IRCTC ऑपरेटेड टुर्स बद्दल माहिती हवी आहे

Submitted by DJ....... on 8 October, 2021 - 08:01

IRCTC ऑपरेटेड यात्रा/टुर्स च्या बर्‍याच जाहिराती येत असतात. त्यामधे विविध रुट्स वरील १०-१५ दिवसांच्या पॅकेजेसची माहिती दिलेली असते.
त्यामधे नॉन-एसी अन ३ एसी अशा दोन ग्रेड्स मधे विभागणी केलेली असते.
उदा. सोलापूर-पुणे-चिंचवड-लोणावळा-कल्याण इथल्या स्टेशनांवर थांबून मेंम्बर्सना घेऊन ती ट्रेन उदयपूर, जयपूर, आग्रा, मथुरा, हरिद्वार, अमृतसर, वाघा बॉर्डर अशी ठिकाणे दाखवण्यासाठी जाणार असते. यामधे उदयपुर पर्यंत ट्रेनचा प्रवास अन अमृतसरहून परतीचा सोलापूरपर्यंतचा प्रवास असतो. आपल्या पॅकेजप्रमाणे सोयी सुविधा दिलेल्य असतात. म्हणजे नॉन-एसी मेंबर्स साठी १०५०० रुपये प्रती मेंबर अन ३ एसी मेम्बर्स साठी १७५०० रुपये प्रती मेंबर. नॉन एसी वाल्यांना मोठ्या हॉल मधे रहाण्या-झोपण्याची व्यवस्था तर ३ एसी वाल्यांना ट्रिपल शेअरिंग आधारीत रुम्स दिल्या जातात. सर्वांना शाकाहारी जेवण अन उदयपुर पासुन अमृतसर पर्यंत प्रत्येक ठिकाणी स्थलदर्शनासाठी बसेस देतात अशी जाहिरात वाचण्यात आली.

इतर खाजगी टुर कंपन्यांची याच ट्रिप साठी दुपटीहून जास्त फीज आहेत. IRCTC च्या काही सर्विसेस पैशांचा विचार करता खरेच खासच आहेत परंतु त्यांच्या यात्रा/टुर्स कशा असतील याबद्दल काहीच माहिती नाही म्हणुन काही प्रश्न मनात आहेत.

या प्रकारच्या IRCTC ऑपरेटेड यात्रा/टुर्स IRCTC स्वतःच मॅनेज करते की त्यासाठी पुन्हा खाजगी ऑपेरेटर्स दिले जातात? सांगितलेल्या सर्व स्थळांना व्यवस्थित भेटी दिल्या जातात का? टुर मॅनेजर्स सर्वांना सांभाळून घेतात का? जेवण कसे असते? स्थलदर्शनाची रुपरेषा पाळली जाते का? ऐनवेळी हे कॅन्सल ते कॅन्सल असा काही प्रकार तर होत नाही ना? ६०-७० वय असलेल्या ग्रुप साठी या यात्रा/टुर्स चांगल्या आहेत का?

जर कोणी या IRCTC संचलित यात्रा/टुर्स केल्या असतील तर माहिती हवी होती. स्वस्तात मस्त प्रकारच्या वाटणार्‍या IRCTC संचलित या यात्रा/टुर्स विचारात घेण्याजोग्या आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा हा धागा दिसला नव्हता. तो पाककृती आणि इतर स्पर्धेत खाली गेला आणि पाहिला नाही.
१) रेल्वेचा पारदर्शकपणा ९५% म्हणजे खूपच जास्ती आहे. पण नियम समजून घेतले पाहिजेत. त्यांच्याकडून ते काहीच गाळत नाहीत. लिहिल्याप्रमाणेच मिळेल.
२) त्यांच्या भारतदर्शन आणि लक्षरी अशा दोन प्रकारच्या सहली आहेत. लक्षरी प्रकाराचे रेटस बाहेरील इतर आयोजकांएवढेच दिसतील. भारतदर्शन ही स्वस्त आणि साधी टुअर असते. त्यात रुम साध्याच देणे शक्य असते.
३) वयस्कर दोघे चौघे असतील तर आणि धार्मिक ठिकाणे करायची असतील तर बरी.
३) ज्यांना आपल्याच कुटुंबाला म्हणजे तीन चार जणांना जायचे असेल त्यांनी आपण स्वतंत्रच जावे. लहान मुलांना हवा तसा हवा तिथे वेळ देता येऊन टुअर आयोजकांपेक्षा पंचवीस तीस टक्क्यांत सहल सहज होते. नातेवाईक कुटुंबाला घेऊन संख्या। आठ दहा झाली तर मात्र नियोजन अवघड जाते. आगावू आरक्षण न करता कुठेही राहता येणे अशक्य होते. हॉटेलवाले रुमभाडे कमी करत नाहीत. (एका ओटोत तीन जण जातात आणि तीन बेडची खोली मिळते. तीन जण जाणे फारच स्वस्तात होते. ))
४) साठ सत्तर वयोगटातल्यांना कुठे घेऊन जायला तरुण मुलं तयार होत नाहीत किंवा ती कुठे परदेशी असतात. मग त्यांना स्वस्तात फिरण्याचा आनंद कोण देणार? दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की त्यांच्याकडे भरपूर वेळ पडलेला असतो. रेल्वेने २४-३० तास लागले तरी चालतात. पण विमानाचे भाडे, अगोदर हजर होणे, अंग तपासणी करून घेणे, विमानतळापर्रंत आणि तिथून च्या प्रवासाला ट्याक्सीवाल्याने लुबाडणे यातून वाचता येणे बरे.

Srd तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.

वयस्कर प्रवाशांना जास्त घाई अन जास्त फिरणं नको म्हणुन या सहलिंचा विचार करत होतो. आई-वडील-सासू-सासरे अन जमलंच तर मामा-मामी-काका-मावशी-आत्या-मामा या सर्वांना एकत्रपणे अशाप्रकारच्या ट्रिप मधे निवांतपणे फिरायला पाठवावं अशी इच्छा आहे. ट्रेन मधे तसेही प्रवासाची दगदग जास्त होणार नाही. त्यांना या वयात एकत्र स्थलदर्शन अन देवदर्शन करण्याचा आनंद उपभोगता येईल असा विचार मनात आला. परंतु मनात काही शंका आल्या म्हणुन हा धागा काढला.

कोरोनाची तिसरी लाट येते की काय या शंकेने नियोजन करावं की नको या द्विधेत सापडलो आहे.