शशक पूर्ण करा - वाढदिवस -अंजली_१२

Submitted by अंजली_१२ on 10 September, 2021 - 10:24

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

मनाचा हिय्या करून आत पाऊल टाकले तरिही काही कोणाचा मागमूस नाही.
चिडीचूप शांतता.
माझ्याच श्वासांचे आवाज मला ऐकू येत होते.
एकेक पाऊल जपून टाकत होते ना जाणो काही पायाखाली येईल. अचानक एका बेसावध क्षणी लाईट लागले आणि पडद्याच्या मागून मित्रमैत्रिणींचे टोळके बाहेर आले "हॅप्पी बर्थडे टू यू " करत ! केवढं जोरात धडधडलं यार!

पण थांबा मी आजच तर इकडे राहायला आलीये आणि दुसरी किल्ली पण बनवली नाही. मग हे सगळे कोण आणि घरात कसे घुसले ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

छान.

मस्त. Happy

छानच आहे. .
पण नावावरुन अंदाज येतोय. . नाव बदलता येईल का?