शशक पूर्ण करा - खबरदार! - मानव पृथ्वीकर

Submitted by मानव पृथ्वीकर on 11 September, 2021 - 09:16

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

पाण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकु येतोय..

बाथरुममधला नळ तर परवाच बदलला. आणि बाथरुमचं दार आपोआप कसं उघडलं?

घरात कोणी शिरलंय? कसं शक्य आहे? दाराची कडी, बोल्ट्स नीट लावूनच झोपलोय.

तेवढ्यात खिडकीचा पडदा सरकल्याचा आवाज ! आपोआप! मला घाम फ़ुटतो.
खीडकीत दोन डोळे. जणु निखारेच! त्यांचा अंधुक प्रकाश चेहर्‍यावर, चेहरा कसला क..क... क.. कवटी आहे ती!
भ भ भ भूत!!.. खरच असतं???? डोळे माझ्यावरच रोखलेत. बोबडी वळली.

तावदानातून ते सरळ आत आलं आणि मानगूट धरुन मला अगदी चेंडु सारखं भिरकावून दिलं. मी समोरच्या भिंतीवर आपटलो मग फ़रशीवर. ते परत माझा गळा धरतंय..

"म.. म.. मारु नकोस मला!" कसे बसे शब्द बाहेर पडले.

त्याच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडला. मानगूट धरुन त्यानं परत चेंडु सारखं उचललं.
त्याच्या कापर्‍या आवाजाने माझी सगळी हाडं थरथरली.

“आज सोडतोय. पण खबरदार परत अमानवीय धाग्यावर चेष्टा केलीस तर!”

आणि ते अंतर्धान पावलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

Bhari लिहिले.

निघु गेलं...... निघून कराल का?

हेहे, मस्त कथा आहे Lol
पण मानव, शशक म्हणजे शत-शब्द-कथा ना? मग मोजुन १०० शब्द हवेत. तुमचे १८६ झालेत.

हो. आधी बराच प्रयत्न केला १०० मध्ये बसवायचा. पण जमले नाही. मग नाद सोडून दिला. शीर्षकात आधी शशक ऐवजी मुशक (मुक्त शब्द कथा) लिहायचा विचार होता, पण म्हटलं जाऊ दे.

आता अजून कमी केले शब्द, <१५०

सही आहे. Lol

असं कसं असं कसं मुशक चालणार?? Wink Lol
नाहीच चालणार का ? Wink
थोडा आगाऊपणा करत ही घ्या सुधारीत आवृत्ती Proud

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

पाणी ? नळ परवाच बदललाय..मग ? आणि हे दार उघडलं कसं ? लॉक तर केलतं !

चोर ???

खिडकीकडे बघितलं. तिचा पडदा सरकला न् दरदरून घाम फुटला. अंधारातून माझ्यावर रोखलेले दोन डोळे... जणू निखारेच ! त्यांच्या अंधूक उजेडात तो चेहरा साकारला. चेहरा ? कवटीय ती कवटी !

भू.. भूत ? खरंच असतं ?? भितीनं बोबडी वळली.

झप्पकन् ते आत आलं. मानगुटीला धरुन त्यानं मला भिरकावलं. भिंतीवर आदळलो... विव्हळलो.

ते पुन्हा जवळ येतंय...

"नाही.. नको..."

"खबरदार ! अमानवीयवर चेष्टा केलीस तर ? परत येईन !"
पुन्हा जमिनीवर आदळून ते चालतं झालं.

१००

हाडं खिळखिळी झालेली. प्रचंड वेदना होत होत्या. इतक्यात काहितरी आठवलं आणि त्याही अवस्थेत धडपडून उठत फोन हाती घेतला.
बोकलतांना सावध करायला हवं ! Proud
(हे १००, संयोजकांनी दिलेले २२ शब्द सोडून.)

मस्त. Proud
आशिकांचे बोकलत आगमन पण मस्त आहे. Proud

Pages