शशक पूर्ण करा - भूक - अजय

Submitted by अजय on 13 September, 2021 - 03:00

९८ काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो
९९ काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो
१०० काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो

"सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे १०० वेळा वाक्यं लिहून झाली. मी माझी शिक्षा पुरी केली. मी परत तुम्ही शिकवत असताना , तुमचं लक्ष नसताना, गुपचुप डबा खाणार नाही. मधल्या सुट्टीतंच खाईन."

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

Lol

भारी Happy

भारी आहे आयडिया,

क्ष वेळा कॉपी पेस्ट करायचं स्क्रिप्ट पण शेअर केलं असतंत तर ....

Pages