विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास - धनि

Submitted by धनि on 22 September, 2021 - 12:27

नमस्कार, मायबोली २४ तास मध्ये आपले स्वागत आहे.
आजच्या ठळक बातम्या अशा आहेत.
१) प्रसिद्ध कवी अनिरूद्ध मेहता उर्फ कच्च केला यांनी मायबोलीवर कविता विभागात मराठीत कविता लिहायच्या ठरवल्या. आणि एकाच दिवसात माबोच्या पहिल्या १० पानांमध्ये फक्त त्यांच्या कविताच दिसायला लागल्या. मात्र त्यांच्या एका कवितेवर - "खटर खुंड खटर खुंड" - रोसेश साराभाई यांची कविता चोरण्याचा घनघोर आरोप झालेला आहे.

२) सध्या माबोवर नमक शमक नमक शमक असे म्हणत एक नविन आयडी धुमाकूळ घालतो आहे. त्याने प्रत्येक धाग्यामध्ये खुप मीठ घालून प्रतिसादांची संख्या वाढती ठेवली आहे.

३) आमच्या वात्रटहाराकडून आलेल्या बातमीनुसार व्हीलचेअरवर बसून मुली - जावयाचा सतत अपमान कसा करावा असा एक नविन कोर्स माबोवर सुरू करण्याचा मानस अधिराज यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलाय. त्यात त्यांचा जावई गुजरातीत स्टँड अप चा व्हिडीओ माबोवर टाकता येईल का असे अ‍ॅडमिनला विचारत होता असेही कळले आहे.

४) श्री. लंगडा त्यागी यांनी आपल्या अर्वाच्य भाषेत उत्तर भारतातील आंबे हे लंगडा आंब्यापेक्षा कसे श्रेष्ठ असतात असा प्रचार विविध धागे काढून सुरू केलेला आहे. पण त्यांच्या धाग्यांवर एकही प्रतिसाद न आल्याने कंटाळून त्यांनी राजकारणातल्या धाग्यांवर सुद्धा हा प्रचार करून पाहिला. पण तिथे लोक इतर चिखलफेकीमध्ये गुंतलेले असल्याने त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आले.

५) श्री. अपिल कर्मा यांनी आम्ही बायकांचे कपडे घालून करतो ती सवंग करमणूक नसून आमचे आदर्श विमलासन आहेत असे माबो चर्चासत्रात सांगितले. त्याला लगेच तमाम मराठी विनोदी कार्यक्रमांनी अनुमोदन दिले. त्याच बरोबर खाजीव कारळे यांनी त्यांचा जाहीर सत्कार करावा असे सगळ्यांनी जाहेर केले.

६) आताच हाती आलेल्या बातमीनुसार माबोवरील काही आयडींना "एक कंपु खेळू बाई एक कंपु खेळू" या कार्यक्रमात अखील कागाळेंनी आमंत्रीत केलेले आहे. कंपुतील लोक तिथे जाऊन कोणत्या आयडीबद्दल आगपाखड करायची हे सध्या ठरवत आहेत.

७) बिग बॉस, ओटीटी बिग बॉस, मराठी बिग बॉस यांच्या अपार यशानंतर पुन्हा एकदा माबो बिग बॉस सुरू करण्याचा मानस भाईंनी बोलून दाखवलेला आहे. त्यात कोणत्या आयडींंना घ्यावे यासाठी आधी एक चर्चासत्र आयोजीत करावे असे वेमांनी सांगितल्याचे कळते.

८) खाजकुमार पाव या हरहुन्नरी नटाने माबोवरच्या सुचनेला मानून आता फक्त मराठीतच काम करणार आणि मराठी माणसाच्याच भुमीका करणार असे मत व्यक्त केले. त्याने आपण खास माबोलेखकांच्या गोष्टी वाचून पटकथा आणि संवादलेखकांना नविन चित्रपट लिहायला सांगितले आहे असे आमच्या खास बातमीदारास सांगितले.

९) सारखे सर म्हणत रडणार्‍या पोरीला अबोध वावेंनी हेलीकॉप्टर मधून बरोबरच्या किनार्‍यावर न्यायचा घाट घातलेला आहे. पण अशावेळेस नक्की कुठल्या गेटप मध्ये रहावे हे न कळल्याने अबोध वावेंचा प्लॅन पुढे ढकलला गेला आहे.

१०) माबोवरील क्रिडाप्रेमी आयडींनी मायपीएल सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावेळेस काही आयडींना ही वेगळीच स्पर्धा वाटल्याने त्यांनी आपापल्या बाटल्या उघडून ३० - ६० - ९० सुरू केले आणि या कार्यक्रमाला वेगळेच वळण लागले. मग बाकीच्या क्रिडाप्रेमींनी सुद्धा आपला आधीचा विचार रद्द करून या उपक्रमात सहर्ष भाग घेतला.

आपल्यास याबद्दल काय वाटले ते खाली प्रतिसादांमध्ये नक्की कळवा. तसेच माबो बिग बॉस मध्ये कोणाला घ्यावे हे नक्की लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०) माबोवरील क्रिडाप्रेमी आयडींनी मायपीएल सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावेळेस काही आयडींना ही वेगळीच स्पर्धा वाटल्याने त्यांनी आपापल्या बाटल्या उघडून ३० - ६० - ९० सुरू केले आणि या कार्यक्रमाला वेगळेच वळण लागले. मग बाकीच्या क्रिडाप्रेमींनी सुद्धा आपला आधीचा विचार रद्द करून या उपक्रमात सहर्ष भाग घेतला.>>>>>> शेवट भयाण आहे. Rofl

धमाल लिहीलयं. Proud

छान Proud पण मला बरेच संदर्भ लागले नाहीत.

मला पण वावेंच नाव आहे वाटलं आधी, पण काहीच संबंध नसल्याने मग लक्षात आलं, सुबोध भावे असेल.