शशक पूर्ण करा - देशभक्ती - सामो

Submitted by सामो on 10 September, 2021 - 10:20

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
चिनी अधिकारी प्रवेशतो- "अजुनी वेळ गेलेली नाही. अणूबॉम्बचे रहस्य सांग. आम्ही तुझी मुक्तता करु. अन्यथा या नीरव शांततेत काही वेळातच, प्रत्येक ठिबकणार्‍या थेंबाचा आवाज तुला घणाघाती वाटत जाईल. तुला वेड लागेल वेड. अरे वेड्या एकदा तसे झाले की कुठली मातृभूमी आणि कुठले देशप्रेम! "
"चालता हो. प्राण गेला तरी मी ते रहस्य तुमच्या हाती पडू देणार नाही. जय हिंद!"
हताश चीनी अधिकारी "अजुन एक कडवा भारतिय अधिकारी. काय ही निस्सीम देशभक्ती. आम्ही असे कधीच होउ शकत नाही.”

शब्द संख्या - १००

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र्र्र!!! फारच भिकार निघाली की ही शशक. लोक हो टीका करा. टीका केली म्हणुन कोणी फासावर देणार नाही की मी रागवणार नाही.

हां अनुल्लेखाने मारलत तर मात्र Sad

हा वेगळाच पॉईंट ऑफ व्ह्यू. चांगला प्रयत्न.
अग सामो , इतकं काय काय आहे ना गणेशोत्सवात कि काय काय आणि किती वाचू? कुठे वाचू ते समजत नाहीये. खजिन्याचे पोतं उघडल्यासारखं.
वाचतील लोकं गोष्ट.

तू ग्रूप चेंज का केलास, वापस डालो. उपक्रम आहे स्पर्धा नाही आणि असती तरी काय , सहभागाचा आनंद महत्त्वाचा. Happy

>>"चालता हो. प्राण गेला तरी मी ते रहस्य तुमच्या हाती पडू देणार नाही. जय हिंद!"
हताश चीनी अधिकारी "अजुन एक कडवा भारतिय अधिकारी. काय ही निस्सीम देशभक्ती. आम्ही असे कधीच होउ शकत नाही.”>>

एवढे अत्याचार सहन करुन मोडकळीला आलेला तो फक्त म्हणाला, "जय हिंद".
पाण्याचे थेंब आता त्याच्या मस्तकावर पडत होते. प्रत्येक थेंबाबरोबर तो मनात म्हणत होता "जय हिंद" आणि कठोर चिनी अजुनच हताश होत होता.

>>>>पाण्याचे थेंब आता त्याच्या मस्तकावर पडत होते. प्रत्येक थेंबाबरोबर तो मनात म्हणत होता "जय हिंद" आणि कठोर चिनी अजुनच हताश होत होता.
आवडले.
-------------------------------------
अत्यंत शांततेमध्ये एकेक थेंब पाण्याचा फक्त पडत ठेवतात. आणि थोड्या वेळात त्या व्यक्तीच्या कानठळ्या बसू लागतात - अशी टॉर्चर पद्धत मी वाचलेली होती.

अत्यंत शांततेमध्ये एकेक थेंब पाण्याचा फक्त पडत ठेवतात. आणि थोड्या वेळात त्या व्यक्तीच्या कानठळ्या बसू लागतात>>> अशी टॉर्चर पध्दत मी सिनेमात पाहिली आहे

ओह ओके. मीही मग कदाचित सिनेमातच पाहीली असेन Happy सोर्स आठवत नाही पण फार नॉव्हेल पद्धत वाटलेली.

सामो - हो, मी पण ती पद्धत बघितली होती आणि कपाळावर थेंब थेंब पडत रहाणे ही त्याची पुढची पायरी!

>>>>>>>>>आणि कपाळावर थेंब थेंब पडत रहाणे ही त्याची पुढची पायरी!
ओह ओके ते माहीत नव्हते. बाप रे काय अघोरीपणा आहे.

ग्रूप चेंज का केलास, वापस डालो. उपक्रम आहे स्पर्धा नाही आणि असती तरी काय , सहभागाचा आनंद महत्त्वाचा. Happy>>>>+११

हां आत्ता कळलं की ग्रुप आहे 'मायबोली गणेशोत्सव २०२१' नावाचा Sad
रामायण ऐकल्यानंतर मग 'रामाची, सीता कोण' हे विचारण्यासारखेच झालेले आहे. पण आता नवीन शशक जर टाकलं तर ते या ग्रूप मध्ये टाकेन.

मस्त! पाण्याच्या आवाजाच्या सूचनेची सांगड टॉर्चरशी घातलेली इन्टरेस्टिंग वाटली.
ते ‘आम्ही असे होऊ शकत नाही’ हे मात्र पटलं नाही, म्हणजे सगळ्याच देशांचे सैनिक कडवे देशभक्त असतीलच ना?

सामो, मला पण आपले सैनिक चांगले/ शूर आणि शत्रूचे पळपुटे हे फारच नाइव्ह वाटलं. आपले सैनिकी बरेच चित्रपट म्हणूनच फार सोपे आणि खोटे वाटतात.
वर चौकट राजाने सांगितलेला शेवट जास्त आवडला. Positive आणि दुसऱ्याची रेघ छोटी न करता आपली मोठी दाखवणारा.

सी आय ए चे वॉटर बोर्डिन्ग बद्दल वाचून घ्या न जरा. किंवा ग्वांटानामो बे मधील प्रकार.