बंद पडलेले sim कार्ड, पैसा आणि समाधान

Submitted by Abhishek Sawant on 12 September, 2021 - 05:44

बंद पडलेले sim कार्ड, पैसा आणि समाधान

नमस्कार मी आहे एक मध्यमवर्गीय वयाची तब्बल अठ्ठावीस वर्षे पूर्ण केलेला तरुण, जेमतेम शिक्षण आणि अगदी उच्चभ्रू अशी नसली तरी सामान्य माणसाला हवा असतो तेवढा पगार असलेली नोकरी. तुम्हाला वाटत असेल मी माझा biodata का सांगतोय. तर आता जे मी पुढे लिहिणार आहे त्यासाठी ही माहिती असणे महत्वाचे आहे.
मी इथे सारख सारख येत नाही म्हणजे मी हंगामी लेखक आहे कधी कुणाशी भांडण झाल किवा कोणीच बोलायला नसेल किंवा आणि काहीच timepass नसेल किंवा अगदीच कुठली तर भयकथा वाचून लिहिण्याची खुमखुमी आली तर मी इथे येतो.
अर्थात माझा हा लेख पण खूप लोक वाचणार नाहीत पण जे वाचतील त्यांनी नक्की आपले मत मांडावे.

तर झाले असे की मी एका नामांकित sim कार्ड कंपनी ला माझा चालू मोबाईल नंबर पोर्ट केला पण झाले असे की आता हा नंबर चालू होण्याला लागणार आहेत दोन दिवस आणि माझ हे एकुलते एक सिम होत. म्हणजे ऐन गणपतीच्या सुट्टीत मला न मोबाईल वापरता दोन दिवस काढायचे आहेत. मग रात्री झोपताना हा लेख लिहायचा विचार आला. मी बॅचलर मध्ये राहतो आणि माझे roommates घरी गेले आहेत सुट्टी असल्याने मग तर काय अजून बोर. सगळी मोबाईल चि गॅलरी चाचपून झाली, जुने मेसेज वाचून झाले,सगळ्या sittings बघून झाल्या आत्ता शेवटी लिहिण्या कडे वळलो.
तर पैसा म्हणजेच सुख आहे का? असा प्रश्न मला लहानपणी पडत असे तसा आत्ता पण पडतो. म्हणजे बघा ना अंबानी त्याच्या करोडो रुपयांच्या महालात तेव्हढाच गाढ झोपेत असेल का जेवढा आम्ही जेव्हा गल्लीतील रस्त्यावर किंवा कोणाच्यातरी गच्चीवर जाऊन झोपायचो अगदी सूर्य डोक्यावर आला तरी जाग यायची नाही. मग तुम्ही म्हणाल हे तर झाल पण तो AC मध्ये त्याच्या उबदार गादीवर शांतपणे झोपत असेल पण झोप आम्हाला पण तेवढीच गाढ आणि साखर झोप म्हणतात ना तशी लागते ना.
तुम्ही म्हणाल माझी लायकी नाही अंबानी बरोबर तुलना करायची किंवा मी जेव्हा तेवढा पैसा कमवून दाखवेन तेव्हा मला बोलण्याचा अधिकार आहे.
मला असे वाट्ते की आपण पैसे हे यश मोजण्याचे मापदंड केलं आहे.
एका व्यक्तीकडे कमी पैसा असेल आणि तो सुखी असेल समाधानी असेल तर हा समाज त्याला फारशी किंमत देत नाही.
म्हणजे मला पैसा आवडत नाही किंवा मला कमवता येत नाही असे नाही.
कारण काही लोक पैश्याच्या आधारावर दुसर्‍याला कसे वागवावे हे ठरवतात ते मला कधीच आवडत नाही.

