सोनु सुद, ईडी आणि भाजप।

Submitted by ashokkabade67@g... on 17 September, 2021 - 02:26

सोनु सुद एक चांगला अभिनेता कधी वादात वा प्रसिद्धीच्या झोतात नसलेला राजकारणाशी देणेघेणे नसलेला आपण भले नी आपले काम भले अस वागणारा हा माणूस ,पण अचानक आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत महान पंतप्रधानांच्या लाँकडाउनच्या त्यांच्याईतक्याच क्रांतीकारी निर्णयामुळे आपल्या गावी परतणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या हाल अपेष्ठा पाहुन अक्षरशः अंतरबाह्य ढवळुण निघाला आणि त्याच्यातील निद्रिस्त असलेला माणूस जागा झाला आणि परप्रांतीय मजुरांसाठी अक्षरशः देवासारखा धाऊन आला कुठलाही स्वार्थ नाही कुठलीही अपेक्षा न ठेवता जेंव्हा मोदीजी जनतेला टाळ्या व थाळ्या वाजवण्याचा संदेश देत होते तेंव्हा पदरमोड करुन याच्यातील माणूस दिवसरात्र परप्रांतीय मजुरांच्या घरवापसीसाठी प्रयत्नशील होता सोनुतील या जाग्या झालेल्या माणसाने त्याला प्रसिद्धीच्या ईतक्या मोठ्या झोतात आणले की निवडणुकीत सुशांत आत्महत्येचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांनाही स्वार्थासाठी का होईना नाईलाजाने त्याच्या कार्याचा गौरव करावा लागला त्यात त्याला भाजपत ओढूण पुढील निवडणुकीत त्याच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याचा भाजफ नेत्यांचा डावही होता पण ज्या माणसाने कोरोनात होणारे जनतेचे हाल पाहिले तो माणूस भाजपच्या गळाला लागणेच शक्य नव्हते।
मुंबई मनपाच्या निवडणुकीत परप्रांतीय जनतेची मते पदरात पाडण्यासाठी अनेक पक्षांनी त्याला पदाची आँफर देत आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न केला त्यात काँग्रेस ही होतीच म्हणा ।,पण जेथै सेलिब्रिटी च्या आत्महत्या वा एखाद्या अभिनेत्री च्या पाडण्यात आलेल्या अतिक्रमणावर राजकिरण करून मते मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात तेथे दोष तरी कुणाकुणाला देणार हाही प्रश्न च आहे म्हणा।पण भाजपला ना देता साथ सोनुने धरला आपचा हात मग काय ऐन उत्तर प्रदेशाची निवडणूक तोंडावर आलेली असतांना आणि भाजपला पराभवाची भिती वाटत असतांना राजकीय क्षेत्रात धुळवड ऊडाली नसती तरच नवल घडले असते संघ आणि भाजप खडबडून जागे झाले आणि केंद्र सरकारने आपले नेहमिचे विरोधकांना बदनाम करुन संपवण्यासाठी असलेले आपल्या शस्रागारातील ईडी नावाचे हत्यार बाहेर काढत सोनु सुदच्या चौकशीचे नाटक सुरु केले आमच्या सोबत या नाही तर संपवून टाकु ही भाजपची निती परत एकदा उघड झाली पण भाजपला हे माहित नाही की एखादे शस्र वारंवार वापरल्याने बोथट होते व निष्प्रभ होते न्यायालयात आताच महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजभळ आताच निर्दोष सुटलेत पण एव्हढी अक्कल भाजफ नेत्यिंना असती तर ते सत्तेपासून सत्तर वर्षे लांब राहिलेच नसते आता जनतेच्या लक्षातही आपण केलेली चूक लक्षात आली असतांनाही भाजपला ही सत्तेच्या गैरवापराची चुक महागातच जाणार आहे सत्य परेशान हो सकता है पर पराजीत नही याचा अनुभव भाजपला परत येउलच म्हणा।
पण काही का असेना सोनु सुद हा सारासार विचिर करणारा निस्वार्थी माणूस सध्यातरु वाटतो कारण ईतर पक्ष त्याला पायघड्या घालून आमंत्रित करत असतांना आणि भाजप मंत्रीपद देण्याची शक्यता असतांनाही ही सारी प्रलोभने नाकारत कमीतकमी जनहितवादी आणि भ्रष्टाचार मुक्त असलेल्या आपची साथ देणे हेच दर्शवत आहे । ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भाजप विरोधकांना मतप्रदर्शन करण्याची अंमळ घाईच असते !
सोनू ज्या वेळी गोर गरिबांना आपत्कालीन परिस्थिती मदत करत होता , त्या वेळी सोनू वर भाजप चा हितचिंतक असल्याचे आरोप केले गेले .
आता त्याची चौकशी झाली तर भाजप वर आरोप ! Happy
आणि अतिक्रमण करून बांधलेला परब मंत्र्यांचा बंगला अजून दिमाखात उभा आहे बरं का !