घराचं नूतनीकरण - लाकडी दरवाजा व फ्रेम काढून ग्रॅनाईट लावावं का?

Submitted by मेधावि on 4 October, 2021 - 11:17

घरातलं थोडंफार नूतनीकरण व डागडुजी करते आहे. स्वच्छतागृहांच्या टाइल्स व फरशा बदलणे, ट्राॅल्यांची दुरुस्ती व रंगकाम इतकंच. काॅन्टॅक्टरकडून प्रस्ताव आलाय की लाकडी दारं व फ्रेम्स काढून टाकावीत व ग्रॅनाईटची बसवावीत. हा करंट ट्रेंड आहे आणि त्यानं उठावदार दिसेल असं त्याचं म्हणणं आहे.

पण

सुस्थितील दणकट लाकडी दारं काढून तिथे सिंटेक्स किंवा तत्सम कचकड्याची दारं बसवणं मला कसंतरी वाटतंय. लाकडी दारं छान दणकट आहेत आणि दिसतही चांगली आहेत. पण फक्त आधुनिक लुकसाठी हा बदल स्विकारावंसं वाटत नाहीये.

तर ह्यात काही इतर पैलू असू शकतात का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुस्थितीत आणि दणकट असतील तर नका लावू .जो पर्यंत चालतात तोपर्यंत चालू द्या.
माझ्या घरातल्या बाथरूम चौकट ग्रॅनाइट ला वस्तू आपटून त्याला भेग पडली परत सगळी चौकट रिन्यू करावी लागली कलरचा टाईल्स चा खर्च वेगळा. फक्त पॉश दिसण्यासाठी खर्च करायचाच असेल तर ठीक आहे.

जर चांगली असतील जुनी दारं + फ्रेम्स तर त्या ठेवू शकता.
जरासा बदल म्हणजे दारांना अर्ध्यापरंत दोन्ही आणि खालच्या बाजुनी पत्रा लावून संपूर्ण दार पेंट करून घेणे. यानी दारं अजून मजबूत होतील आणि पाण्यापासून काहीही अपाय होणार नाही. अर्थात जरा लूक बरा येईल माझ्यामते. नवी दारं शक्यतो अ‍ॅल्यूमिनिअम फ्रेम मध्ये प्लॅस्टिक वाली असतात ती लूक्वाईजच चांगली दिअसतात हे मावैम.
दरवाज्याच्या फ्रेम्स जर सिमेंट्च्या हव्या असतील तर त्या घेऊ शकता. तुमचा चॉईस, पण मग जुन्या फ्रेम्स भिंतीतून काढणे आणि पेंट इ. रीवर्क आलं.

दारं चांगली असतील तर उगीच बदलण्यापेक्षा काहीतरी करून करंट डिझाईन मध्ये फिट करता येतील.
आमच्याकडे बाथरूम दाराला ग्रॅनाईट चौकटी आहेत.त्यात कडी जायला पडलेली छिद्रं अगदीच उंदराने कुरतडल्या सारखी आहेत.पण आमचे काही अडत नसल्याने तशीच ठेवली आहेत.लाकडी दारं बाथरूम ची अगदीच 'दया दरवाजा तोड दो' म्हणून दयाने प्रेमाने खांदा लावला तरी तुटतील अशी आहेत.बिल्डर कृपा.(आमच्या सोसायटीत अजून घराचे रिनोव्हेशन केलेले आम्ही आणि अजून 1-2 घरं आहेत.बाकीच्यांची दुसरी किंवा तिसरी चालू आहेत

फ्रेम सॉलिड सर्फेस हवं तर लावा... (पण जुन्या घरात नको असताना डागडुजीपाई हात लावलात तर आणखी काम वाढण्याचीच शक्यता. ) पण दारं लाकडीच छान दिसतात. प्लॅस्टिक, मेटल अत्यंत वाईट दिसतात. पत्राही लावलेला चांगला दिसत नाही. सँड करुन री-पेंट करा छान दिसायला आणि मेंटेन करायला. रंग ही पांढराच छान दिसतो.
कॉन्टॅक्टरने कुठल्या क्लाएंटकडे केलं असेल तर जाऊन प्रत्यक्ष बघुन या, आणि मग नकोचा निर्णय घ्या Wink Proud
हो! भारतात घराला इतका खर्च करुन बाथरुमला ती बारकुशी कडी का लावतात बिल्डर? आमच्याकडे पण तसंच आहे. आई बाबा ऐकत नाहीत. तुम्ही बदलुन टाका अनु! Proud

दारं चांगली असतील तर ते ग्रॅनाईट लावू नका
दारं रिफरबिश करून घ्या. आज लाकडी फ्रेमिंग विकत घ्यायला जाल तर महाग पडते
ग्रॅनाईट काय सगळे च वापरतात...
मारबल पेक्षा ग्रॅनाईट मजबूत असतो शिवाय मारबल पोरस असतो आणि बऱ्यापैकी ठिसूळ ही...

