा करणे आवश्यक आहे.

आपल्या शरीरातील अस्थी आणि स्नायू हे लवकर वृद्ध होऊ नयेत म्हणून त्यांना नियमितपणे व्यायाम करण्याची आवश्यकता विसरून चालणार नाही. आपल्या हृदयाची गती व्यायाम केल्यामुळे आपल्या वयोमानाप्रमाणे वाढवली असता हृदयाची क्षमता वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच नियमितपणे माफक प्रमाणात का होईना परंतु व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने रोज थोडा वेळ तरी व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे.
आपल्या जीवनामध्ये प्राणवायूचे महत्त्व असामान्य आहे.. हवेतील प्राणवायू प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी श्वासाचे व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहे आहेत. आपण नेहमी सामान्यतः आपल्या फुप्फुसांची केवळ 15 ते 20 टक्के क्षमता वापरत असतो. आपला श्वासोच्छ्वास आपल्या नकळत, श्वासपटल नावाच्या स्नायूंमुळे होत असतो. या स्नायूंना बळकट करणे महत्त्वाचे आहे. उत्तम श्वासोश्वास करण्यास शिकणे ही देखील एक कला आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. भारतीय संस्कृतीमधील प्राणायामाची संकल्पना हीच कला शिकवते. अर्थात ही कला जाणकारांच्या मार्गदर्शनाखालीच आत्मसात केली पाहिजे. म्हणून जर आपणास दीर्घायुषी व्हायचे असेल, अधिक काळ तरुण राहायचे असेल, जीवनशैलीचे आजार टाळायचे असतील आणि जीवनाचा आनंद भरपूर काळ उपभोगण्याचा असेल तर मिताहार, व्यायाम, प्राणायाम व सदाचार यांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.
मित्रहो, तर आजच करूया निश्चय निरोगी होण्याचा, तरुण राहण्याचा, वृद्धत्त्वावर मात करण्याचा आणि दीर्घायुषी आणि शतायुषी होण्याचा ! आपल्या आयुष्यासाठी आपणास अनेक शुभेच्छा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलो, डॉक्टरसाहेब - लाँग टाइम नो सी...

लेख आवडला. समयोचित म्हणता येईल, कारण "संध्याछाया भिवविती हृदया..." ची फेज सगळ्यांच्या आयुष्यात कधिना कधितरी येणारंच आहे.

विषय तसा ड्राय आहे, तरिहि आयॅम मिसिंग योर युज्वल स्टायल... Wink

थोडक्यात -कमी खा.(पोर्शन कंट्रोल)सगळ्यांना समजत असते पण डॉक्टर सांगतात तेव्हा त्याचं महत्व पटतं. छान लेख.

शतायुषी व्हायचे आहे काय? >>>> छे ! अजिबात नाही. मस्त मजेत सुखात आयुष्य चालु आहे. असच निरोगी आणि तरुण असताना टाटा बाय बाय करायला आवडेल. पूर्वीच्या काळातील 60-65, फारच फार तर 70 वर्षांचं आयुष्य मला बस्स. म्हातारं शरीर घेऊन 100 वर्षे अजिबात जगायचं नाहीए. Wink

वेलकम बॅक सर Happy

@ मीरा,
असच निरोगी आणि तरुण असताना टाटा बाय बाय करायला आवडेल. पूर्वीच्या काळातील 60-65, फारच फार तर 70 वर्षांचं आयुष्य मला बस्स. म्हातारं शरीर घेऊन 100 वर्षे अजिबात जगायचं नाहीए. Wink
>>>>
जर निरोगी असाल तर ६०-६५ ला कसे मराल? अनैसर्गिक मृत्यु यावा लागेल त्यासाठी..
दीर्घायुष्य म्हणजे आजारपणाने बेडवरच झोपून काढलेले आयुष्य असे गरजेचे नाही. निरोगीपणामुळे दीर्घायुष्य मिळेल ते सुद्धा निरोगी असेलच.