आणि मला पैसा कमवायचा आहे असे नाही पण मला त्याला येवढे महत्व द्यायचे नाही की मला वाईट वाटेल की माझ्याकडे अजून पैसा असला असता तर चांगले झाल असतं.
म्हणजे मला वाटत की ही जी जंगलात राहणारे आदिवासी लोक किवा खेड्यात राहणारे लोक हे सगळ्यात बेस्ट पण आपण शहरातील किंवा त्यांच्या पेक्षा श्रीमंत लोक जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना वाईट वाटत असेल की अरे पैसा असेल तर घरबसल्या जेवण येऊ शकते जंगलातून भटकायची गरजच नाही अश्या काही गोष्टी. तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मी एका छोट्या कंपनीत काम करत होतो माझ्याकडे स्कूटर होती मी स्कूटर कोठेही पार्क करून आरामात झोपत होतो आणि माझ्या कंपनीत सगळ्यांकडे अश्या काही गाड्या नव्हत्या. मग मी कंपनी बदलली एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये गेलो तिथे सगळ्यांच्या आलिशान गाड्या पाहून मला माझ्या स्कूटर वर जायला लाज वाटू लागली. मग मी पैसे वाचवून काटकसर करून एक कार घेतली. पण आता मी नीट झोपू शकत नाही कारण मी रात्री उठून एकदा तरी कार बघतोच आणि parking चा प्रश्न आहेच. आता ही गोष्ट बरोबर आहे की मी driving एन्जॉय केली घरचे पण खूप खुश झाले. पण मी स्कूटर वर त्या कंपनीत जास्त सुखी होतो आत्ता नाही.
म्हणजे मी negative आहे किवा मला प्रगती करायची नाही असे नाही पण मला या समाजाच्या मापदंड प्रमाणे सुखी आणि यशस्वी होऊन जगायचे नाहीये. मी हे इथे तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला पण सेम वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे इथे खूप अनुभवी आणि हुशार लोक आहेत त्यांचे विचार सुद्धा मला वाचायला मिळतील.
तसा मला इथे खूप प्रतिसाद मिळणार नाही पण जेवढे मिळतील ते मी मनापासून वाचेन
मला असे वाटते की परत इतिहासात जावे आणि ते बलुतेदार किवा त्याच्या पण मागे जंगलात शिकार करून राहणे अश्या पद्धतीचे आयुष्य जगावे अर्थातच त्याचे पण विशिष्ट challenges असतील किंवा दुरून डोंगर साजरे असे व्हायचे. पण मला प्रश्न पडतो मी आळशी आहे म्हणून मला असे विचार येतात का?? की मी माझ्या जॉब मध्ये सुखी नाहीय म्हणून मला असे विचार येतात. म्हणजे आत्ता मागे फिरणे शक्य नाही मध्यमवर्गीय लोक आपले career एकदाच निवडतात. पण असेही नाही की मला माझा जॉब आवडत नाही मी माझे काम आवडीने करतो. मी कधीच रविवार कधी येणार असा गळा काढला नाही तरीही मला असे विचार का येत असावेत? म्हणजे मी जेव्हा संन्यास घेतलेले साधू संत पाहतो किंवा गावोगावी फिरणारे वैरागी पाहतो तेव्हा मला वाटत की खरंच आपण जगतोय की समाजाने आखून दिलेल्या वाटांवर फक्त चालतोय एका मागून एक. चांगली नोकरी एक टुमदार बंगला त्याच्या पुढे उभी असणारी कार, branded कपडे. हेच जीवनाचे सार आहे का?? कधी कधी मी या चक्रात अडकलो नसतो किंवा माझ्या मागे कोणी नसते तर मी संन्यास घेतला असता. कोणत्यातरी NGO मध्ये जाऊन पडेल ते काम केल असते. पण समाजाने घातलेली आणखी एक भीती म्हातारा झाल्यावर कोण बघणार??? तेव्हा तर पैसा लागणारच. म्हणजे या चक्रातून सुटका नाहीच
चांगले जगायला आणि चांगले मरायला सुद्धा पैसाच लागतो.
असो आत्ता पाण्यात पडलोच आहे तर पोहण्याचा आनंद घ्यायचा जोपर्यंत थकून बुडत नाही किंवा जोपर्यंत खालून पाय धरून कोण बुडवत नाही तोपर्यंत.
शुद्धलेखनाच्या चुका दुर्लक्ष करण्यात याव्यात ही विनंती आणि कोल्हापूर जिल्ह्यातच जन्म घेतल्याने व्याकरणाच्या काही चुका असतील तर दुर्लक्ष करावे. कोल्हापुरी भाषेत लिहायला वाचायला चांगले नाही वाटत पण बोलायला ऐकायला लई भारी वाटतय.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, मनमोकळेपणे लिहिलंय.
असेच विचार बरेचदा मनात येतात.
पण या न त्या कारणास्तव मोठा पैसा खर्च होतोच.
ते पाहून लक्षात येतं की अजून कमवायला पाहिजे, म्हातारपणी हात पसरायची पाळी येऊ नये.
आणि पोहणे सुरू रहाते.

<<तर पैसा म्हणजेच सुख आहे का? >>

------ छान धागा/ विषय.
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत , व्यक्तीसापेक्ष आहे.

पैसा हेच काही सर्वस्व नाही... तो नसेल तर आयुष्य खडतर आहे. दैनंदिन जिवनांत पदोपदी पैसा लागतो उदा- अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, पुस्तके, वह्या, आरोग्य, अनेक आरोग्य विषयक चाचण्या, दवाखना... अगदी शेवटची क्रिया ( कोरोना काळात हजारो प्रेते नदी मधे सोडण्यात आली होती - आर्थिक कारण होते का अन्य मर्यादा ?) पैशाशिवाय कामे होत नाही.
सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही.

आता पैसा आहे म्हणजे सुख असेलच असेही नाही. थोडाफार पैसा आपल्यापुरता (माझ्यापुरतेच मर्यादित ठेवत आहे) आल्यावर आपल्याला थांबायचे आहे. गरज आणि मोह यांतला फरक कळाला आणि कुठे थांबायचे हे समजले तर आयुष्य सुखकारक होते. आपल्यापुरता एक टप्पा पार केल्यानंतर, आपल्याकडील रिसोर्सेस ( जे काही असेल ते) गरजू लोकांसोबत जरुर शेअर करावेत - त्यात मोठा आनंद आणि समाधान असते.

एकदा ती कार विकून टाकून रानात राहायला गेलात तर एक पुस्तक होईल "कार विकून टाकलेला वनवासी " त्या पुस्तकाच्या विक्रीतून खूप पैसे अकाउंटला जमा होत राहतील त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नसेल. कधी आजारी झालात तर इतर वनवासी तुम्हास दोन बांबूंना लावलेल्या झोळीतून ( ambulance) जवळच्या सरकारी दाक्तराकडे नेतील. तिथे तुम्हाला खाटेवर झोप येणार नाही आणि रानवारा आठवत राहील. सिमकार्डची चिंता नसेल.

तर पैसा म्हणजेच सुख आहे का?>>
तर पैसा सुखाची शक्यता तरी निर्माण करतो. किमान आपण सुखी आहे की नाही याचा निवांत विचार करायला वेळ देतो.

<< तर पैसा म्हणजेच सुख आहे का?>>
तर पैसा सुखाची शक्यता तरी निर्माण करतो. किमान आपण सुखी आहे की नाही याचा निवांत विचार करायला वेळ देतो. >>

----- माझे पैसे कुणी चोरले तर? आजच्या इलेक्ट्रॉनिक जगांत पासवर्ड हॅक करुन बँकेतून पैसे लंपास केले तर ?
पैसा आहे म्हणजे निवांत विचार करायला सवड असेलच नाही... चिंता खाणार.