शशक पूर्ण करा - थंडावा - अमितव

Submitted by अमितव on 13 September, 2021 - 17:24

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
निरभ्र आकाशात मेघांची दाटी. वावटळ आणि जमिनीवरील पाचोळ्याने रिंगण घातलंय. त्यात माझे सगळे मित्र धुम पळून गेले. मी पडलो बोदल्या! धड पळता येईना म्हणून राहिलो मागे. या चक्रम मावसभावाबरोबर! आणि हे अचानक गार का वाटतंय? काळ्या सावल्या, त्याही लख्ख दुपारी? माझ्या डोक्यात वाढदिवसाला कुठले गेम्स घेऊ सोडून माझ्या बोरिंग आई-बाबांबद्दलचे त्याहुनही बोरिंग विचार गर्दी करताहेत? सावरा मला कोणी, मी पडणारे. हे भूत माझ्या मानगुटीवर बसायचं सोडून माझं चुंबन घेणारे वाटतंय. आणि हा अचानक प्रकाश कुठुन आला?
.
.
.
एक्स्पेक्टो पेट्रोनम!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे पग्यासाठी होते की काय Happy

Happy
awadali