डॉक्टर मी काय करू?

Submitted by कीर्ति.चेल्लम्मा on 28 September, 2021 - 02:46

डिस्क्लेमर - मी ना मानसोपचारतज्ञ आहे ना समुपदेशक. मी केवळ एक हौशी लेखक आहे. तेव्हा लिखाणा तृटी असू शकतात नव्हे आहेतच त्या वाचकांनी सांभाळून घ्याव्या. या कथेचा कोणाला फायदा झाला तर कृतार्थ होइन. निदान काही अंशी सजगता यावी अशी आशा करते. मला हा लेख माझ्या खर्‍या नावाने टाकण्यात रस नाही. शर्मिलाताईंचा 'बाधा' (https://www.maayboli.com/node/80183) हा लेख वाचून मला हे स्फुट टाकण्याचा धीर आला. कलोअ.

प्रिया
४५ वर्षांची प्रिया, डॉक्टर 'शंतनु रामाणी' यांच्याकडे पाचव्या थेरपी सेशनकरता आलेली होती. पहील्यांदा समुपदेशन/थेरपीस जाण्याकरता राजी नसलेल्या प्रियाला गेल्या तीन सकारात्मक सेशन्स नंतर आता डॉक्टरांशी बोलावेसे वाटू लागलेले होते. डॉक्टरांच्या ज्ञानावरती, त्यांच्या कौशल्यावरती हळूहळू तिचा विश्वास बसू लागलेला होता. पेशंटचा डॉक्टरांवरती विश्वास बसणे ही मोठी गोष्ट असते आणि हा विश्वास तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल हे ती जाणुन होती. पहील्या सेशनमध्येच डॉक्टरांनी तिला हे पटवुन दिलेले होते की - थेरपी एक नॉन-जजमेंटल असे वैयक्तिक व्यासपीठ तिला देउ शकेल. डॉक्टरांशी तिला कोणत्याही टॅबुतल्या टॅबु विषयावरती बोलता येईल. जजमेंट, घृणा, आश्चर्य, अविश्वास यापैकी आणि अशा प्रकारच्या कोणत्याही नकारात्मक परिणामांना तिला सामोरे जावे लागणार नाही. अर्थात हा विश्वास बसायला ४ सेशन्स व्हावे लागले होते. तीसर्या सेशनमध्ये डॉक्टरांनी तिला कल्पना दिलेली होती - विचार, भावना,आपले वर्तन आणि शरीरावरती होणारे परीणाम हे एकमेकांवरती अवलंबून असातत. ऑल आर कनेक्टेड/इन्टररिलेटेड. विचारातील बदल, हा भावना, आपले वर्तन आणि शरीरस्वास्थ्यावरती अंमल गाजवतो. तसेच भावनेचे चढ-उतार हे आपले स्वास्थ्य, वर्तन तसेच विचारांवरती अंमल गाजवतात. असा हा चौफुला आहे. त्यामुळे एक प्रकारे अवघड आहे परंतु सोपेही आहे. एकावरती आपण नियंत्रण आणले की बाकीचे ३ आपोआप नियंत्रित होतात. प्रियाला ते लॉजिकलच वाटत होते. परंतु विषयाला हात कसा घालायचा? आज ती हिय्या करुन, डॉक्टरांना त्या प्रसंगाबद्दल सांगणार होती.