आमच्याकडे टाटा प्रवेश चं खूप प्रेम उफाळून आलं होतं मध्ये.मग तो दरवाजा वाली गाडी डेमो ला घेऊन आला होता गेटवर.झकास होते दरवाजे.पण नुसत्या दाराला 45-46 हजार रुपये अगदीच देववेना. त्यामुळे सध्या सगळं आम्ही पेंडिंग ठेवलं आहे.बहुतेक अजून 10-15 वर्षांनी घरात कार्य निघालं किच करु Happy

दारे बदलू तर नकाच पण सहज चौकशी म्हणून काढलेल्या दारांचे आम्ही काय करणार असे कॉन्ट्रॅक्टरला विचारून बघा. तो बहुधा म्हणेल तुम्ही विका किंवा फेकून द्या पण घेणारा बघणे, ट्रान्स्पोर्ट करणे तुम्हाला जमणार नाही तर मी लावतो विल्हेवाट आणि खर्च सोडून काही मिळाले तर देईन तुम्हाला.
चांगल्या स्थितीत असली तर रीकंडिशन करून ती दारे चढ्या किंमतीत विकता येतात. अर्थात ही वरकमाई करणे हा सुद्धा कॉट्रॅक्टरचा अजेंडा असतो आणि बहुधा लोक ईमोशनल होत ऐकतात.

दरवाजे बदलायचे की नाही हा निर्णय काय तो घ्या पण माझ्याकडून दरवाजाच्या कडीच्या बाबतीत एक सल्ला.
आता काम करताच आहात तर स्वच्छतागृहांच्या दरवाजाला मॉलमधल्या स्वच्छतागृहाला असतात तशा म्हणजे आतून lock केल्यावर बाहेर लाल रंग दिसणाऱ्या किंवा Engage असे दिसणाऱ्या कड्या लावून घ्या. Indicator bolt म्हणतात त्याला. साधारण २५०-३०० रुपयाला एक कडी पडते. परंतु त्याचा फायदा असा की, देव न करो पण कधी घरातले ज्येष्ठ नागरिक वगैरे स्वच्छतागृहात पाय घसरून / चक्कर येऊन पडले तर आपल्याला धावपळ करून, माणसे बोलावून दरवाजा तोडावा लागत नाही. केवळ एका स्क्रू ड्रायव्हरने बाहेरची डायल फिरवली की आतील कडी उघडते (Unlock होते.)
http://locteclocks.com/wp-content/gallery/indicator-bolt/5_r17_c7.jpg

चांगल्या स्थितीत असली तर रीकंडिशन करून ती दारे चढ्या किंमतीत विकता येतात. अर्थात ही वरकमाई करणे हा सुद्धा कॉट्रॅक्टरचा अजेंडा असतो
>>>>>
हेच लिहीणार होतो.
आमची जुनी बिल्डींग अर्धी आरसीसी तर अर्धी लाकडी होती. पण ते लाकूड बर्मा साग होते. रिपेअरींग आले तेव्हा उगाच ते अमुकतमुक ठिकाणी खराब झालेय असे सांगून ते लाकडी बीम कॉलम काढले आणि तिथे स्टील मेंबर टाकले. आणि त्या काढलेल्या लाकडांचे बरेच पैसे कमावले. ज्यावरून आमच्याईथे मग फार मारामार्‍या झाल्या. काँट्रेक्टर कमवून पसार झाले पण त्यानंतर एका धुमश्चक्रीत सोसायटी मेंबरना मजबूत फटके पडले.

ही दारं नक्की को ण ती आहेत? बाथरूमची मेन एंट्रन्स का खोल्यांची. ? जर बदललीच तर जे लाकूड वाचेल त्यातून फर्निचर जसे टेबले, साइड टेबल बुक केस बनवून घ्या . लाकडाला टर्माइट लागू शकते त्यामुले ठेवायची असतील तर टर्माइट प्रूफ कोटिन्ग करून घ्या व चांगले पॉलिश करून घ्या. मस्त दिसेल.

फुल ग्रॅनाइट ची दारे का? फक्त चौकट? दार जड होईल ना?

नको बदलूस, मेधावि. आरारांशी मी सहमत आहे
माझ्या घरात बाथरूमचा जुना सागवानी लाकडाचा दरवाजा खालून खराब झाला होता तेव्हा बदलायचा कसा यावर बराच काथ्याकूट केला. मरीनप्लाय वगैरेचे दरवाजे फार महाग पडत होते. तेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्टर आणि सुताराने दिलेल्या सल्ल्यानुसार सुताराच्या इतर कामातून राहिलेले/मिळालेले चांगल्या दर्जाचे लाकडी मोठे फळकूट दरवाज्याचा खालचा अडीच फुटी भाग कापून टाकून तिथे मापानुसार चिकटवून लावले. वरून ऑइलपेंटचे दोन हात मारले. अजिबात कळत नाही जोड कुठेय ते! As good as new
ते प्रीफॅब्रिकेटेड दरवाजे फार लवकर खराब होतात, खिट्ट्या तुटतात असे अनुभव अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये बरेचदा बघितलेत. त्यामुळेच मी लाकडी जोडाचा पर्याय निवडला.

बाथरूम ला उंबरा असेल तर लाकडी दार भिजणार नाही. प्रीफॅब त्यामानाने तकलादू हे खरेच आहे. बिफोर व आफ्टर फोटो टाका.

सुस्थितील दणकट लाकडी दारं काढून तिथे सिंटेक्स किंवा तत्सम कचकड्याची दारं बसवणं मला कसंतरी वाटतंय. >>>>>>> मग अजिबातच बदलू नका.काल मी ग्रॅनाईटच्या चौकटी बदलायचा प्रतिसाद्,मार्बलच्या चौकटीच्या अनुषंगाने दिला होता(धागा न वाचता). लाकडी दारे मस्त दिसतात.

दारांचे फोटो टाका नक्की
एकदा स्मॉल बजेट बिग मेकॉव्हर विथ मुनिंदर विशाखा पण बघा युट्युब वर.
त्यातून दरवाजा तसाच ठेवून काही नव्या आयडीया मिळतील.