छे ! अजिबात नाही. मस्त मजेत सुखात आयुष्य चालु आहे. असच निरोगी आणि तरुण असताना टाटा बाय बाय करायला आवडेल. >> +१

निरोगीपणामुळे दीर्घायुष्य मिळेल ते सुद्धा निरोगी असेलच. >> निव्वळ दीर्घायुष्य महत्त्वाचे नाही, निरोगीपण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे निरोगी असताना आयुष्य संपणे, जास्त आनंदाचे आहे. (माझ्यासाठी तरी). अगदी आज-उद्या आयुष्य संपले तरी हरकत नाही, मी तृप्त आहे.
Death will arrive later than I think, but certainly sooner than I desire.

चांगला लेख पण माहिती एकदम प्राथमिक स्वरूपाचीच आहे. व मदर हूड स्टेटमेंट खूप केलेली आहेत.

प्रोसेस्ड फूड शक्य तितके कमी खाणे. भारतीय मिठाया व तळीव स्नॅक्स न खाणे. व्यसने न करणे आणी अ‍ॅक्टिव्ह जीवन शैली. हे महत्वाचे आहे.

अजून एक म्हणजे एखादा आजार झालाच तरी हात पाय गाळा यचे नाहीत. भावनिक पद्धतीने विचार न करता आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्या नव्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्या शोधायच्या व आपल्या ला परवडतील अश्या पद्धतीने उपचार गोळ्या औषधे थेरपी, सर्जरी हे करून घ्यायचे. शरीराला रिकव्हर व्हायला मदत करायची. को मोर्बिड्टीज नीट मॅनेज करून क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करत आपली स्वप्ने पूर्ण करत राहायचे.
इट इज ऑल पॉसिबल. जीवेत शरदःशतम.

उपाशी बोका,
जे लोकं ६० व्या वर्षी नैसर्गिक मृत्यु येत मरतात ते मरतेवेळी निरोगी असतात आणि जे ८० व्या वर्षी नैसर्गिक मृत्यु येऊन मरतात ते कुंथत कुंथत ६० ते ८० जगलेले असतात असा गैरसमज वर आढळला.
जे ६० व्या वर्षीच नैसर्गीकरीत्या मरतात याचा अर्थ शरीराची अशी हेळसांड झालेली असते की ५० व्या वर्षीच सत्तरीसारखे वृद्धत्व आले असते.

असा गैरसमज वर आढळला. >> कुठे?

जे ६० व्या वर्षीच नैसर्गीकरीत्या मरतात याचा अर्थ शरीराची अशी हेळसांड झालेली असते की ५० व्या वर्षीच सत्तरीसारखे वृद्धत्व आले असते. >> नेहमी नाही. पॅन्क्रिअ‍ॅटिक कॅन्सरबद्दल ऐकले आहे कधी?

@मीरा.. सहमत आहे.पण त्याची अंमलबजावणी स्वेच्छामरण खर्‍या अर्थाने कायदेशीर झाले तर किमान पर्याय तरी उपलब्ध होईल. लोक तो पर्याय स्वीकारतील नाकारतील हा भाग अलहिदा!

नमस्कार!
माझ्या सर्व मायबोलीकर प्रतिसाद्कर्त्या मित्रांचे मनःपूर्वक आभार. प्रस्तुत लेख आणि यापूर्वीचा स्थूलतेविषयीचा लेख, हे दोन्ही लेख दै. सकाळ मधील 'फॅमिली डॉक्टर' या सदरामध्ये प्रकाशित झाले होते. सोळा लाख वाचकांपर्यंत पोहोंचणारा 'सकाळ' आणि त्याचा वाचकवर्ग हा मायबोलीच्या वाचकांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. त्यामुळे येथील वाचकांना हि माहिती अतिशय प्राथमिक स्वरूपाची वाटणार यात काहीच शंका नाही. पण त्यामागे माझे लिखाण आपणापर्यंत पोहोचवावे व परिचित व्यक्तींशी थोडासा संवाद साधावा असा उद्देश आहे. करोना नंतर पुन्हा एकदा व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरु झाल्यामुळे मनात असूनही जास्त वेळ लिखाणासाठी देता येत नाही याची खंत वाटते. मायबोलीकर मित्रांच्या प्रतिसादरूपी प्रोत्साहनामुळे लिहिण्याची स्फूर्ती सतत मिळत आली आहे याची जाणीव आहे. लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा. धन्यवाद !

चांगला लेख.