डॉ. रामाणी
पहिल्या चार् सेशन्स मध्ये प्रियाबद्दल जे समजले होते त्यावरुन ती ओपन अप होणार अशी डॉक्टर रामाणींची अटकळ होती. ही केस त्यांना ना नवीन होती ना त्यांना फार अवघड वाटत होती. याहून दुर्दैवी केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. आतापर्यंत त्यांना समजलेले होते - आठवीपर्यंत,
प्रियाचे आयुष्य अतोनात शेल्टर्ड गेलेले होते. बालपण रम्य होते. तिला खूप मित्र-मैत्रिणी होत्या. अनेक खेळ खेळण्यात आणि निसर्ग संपत्तीने विपुल अशा एकंदर भागामध्ये एक सुखी आयुष्य ती जगत होती. शाळा फार दूर असल्याने ती एकटी २ बसेस करुन शाळेत जात-येत असे. आई-वडीलांनी तिला परोपरीने शिकविले होते - हे बघ बसमध्ये कोणी देवाचा म्हणुन प्रसाद दिला तरी तो खायचा नाही. टाकुन द्यायचा. कोणी काका-मामा-मावशी शाळेत अले तरी त्यांच्याबरोबर जायचे नाही मग ते भले सांगोत - आईला अपघात झालाय किंवा बाबा आजारी आहेत काहीही. या सर्व धोक्यांमागची कारणमीमांसा मात्र कोणीही तिला दिलेली नव्हती. ती लहान होती तिला कसे कळावे - लोक हे सेडिस्ट असतात, लहान मुलांचा गैरफायदा घेतात, गर्दीत अंगचटीला जातात.
आज प्रिया थोडी व्यग्र दिसत होती आणि हेच रामाणींना अपेक्षित होते. त्यांनी ताडलेले होते की आज ती 'त्या' प्रसंगाबद्दल सांगणार. आणि झालेही तसेच प्रियाने त्यांना बसमध्ये , एका पेडोफाइलकडुन तिच्याशी घडलेला प्रसंग त्यांना सांगीतला. नशीबाने बसमध्ये गर्दी होती आणि ती त्या नकोशा , अत्यंत किळसवाण्या स्पर्शामधुन पटकन बाहेर पडू शकली होती. पण ते काही जे क्षण होते त्याचाही तिच्या मनावरती खोलवर परीणाम झालेला होता.

प्रिया
डॉक्टर त्या प्रसंगानंतर मी आयुष्यात परत कोणावरही ना विश्वास टाकू शकले., ना मोकळेपणाने वावरु शकले. माझ्या आयुष्याचे हे २ डिस्टिंक्ट पार्टिशन्स आहेत, भाग आहेत. एक त्या प्रसंगापूर्वी आणि एक तदुपरान्त. मी सावध झाले, मला हे जग धोकादायकही आहे ही जाणिव झाली. आणि खरं सांगायचं तर मला ट्रॉमा झाला. नाना प्रकारांनी मी क्लोजर मिळवण्याचा प्रयत्न केला - मी अध्यात्मात शोधत गेले- माझेच पूर्वजन्मीचे कर्म असेल का, ज्याचे मला फळ मिळाले? पण नाही मला तेथे क्लोजर सापडले नाही. ईट वॉझ टू इझी ॲन आन्सर टू ट्रस्ट. मी गुन्हेगारांच्या मानसशास्त्राबद्दलची पुस्तके पालथी घातली, मी प्रिझन मेम्वॉर्स वाचले. जिथे माझ्या लक्षात आले की सच पीपल आर देमसेल्व्हस ब्रोकन. अशा विकृत , रोगट लोकांच्या बरोबर तसेच काहीतरी घडलेले असते. या लोकांच्या आयुष्यात त्यांची तोडमोड करणारी काही कारणे असतात, प्रसंग असतात. हाऊ डझ दॅट हेल्प मी? मला त्या कारणमीमांसेतही क्लोजर मिळाले नाही. नंतर मी ती घटना ट्रिव्हिअलाइझ करण्याचा प्रयत्न केला की - असे हजारो प्रसंग घडतात त्यात अनेक लहान मुली व मुले भरडली जातात. मग तू अशी काय वेगळी आहेस? पण डॉक्टर मला तिथेही अपयशच आले. अन्य लहानग्यांना असा अनुभव येतो अशी दुसरी रेघ लहान काढल्याने, तर माझी रेघ मोठी होत नाही. ना मी तो स्पर्श विसरु शकते ना ती आठवण.मी काय करु? डॉक्टर मी काय करू? माझ्याबरोबर हा हिट & रन प्रसंग घडला. माझ्या असहायतेचा, माझ्या लहान असण्याचा गैरफायदा घेतला गेला. मी काय केले म्हणजे मला मन:शांती मिळेल?

