चिंधी

Submitted by सोहनी सोहनी on 25 September, 2021 - 02:29

चिंधी : १

अहो अण्णा ते हॉर्न सतत वाजवून पुढच्या गाड्या हलणार आहेत का?? समोर मोठाली झाडं कोसळली आहेत
अहिर वैतागून म्हणाला.

मी पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्याच्या कडे पाहत पुन्हा खिडकी बाहेर पाहत बसले..

अहिरला बाबांनी म्हणजे माझ्या सासर्यांनी जमिनीच्या कामासाठी इकडे पाठवलं होतं, मला ही सुट्टी असल्याने मी त्याच्यासोबत निघाले, काम झालं आणि मला पण हवा बदल झाला सगळं व्यवस्थित झालं असताना घरी परतताना हा असा रस्ता बंद पडला होता...

दुसरा रस्ता आहे अहिर बाबा, पण जंगलातून जातो, तिथून घेऊ का गाडी???
म्हणजे पुढे मुख्य रस्त्याला येऊनच भेटतो, पण तिथवर ट्रॅफिक नसावी बहुतेक'
अण्णा अडखळत म्हणाले.

नको, एकतर आधीच रात्र झाली आहे, त्यात अजून जंगलातून जायचं, कशाला उगीच रिस्क?
मी बाहेर पाहतच म्हणाले.

'आरोही मॅडम पण इथे वाट पहायची म्हणजे किती तास जातील काय माहित???
आणि अहिर बाबा मी गेलोय २ वेळा तिथून, जरा कच्चा आहे तरीही व्यवस्थित वाटला मला, बघा तुम्हाला बरोबर वाटत असेल तर जाऊ आपण त्या रस्त्याने'
अण्णा माणुसकीने म्हणाले...

अण्णा माझ्या सासर्यांच्या वेळेपासून गाडी चालवायला होते, आणि आता आमच्यासाठी ही तेच.
म्हणजे नाही म्हणायला घरच्या माणसासारखे आम्हाला, आमची स्वतःच्या मुलांसारखी काळजी करतात, बोलताना नेहमी नमून बोलणार, आणि पूर्णपणे प्रामाणिक..

उद्या घरी पोहचायला हवं आपल्याला, आणि दुसरा रस्ता नाही घेतला तर आपल्याला इथेच अडकायला होईल, आणि केव्हा रस्ता सुरु होईल कोण जाणे?? अजूनतरी आपल्या मागे गाड्या नाहीयेत तर गाडी काढता येईल, म्हणून आरोही आपण दुसरा रस्ता घेऊयात.
अहिर समजावनिने म्हणाला.

मी अजून दोन वेळा नको म्हणाली पण नंतर मला पटलं त्यांचं म्हणणं म्हणून आम्ही गाडी मागे घेतली.
गाडी बरेच अंतर मागे आल्यावर एक कच्चा रस्ता दिसला तिकडे वळली, थोडे पुढे गेलो तर छोटी छोटी घर दिसायला लागली, म्हणजे गावातून रस्ता होता.
रस्ता तसा बरा होता, घरे इतकी काही जास्त नव्हती, गावापेक्षा एक वस्ती होती म्हणायला हरकत नव्हती, बहुतेक आदिवासी लोकं असावीत.
घरे संपली आणि झाडे लागली, हळू हळू झाडे दाट होत गेली, आणि पुढे तर इतकी दाट झाली की झाडांच्या आत काय आहे हे न दिसण्याइतपत दाट होत गेली. जर दिवस असता तर हा नजारा मनमोहक वाटला असता पण रात्रीच्या वेळेस मला जरा भीतीच वाटली.

इतक्या दाट जंगलात प्राणी असतीलच की?? एखादा आला समोर मग??? आणि ही घर जी आहेत ते कसे जगत असणार?? इथे तर काही सोय पण नाहीये??मुख्य रस्त्याला दुकान वैगेरे होते पण खूप लांब होते.
मी असल्या विचारांत गुंतलेली असताना अचानक पुढून गाडीवर धाडकन येऊन कोसळलं. .. .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults