शशक पूर्ण करा-संपल सगळ-SharmiaR

Submitted by शर्मिला. on 11 September, 2021 - 01:55

शशक पूर्ण करा-संपल सगळ-SharmiaR.

‘काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....’

अमु, उठ लवकर. पाणी आलंय. चटकन आंघोळ वगैरे आटपून घे आणि देवीला जाऊन नमस्कार करून ये.”

उठावच लागेल आता. काय उपयोग देवीला जाऊन? माझा आजचा निकाल देवी बदलणार नाहीय. शेवटचे चार पेपर्स दिलेच नाहीत मी. कुठल्या तोंडाने सांगू आता घरात हे? डोक्यात काही जातच नव्हतं. की घरी परत यायलाच नको?.. .....कुठे जायचं मग? मिळेल ती गाडी पकडून निघून जावं का कुठे?..चिठ्ठी लिहून ठेवावी का?..... परत घरात तोंड दाखवायलाच नको.......गाडी .. की रेल्वे रूळ .. .....

Group content visibility: 
Use group defaults

जमलीय.