शशक पुर्ण करा - रिटर्न तिकीट - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2021 - 03:54

रिटर्न तिकीट

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

स्पॉटलाईट मारल्यासारखा एक ऊजेड आत येतो.

"कोण?" तो चपापून विचारतो.

"मी चित्रगुप्त?" ऊजेडातून आवाज येतो.

"कोण चित्रगुप्त? मी कुठे आहे? आणि ईथली लाईट का गेलीय?

"मी पापपुण्याचा हिशोब करणारा चित्रगुप्त"

तो चक्रावतो.
"म्हणजे? कालच्या अपघातात मी मेलो??
आता मी स्वर्गात जाणार की नरकात?"

"तेच ठरवायला आलोय.
बर्रं, आत नळ चालू आहे.." चित्रगुप्त विचारतो.

"असेना.. मी नाही चालू केला"

"पण बंद तर करू शकला असतास?"
ईतके बोलून चित्रगुप्त अंतर्धान पावतो.

आणि दुसऱ्याच क्षणाला पृथ्वीतलावर आणखी एक मानव जन्माला येतो.

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान !

धन्यवाद

च्रप्स, तिथला म्युन्सिपालटीवाला चित्रगुप्तच होता. तिथले पाणी वाया न जाता पुन्हा पुन्हा वापरले जाते म्हणून ते अक्षय असते, कधीच संपत नाही. कधीच टंचाई निर्माण होत नाही. स्वर्ग म्हणतात तो हाच.
ज्या लोकांना हे जमत नाही त्यांना स्वर्गात एंट्री नाही. पुन्हा पृथ्वीचे रिटर्न तिकीट. बाकी नरक वगैरे अंधश्रद्धा आहेत. अशी बेपर्वाह लोकं जिथे जातील त्या जागेला नरक बनवायची क्षमता राखतात.

मस्त कल्पना.
म्हणजे आपण सगळे रिटन तिकीटवाले आहोत.

छान

म्हणजे आपण सगळे रिटन तिकीटवाले आहोत
>>>>
हो, पण पुन्हा रिटर्न तिकीट मिळू नये याची खबरदारी आपण या जन्मात घेऊ शकतो Happy

छान..