पाककृती स्पर्धा 2 पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ - पालक इडली - मंजूताई

Submitted by मंजूताई on 26 September, 2021 - 03:43

साहित्य
1) उडदाची डाळ : 1 वाटी
2) बाजरी पीठ : 2 वाट्या
3) इडली रवा: 1 वाटी
4) 1 जुडी कच्च्या पालकाच्या प्युरी
5) मीठ चवीनुसार
6) मेथ्या 1 छोटा चमचा
कृती :
उडदाची डाळ व मेथ्या सहातास भिजवून वाटून घ्यावी. त्यात बाजरीचे पीठ,रवा व आवश्यक तेवढे पाणी घालून (भज्यांच्या पीठाप्रमाणे) 8/10 तास आंबवायला ठेवावे . इडली करतेवेळी पालक प्युरी व मीठ घालून छान मिसळून घ्या. इडलीपात्राला तेल लावून मिश्रण घाला. 15 मि. वाफवून घ्या. ह्या प्रमाणात 36 इडल्या झाल्या. आवडीच्या चटणी बरोबर खा.
सोसायटीच्या गणपती प्रसादासाठी पालक न घालता इडल्या केल्या. ढोकळ्यासाठी फोडणी करतो तशी तीळ,मोहरी, जिरं 1 पळी तेल घालून फोडणी करायची. आच बंद करून 48 कापांसाठी 2 वाट्या पाणी व साखर (आवडीप्रमाणे). उकळी आली की व साखर विरघळली की आच बंद करून त्यात इडल्या ( चार भागात इडली फ्रायला करतो तश्या कापून) हिरवी मिरची पुदिन्याची चटणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचे. ट्रे/ताटलीत टूथपिक (करोना) लावून खायला दिल्या. फारच हीट झाला हा प्रकार.
ह्याच पीठाचे ढोकळे एक/दुरंगी करून मध्ये चटणी लावून सैन्डविच ढोकळाही करता येईल.
गणपतीच्या गडबडीत फोटो काढायला मी विसरले पण तुम्ही मात्र विसरू नका.20210912_192458.jpgIMG-20210910-WA0025.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages