चिंधी : ५

Submitted by सोहनी सोहनी on 12 October, 2021 - 00:58

चिंधी : ५

मी एकटक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते आणि अर्ध्या क्षणात त्याने मागे वळून माझ्या डोळ्यांत काही तरी उडवलं, त्यानंतर मला एका लिबलिबीत हाताने बराच वेळ आत ओढत नेलं आणि कुठे तरी जवळ जवळ फेकलं,
आधीच लागलं होतं, त्यात असं ओढल्याने मला सगळी कडे फाटल्या सारखं जाणवत होतं, संपूर्ण अंग झोंबत होतं, मला खूप वेदना होत होत्या, इतक्या की इतक्या वेदना नंतर माणूस जिवंत राहतो त्या क्षणी मला त्याचंच आश्चर्य वाटत होतं.

मी वेदनेने कळवळत होते, काय होतेय का होतेय काही काही कळत नव्हतं, माझ्या डोळ्यांतून अश्रू घरंगळत होते, मला असं वाटत होतं की कुणीतरी यावं आणि मी त्याच्या कुशीत हमसून हमसून रडून घ्यावं, माझ्या एका डोळ्याला काटा टोचला होता, डोळा उघडत नव्हता, मला फेकून दिलं तेव्हा कमरेत जोरात अचका बसला, मला उठवत देखील नव्हतं,
पण अश्या तक्रारी लक्ष्यात घेण्याची ही वेळ नव्हती.

मी आजूबाजूचा कानोसा घेतला, निरव शांतता होती, कशाचाच आवाज नव्हता, एखाद्या पक्ष्याचा देखील नव्हता, त्या शांततेची इतर वेळी मला भिती वाटली असती पण त्या क्षणी मला खूप बरं वाटलं, मी मोठा श्वास भरला आणि डोळे बंद केले, काहीच क्षणांत मी झोपले कसं ते मला नाही माहित पण मी असल्या घटना घडत असताना, इतका धोका, इतका ताण असताना चक्क झोपले.

असं जाणवत होतं जणू मी कित्येक वर्षांची झोपते, बऱ्याच वेळानंतर घोंगवत्या वाऱ्याने आणि त्या मुळे उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने कीलकिले करत मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागले, मार लागलेला डोळा ठणकायला लागला, सर्व जखमा हळू हळू जाग्या होऊ लागल्या, दुखत तर होतंच सगळीकडे पण कदाचीत ह्या अचानक मिळालेल्या आरमामुळे एक प्रकारची नवीन चेतना शरीरात संचारली होती.

मी हळू हळू डोळे उघडले आणि पुढे जे काही पाहिलं ते पाहून पुन्हा भीतीचे सत्र चालू झाले कळून हृदयात जी कळ येत होती तिला कमी करायला जोरात श्वास भरत होते.
आता मी भिणार नव्हते, कारण मी स्वताला स्वाधीन केलं होतं मरणाच्या, फक्त जे चाललंय ते भेदून आर किंवा पार इतक पक्क केलं होतं.

ती जी अशी समोर बसली होती तिला पाहून मला ह्या क्षणी शिसारी येत होती, पण एक प्रकारची भिड चेपली होती, मी मनातून नसले तरी डोक्याने तयार होते जे समोर येईल त्यात जीव झोकायला, जगलो तर अहिर मिळेल आणि मेलो तर त्यातून सुटका....

धगधगत्या हवना समोर माझ्यावर नजर रोखून काहितरी पुटपुटत होती, तिच्या मागे अजुन दोन पुरुष होते, तोंडावर घट्ट फडके बांधून तीच्या आदेशाची वाट पाहत, जणू तिचा एक जरी शब्द खाली पडला तर आपला जीव जाईल, ते गरजे नुसार तिला अहुतीत टाकायला एक एक वस्तू देत होते,
एका माणसाच्या हालचाली चालण्याची लकब मला ओळखीच्या जाणवत होत्या,
मी त्याचं निरीक्षण करत होतेच तोच ते दोघे येऊन मला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होते, मी खूप झटापट केली, ते माझ्या पेक्षा निश्चित वयस्क होते, माझ्या पुढे त्यांची ताकत थोडीशी का होईना पण कमी पडत होती.
मी त्याचाच फायदा घेऊन एका माणसाच्या तोंडावरून ते कापड ओरबाडून घेतलं,
अप्पा होते ते, आमचे अप्पा, आमचे वडील अहिरचे बाबा माझे सासरे.

माझे डोळे विस्फारले होते पण त्यांच्या डोळ्यांत एक कण माया नव्हती, होती ती फक्त आणि फक्त रक्षाशी वृत्ती.
'बाबा' मी जोरात ओरडून त्यांच्या हाताला हिसका देऊन त्यांच्या पासुन लांब झाले, आणि एक सणसणीत कानाखाली माझ्या गालावर पडली, हा तिसरा माणूस होता,
आणि त्याचे डोळे माझ्या अहिरचे होते.

त्या दुसऱ्या माणसाने चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला केला, अहिरचे लांबचे काका जे महिन्यातून एक दोन दिवस घरी यायचे, त्यांच्या विषयी अहिर कडून मला काहीच कळलं नव्हतं, आणि तिसरी व्यक्ती जिने माझ्या कानाखाली वाजवली मी श्वास रोखून तिच्या कडे पाहत होते, कारण मला आता वेगळीच भिती वाटत होती आणि ते खरं झालं,
तो अहिर होता. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा देखील भाग लहान झाला आहे आणि त्यात उशिरा पोस्ट केलाय, त्यासाठी मनापासून सॉरी, पण पुढचा भाग शेवटचा असेल आणि लवकर पोस्ट करेन.

चिन्मयी जी, पुढचा भाग पोस्ट केला आहे,
आणि काही कारणांनी उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांना सॉरी मनापासून.