शशक पूर्ण करा २ - आरोळी - adm

Submitted by Adm on 17 September, 2021 - 11:13

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं.

ती गाडी सुरू करून घरासमोरून निघणार तितक्यात रस्त्यावर अचानक सुरू झालेली धांदल. गाण्यांच्या आवाजाने बाहेरचा आवाज झाकोळला जात होता. पण तरीही तो सहन न होणारा वास हळूहळू झिरपायला लागला आणि तिला अंदाज आलाच.

सगळी तयारी इतकी वेळेत करून खरतर आता तिला निघायला उशीर करायचा नव्हता. पण न थांबता तसच निघून जाणंही शहाणपणाचं नव्हतं. नाईलाजाने तिने गाडी बंद केली. दार उघडलं आणि आला तो परिचित घंटेसारखा आवाज आणि मागून ऐकू आली ती नेहमीचीच आरोळी "बाई sssssss कचरा !!!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users