अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते Medical Insurance options आहेत ?

Submitted by दीप on 12 September, 2021 - 17:35

अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते Medical Insurance options आहेत ?
ग्रीन कार्ड आहे आणि वय ७५+ असेल तर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माहिती थोडि त्रोटक आहे. ग्रीन कार्ड आहे, पण इथे नोकरी (टॅक्स पेयर फॉर १०+ इयर्स) केली आहे का? असल्यास मेडिकेरचे बेनिफिट्स (पार्ट ए/बी) मिळु शकतात. नसल्यास, काहि टर्मिनल केसेस मधे मदत मिळु शकते. तुमच्या स्टेटचे नियम एकदा पडताळुन बघा...

https://www.hhs.gov/answers/medicare-and-medicaid/index.html या ठिकाणी माहिती मिळावी. त्याशिवाय तुमच्या गावातील सिनियर सिटिझन सेंटरमधे संपर्क केल्यास तेथील स्वयंसेवक व्यवस्थित माहिती देतील. तिथे तुमच्या राज्यात काय मदत उपलब्ध आहे याची सविस्तर माहितीही मिळेल आणि योग्य फॉर्म्स भरायला मदतही करतील.

माहिती फारच त्रोटक दिली आहेत. जे. ना. सध्या कुठे आहेत? If I were in your shoes, इथे असतील तर त्यांच्या सध्याच्या इंश्युरंसकडे चौकशी केली असती. भारतात/इतरत्र असतील तर ट्रॅव्हल इंश्युरंस लागेल कारण मेडीकेयर किंवा अन्य कुठलाही कायमस्वरूपी इंश्युरंस घ्यायचा असेल तर त्याचा एनरोलमेंट पिरीयड बघावा लागेल. मार्ग सापडण्यासाठी खूप शुभेच्छा!!

तुमच्या काउंटीचे , टाउन्शिपचे फेसबूक ग्रुप्स असतील तर तिथे शोधा . आधीच्या पोस्टींमधे पण शोधा . बर्‍याच ठिकाणी सिनियर मंडळींना इंशुरंस, हेल्थकेयर, असिस्टेड लिव्हिग इत्यादी साठी मदत करणार्‍या सेवाभावी संस्था असतात . तिथे मदत मिळेल.

७५ प्लस हा हेल्थ इन्सुअरन्स वापरायचा काळ आहे. नवा करून घ्यायचे तर अवघड जाईल पण तुम्हला शुभेच्छा. ५५+ मध्ये करू न घ्यायचे वर लिहिले आहेत ते बरोबर आहे. मी पण कंपनी चा गृप इन्सुअरन्स असताना ही वेगळा घेउन ठेवला आहे. सध्या ट्रीटमेंट चालू आहे पण अजू न कुठेच काही क्लेम केले नाही कारण अनुभव नाही.

भारतातील कंपनीत चौकशी करा.

एल आय सी, बजाज अलायन्स एच डी एफ सी लाइफ साइट वर पॉलिसी बझार वर चेक करा. धीर सोडू नका.
ह्या सर्व वयस्कर लोकांच्या पॉलिसी आजार स्पेसिफीक असतात. कॅन्सर ला प्रीमि यम खूप हाय आहे. कोविड पॉलिसी पण एल आय सीची आली आहे.

तिथली सिस्टिम माहीत नाही हॉरर कथाच ऐकल्या वाचल्या आहेत. काळजी घ्या.