डॉ. रामाणी
प्रियाला स्ट्राँग व्यक्तीमत्व होते, तिचा स्वभाव टोकदार होता. झालेली घटना ती आयुष्याचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग गेला तरी ती विसरु शकत नव्हती. ती अजुनही त्रास भोगत होती. 'हिट & रन' हा शब्द तिने बरोबर वापरलेला होता. तिला खरं तर त्या व्यक्तीस शिक्षा हवी होती. तिला क्लोजर देण्याचे २ प्रकार माझ्या लक्षात आले ते म्हणजे - तिला बोलते करणे. कारण हा प्रसंग तिच्या मनात फेस्टर झालेला होता, पिकला होता, त्या आठवणीला अतोनात दुर्गंधी होती. तिला बोलते करणे गरजेचे होते. हे काही प्रसंग , पेशंटला डिट्टेलवार विचारले की तेवढ्यापुरता त्रास होतो परंतु पुढे हळूहळू सर्व मळमळ बाहेर पडुन गेल्याने पेशंट शांत होतो. फेस्टर झाल्यामुळे जी गोष्ट ड्रॅगन भासते ती प्रत्यक्षात प्रकट केल्यावर फक्त पाल आहे असे लक्षात येते. हा डॉक्टरांचा व्यावसायिक अनुभव होता, हे त्यांचे प्रशिक्षण होते. हा झाला पहीला ट्प्पा. दुसऱ्या टप्प्यात प्रियाच्या अचाट कल्पनाशक्तीची मदत घेणे आवश्यक होते. तिच्या अंत:चक्षुंपुढे तिला एनॅक्ट करणे गरजेचे होते. तिला कसा न्याय मिळाला हे व्हिव्हिड इमॅजिनेशनने पहणे गरजेचे होते. व व्हि-व्हि-ड!! बारकाव्यांसकट.

प्रिया
तर त्या दिवशी ही व्यक्तीमला मॉलेस्ट करत असतेवेळी माझ्या अंगात जेवढा जोर होता तो जोर करुन मी त्या व्यक्तीच्या नाकाडावरती ठोसा लगावला. ती व्यक्ती मागे हेलपाटली. गर्दीमध्ये कुजबुज सुरु झाली. आणि मी किंचाळले - 'हलकटा मला हात लावु नकोस. मला किळस येते.' गर्दीला काय झाले ते समजले. त्या माणसावरती गर्दीने तिथेच हल्ला चढवला.त्याला धू धू धुतला. यावेळेस मी रडले नाही यावेळेस मी डोळ्यात निखारे घेउन फक्त त्या विकृत माणसाचा अक्रोश बघत राहीले. कोणी त्याच्या डोक्यात लाथा घालत होते तर कोणी पोटात. कोणी त्याच्या नाकावरती पाय देत होते तर कोणी डोळ्यात बुक्क्या . मुख्य म्हणजे ती व्यक्ती माराने तडफडत होती, व्हिवळत होती. गर्दीने पार चेंदामेंदा केल्यानंतर पोलिस आले. तोवर तो मनुष्य अर्धमेला झालेला होता. पुढे पोलिसांनी त्याला फोडुन काढलं. त्याच दिवशी सांध्याकाळी बातमी आली तो मेला. जखमांनी, मुकामारांनी, लाथाबुक्क्यांनी तो माणुस मेला.

डॉ रामाणी
पाचवा सेशन इन्टेन्स होता. प्रियाला आरामाची नितांत आवश्यकता होती. सर्जरी झालेली होती. गळू फुटुन ड्रेन झाला होता. आता जे बँडेज आणि मलम प्रियाला गरजेचे होते ते तिला तिच्या प्रियजनांकडुन मिळणार होतं. ती क्रिएटिव्ह व्यक्ती होती. तिने या विषयावर जर लिहीले असते मग ते किती का तोडके मोडके असेना, त्यातून तिने वाचा फोडली असती तर तेसुद्धा थेरपीचा एक भाग असणार होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनवन्ती, रश्मी, एस __/\__
आपण जग बदलू शकत नाही. पण आपल्या मुलांना आपण सजग बनवु शकतो. त्यांना कळेल अशा भाषेत नक्की समजावुन सांगू शकतो. मग ते पर्सनल सेफ बबल अराउंड यु असो की सर्व लोकांचे हेतू चांगले नसतत हे वारंवार ठसविणे असो. मुलांना फोबिक बनवा असे मी म्हणत नाही. शिवाय आपल्याला वाटते त्यापेक्षा मुलांच्गी आकलनक्षमता जास्त असते. लहानपणी सवयी लवकर लागतात मग ते आजूबाजूच्या परिसराबद्दल सजगता असो.

लिहित रहा. .