शशक पूर्ण करा - मायभेट- मंजूताई

Submitted by मंजूताई on 17 September, 2021 - 00:49

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

तिने नळ बंद करून आईला उचलून पलंगावर निजवले.  आईने लिहीलेलं मनोगत अखेर त्याला धाडलं.

कोळश्यांना माहितच नव्हतं
त्याच्या जवळ  आहे एक  हिरा
हिर्‍यालाही माहित नव्हतं
तो एक बहुमुल्य हिरा!
अचानक तिला  सापडला
त्याचबरोबर जोहरी
आणि एक कोंदणही
हिराही खुश झाला
तो ही आता चमकताना
गेला विसरुन ती  खाण
जिथे जन्मला!
ते  कोळशे स्वतः च्या
कोळशेपणावर दोष
देत  विसरुन गेले
त्यांच्यात असलेली
उर्जा .....
वाट बघताहेत
आठवेल एक दिवस
हिर्‍याला, जननी आणि
जन्मभुमी

तो आला आईच्या गळ्यात पडून हमहमसून रडू लागला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.