शशक पूर्ण करा-२- मी- विशाल८९

Submitted by विशाल८९ on 19 September, 2021 - 01:42

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचे स्वातंत्र्य .

अजुन काय हवे वाटत असतानाच समोर लक्ष गेलं .

समोर एक मॅरेज ब्युरो दिसला. खास अमेरिकेतील चांगल्या घरातील लग्नाळू मुलांची स्थळे आहेत. अशी काहीशी पाटी दिसली आणि मला हसूच आलं.

साल २०००. मला अमेरिकेतलाच मराठी,शामळू, हुशार,यशस्वी मुलगा हवा होता आणि तसा मी गटवलाही. प्रेम-बिम हा शुध्द बावळटपणा आहे असे माझे मत होते. आणि मी माझेच मत नेहमीच खरे करते.

आता हेच बघा ना, माझ्या चैनीच्या, मनमौजी आयुष्यात मुलांना,नातेवाईकांना जागा नाही हे आधीच ठरवून टाकले होते.

मी टॅटू आर्टिस्ट. ज्यावेळी बाकीचे आई-वडिल त्यांच्या मुलींना मुलांच्या अंगचटीला जाऊ नको सांगायचे,त्यावेळेपासूनच मी बिनधास्त स्त्री-पुरूष ग्राहकांच्या मांडीवर/स्तनावर टॅटू काढायचे. त्यात काय ! पैसे मिळण्याशी कारण.

मी बरोबरच आहे ना?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users