ते गांव माझे..

Submitted by प्राजु on 19 December, 2007 - 22:24

सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगा तिरावर, माझं गं ते कोल्हापूर...

महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर..
परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर..

बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर..
परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर...

कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर..
भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर...

नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर..
आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर...

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...

साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर..
मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........

- प्राजु.

गुलमोहर: