हस्तकला स्पर्धा-भेटकार्ड बनवणे- मोठा गट- अमा(२)

Submitted by अश्विनीमावशी on 19 September, 2021 - 09:28

ही दुसरी एंट्री:

थँक्स गिव्हिन्ग ला अजून महिना भर अवकाश असला तरी धन्यवाद म्हणायला सारेच मुहूर्त शुभच आहेत. तर गणे शोत्स वाच्या निमित्ताने.
मा. अ‍ॅडमिन, वेमा, श्री. अजय, आणि सर्व डेव्हलपर आणि मेंटेनन्स टीम ला मना पासून धन्यवाद. आम्हाला मराठीतून व्यक्त व्हायला एक छान्शी जागा दिल्याबद्दल व ती अखंड चालू ठेवल्या बद्दल - इट टेक्स अ लॉट यु नो.- तर त्याची सामान्या माबोकरांक्डून नोंद व धन्यवाद.

डिझाइन स्केचपेन बॉक्स मध्ये आलेले आहे. मी रंगवले आहे.

तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे आहोत.

१) मुखपृ ष्ठ : सर्व कलर अगदी साधे प्रायमरी वापरले आहेत.
BHETCARD3.jpg

२) आतील संदेशः : इथे पण मी नेहमी वापरते त्या निळ्या राखाडी ब्राउन कलर्स पेक्षा वेगळे आनंदी कलर्स वापरले आहेत. पण संदेश मात्र माझ्या फेव रीट चिंतामणी रंगात लिहिला आहे. परिवार लिहिताना चुकून आधीच एक मात्रा दिली मग त्याचे फूल बनवले आहे. घर की बात है. चलता है.
मागे काय रंग द्यावा समजेना मग ते पांढरेच ठेवले आहे. शुभ्र प्युअर रंग.

BHETCARD4.jpg

पुढील वाट चाली साठी हार्दिक शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! अमा
समयोचित कार्ड. छान आहे

वाह!!! किती मस्त आयडीया आहे ही.
>>>>>>>मा. अ‍ॅडमिन, वेमा, श्री. अजय, आणि सर्व डेव्हलपर आणि मेंटेनन्स टीम ला मना पासून धन्यवाद.
+ १,००,००१

छान

अवांतर -

अमा 'माझ्या आठवणीतली माबो' या विषया वरचा तुमचा लेख वाचायला खूप आवडेल. प्लीज मनावर घ्या.
-------------
खरं सांगायचं तर, तुम्ही मला माबोवरती 'एफ वर्ड' वापरु नकोस हे बजावलेलं तर इतकं आवडलय. हे असे कान पिळणारं कोणीतरी हवच. Happy
माझ्या तोंडात तो शब्द येत नाही आणि शिव्या या फक्त झोपडपट्टीतील आणि अशिक्षित माणसं देतात असा माझा समज आहे. पण धाग्यावर शहाणपणा उतु जातो ना. इंग्रजी त "एफ' म्हणजे आपण मॉडर्न आहोत असे वाटते Wink असो. शोना मॉडर्न दाखवायची होती म्हणुन वापरलेला. पण अनुचितच होता.
तुम्ही इन्डिफरंट नव्हता याचे मला अप्रुप आहे. हा माबो स्वभावविशेष. जिव्हाळा, आपुलकी आणि नो इन्डिफ्रन्स!!!

हो खरंच
अमा, तुम्ही पण आठवणीतली मायबोली लिहा.

वाह! अमा
समयोचित कार्ड. छान आहे >>> मम.

वाह! अमा
समयोचित कार्ड. छान आहे
>> +१

छान Happy