अवांतर: माझ्यामते वैद्यकीय माहिती नवी असली/नसली तरी अचूक असायला हवी. ती सर्वसामान्यांच्या सतत नजरेसमोर राहाणे महत्त्वाचे. (नवीन माहिती असेल तर दुधात साखरच.) तेंव्हा आरोग्यविषयक जागृती करण्याचं कार्य करणारे असे लेख वारंवार चर्चेत असायला हवेत.

पण खरोखरच प्रत्येकाला म्हातारे होत दीर्घायुष्य जगणे हवे असते का?
अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त जेवणे हेच असते, असे अनेक वेळा लक्षात येत असते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही ऊक्ती लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

हो.
------------
१) व्यायामाचे महत्व मला पटलेले नाही. जे लोक आपली कामे आपणच हिंडून फिरून करतात आणि करू शकतात त्यांनी ती करत राहायला पाहिजे. वेगळा व्यायाम हा छांदिष्टपणा आहे.

२) शिवाय ऊठसूट डॉक्टराकडे जाणे हेसुद्धा वाईटच. मॉडर्न मेडिसिनस जेवढी कमी घ्याल तेवढी शरीराची प्रतिकारशक्ती टिकून राहाते. सहन करणे म्हणजेच इम्युनिटी वाढवणे. जे रोग फक्त आटोक्यात ठेवता येतात आणि कायम गोळ्या घ्याव्या लागतात त्यास औषध का म्हणावे? गोळ्या>> आणखी गोळ्या>>अवांतर परिणाम टाळण्यासाठी आणखी गोळ्या ( सिराटिन कमी करणे वगैरे) >> असा प्रवास सुरू होतो.

मुद्दे क्रमांक (१) आणि(२) शांतपणे मांडले आहेत उगाच आक्रस्ताळेपणा नाही.

लेखक डॉटर असल्याने मी इथे ही मतं मांडत आहे. म्हणजे की त्यावर चर्चा होईल. उगाच प्रचार करतो असं होणार नाही.
-------
वृद्धांना समाजात चांगले स्थान नसते. बोलणी खावी लागतात.
बँकेत त्यांच्याकडे आठ्या घालूनच पाहतात. आता ओनलाईन पेमेंट्समुळे फारसे जावे लागत नाही ते बरे झाले.
रस्त्याने जाताना"कशाला हे तडमडतात या वेळी?" असे ऐकू येते. मग काय दुकानं ,ओफिसं बंद झाल्यावर बाहेर पडायचे काय?

एकूण दीर्घायुष्य आणि म्हातारपण वेगळे हे बरोबर बोललात.
एकटे आणि निराधार दीर्घायुष्य फारच वाईट असते म्हणूनच "मला लवकर ने रे" म्हणावे लागते. पण ऐकतो कोण?
----------–---------
।।आनंदी आणि चटपटीत दीर्घायुष्य ज्यांना हवे त्यांना मिळो. ।।

धन्यवाद डॉक्टर !
सोनाली - विडिओ आवडला

एक साधी गोष्ट करण्या सारखी मला वाटते - सर्वच जण चहा कॉफी च्या सवयीत अडकतो आणि नंतर साखर कमी कशी करावी वैगेरे struggle करतो
परंतु मुलांच्या बाबतीत - मुलांना चहा कॉफी आवडत नसते पण बऱ्याचदा घरातूनच हि सवय लावली जाते. मुलांना आपण हि सवय न लावल्यास रोज किमान ४-५ चमचे अनावश्यक साखर टाळता येईल (दिवस / वय गुणाकार करून किती अनावश्यक साखर intake टाळला हे लक्षात येईल).

Srd, तुमच्या दोनही मुद्द्यांशी सहमत... लोक अजिबात हालचाल करत नाहीत, साधे नाक्यावर जायचे तरी बूडाखाली गाडी लागते, त्यांना व्यायामाचा वेगळा छांदिष्टपणा करावा लागतो... तुम्ही दिवसभर हालचाल करत असाल तर वेगळा व्यायाम करावा लागणार नाही.

ऋतुबदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी डॅाक्टरकडे जायची गरज नाही हेमावैम. बाकी आजारात ऊगीच अंगावर काढुन काट्याचा नायटा करण्यापेक्षा वेळीच ऊपचार घेतलेले बरे.

शोधक, आमच्याईथे एक वर्षाचे मुलही गोडमिट्ट चहा पिते व पालक आवडीने पाजतात.