माबो गंमतगूढ (२) : जोड्या गुंतागुंतीच्या

Submitted by कुमार१ on 7 October, 2021 - 01:47

भाग १ : https://www.maayboli.com/node/79911
या खेळात प्रथमच भाग घेणाऱ्या लोकांनी भाग १ वर नजर टाकून आल्यास उपयुक्त ठरेल. म्हणजे गंमतगूढचा अर्थ नीट समजेल.
....................................................................................

पहिल्या भागाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण अजून जरा वरच्या इयत्तेत जाऊ !

खाली १० शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत. ही नामे घेऊन त्यांच्यात एक विशिष्ट लेखनसंबंध जोडून ५ जोड्या तयार केल्यात.

तुम्हाला २ गोष्टी शोधायच्या आहेत :
१. हे सर्व शब्द ओळखायचे आणि
२. प्रत्येक जोडीच्या कंसात दिल्याप्रमाणे त्यांचे एकमेकांशी असलेले लेखनसाम्य उत्तरातून सिद्ध करायचे.
हे दोन्ही जमल्यासच उत्तर बरोबर ठरेल.

(शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी).

ओळखायची सर्व नामे सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात अंक अजिबात नाहीत. नावे ओळखताना सदस्य खात्यात जशी लिहीली आहेत तशीच ओळखली जावीत.
...

शोधसूत्रे :

१.डोके घालून बसायचे अन ममताळू व्हायचे (५)
२. दुःखाला वाहनाचा टायर मिळाला (५)
(१ व २ मध्ये प्रत्येकी फक्त एक जोडाक्षर हवे)
…..
३. पुढच्या डोक्याला छान सुगंध येतो (5)
४. याच्यावर पाय ठेवताच फूल दिसले (5)
(३ व ४ च्या उत्तरांमध्ये एक समान गुणधर्म हवा)
………….
५. आपल्या नात्याला फिरंगी रूप दिले (५)
६.’ डावा’ नको, ‘उजवा’ नको; जनतेसाठी हवा. (४)
(५ व ६ मध्ये प्रत्येकी एकाच अक्षरावर मात्रा हवी )
..................
७. लिहायला जड असला तरी आनंद देतो बुवा(५)
८. हा वंशज ऊर्जास्त्रोताशी युती करतो (५)
(७ व ८ मध्ये प्रत्येकी एकाच अक्षराला ह्रस्व उकार हवा)

९. रत्न बाळगणारा साधू (५)
१०. नाद पर्वतावर नेतो (६)
( ९ व १० मध्ये प्रत्येकी दोन जोडाक्षरे).
....................

एक जोडी सोडवून पूर्ण झाल्यावरच पुढच्या जोडीकडे जावे. म्हणजे गोंधळ होणार नाही. खेळाची सुरुवात कुठल्याही जोडीपासून करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.

अपेक्षित उत्तर हे होते
वाचनप्रेमी
छान सुरुवात

आता २ चेच उत्तर काढावे आणि मग एक व दोन कंसात दिल्याप्रमाणे जुळले पाहिजेत.
त्याशिवाय पुढच्या जोडी कडे जाऊ नये

मामी,
बरोबर माझ्या लक्षातच आले नाही

आता जाऊद्या, पहिले उत्तर दिले गेले आहे Happy
शक्यतो जोडीची उत्तरे बरोबरच दिली गेली तर लगेच निवाडा करता येईल

अशोकचक्र चूक.
अशोक म्हणजे दुःख नाही
दुःख कोसळणे यासाठी तीन अक्षरी शोधा

२ मध्ये वाहनाचा टायरचा दोन अक्षरी शब्द अवघड आहे.
परंतु पहिल्या तीन अक्षरीसाठी:
दुःखाचा डोंगर इत्यादी कोसळणेसाठी एक परिचित शब्द शोधा.
तो आला की एक परिचित सदस्यनाम लगेच ओठांवर येईल !

१. वाचनप्रेमी
२. अरिष्टनेमी

(१ व २ मध्ये प्रत्येकी फक्त एक जोडाक्षर हवे)
जुळले,
चला पुढे......

३. कवठी चाफा ? .
पुढच्या डोक्याला हे चालेल का ?

जेम्स बॉण्ड नाहीच
कारण

सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व सलग आहेत

. बे फिकीर
नाही कारण सूत्रांशी काहीच जुळत नाही

सुपरमॉम नाही हो,
पुन्हा लक्षात घ्या
अपेक्षित शब्द मराठी भाषेतच
शब्दाचा फिरंगी भाग मराठीत समाविष्ट झाला आहे

श्रद्धा नाही आणि
मध्येच पुढचा शब्द नको
आधी चालू जोडी पूर्ण करूया
... निम्मे सुटलेले आहे
छान सोडवलीत सर्वांनी
उरलेल्यांसाठी शुभेच्छा
आठ तासांनी भेटू

Pages