शशक पूर्ण करा - बाहेरचं जग - अमितव

Submitted by अमितव on 10 September, 2021 - 10:34

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

इतका वेळ फक्त पाणी गळत होतं, पण आता त्या दरवाजाबाहेर फारच गडबड जाणवते आहे. कोणी डोकं ओढतंय. तिकडुन कोणी पाय ओढताहेत! का? इतके दिवस इथे रहातोय, हे माझंही घर आहेच की! अगदी हक्कांच नसलं तरी वहिवाटीचा तरी हक्क आहेच ना? या चार भिंतीत जे काय मिळतंय ते गपगुमान खातोय. भिंती तरी कसल्या? खुराडं आहे नुसतं. मला खूप भिती वाटते आहे. या दाराबाहेर कोण असेल? इतके दिवस हेच विश्व समजत होतो. भितीने हृदयाची ठोके वाढतात ना? माझे तर कमी होत आहेत वाटतंय. बाहेर जावंच लागेल असं दिसतंय.
.
.
हुSSश्य!
मोकळा श्वास!
काही दिसत नाहीये, पण मोकळं वाटतंय. शेपटी कापू नका!
.
.
टॅSSS हॅSSS

<दुसरा शेवट>

सापडला उंदीर!

Group content visibility: 
Use group defaults

मस्त Lol

दोन्ही शेवट आवडले Lol
( मोकळा श्वास वरून मला अजून एक शेवट आठवला पण तो यक आहे Lol शिंकरलेलं नाक)

सगळ्यांना धन्यवाद!
भारी शेवट धनुडी. हे आधी का नाही सुचलं! :कपाळावर हात: Lol

Lol

Lol

छान

Lol Lol

मस्त Lol टू-इन-वन!

(पहिल्या शेवटाचा वाचताना अंदाज आला होता.)