थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा

Submitted by एम.कर्णिक on 25 May, 2009 - 02:52

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा
आणि ना थांबायचे तर वळण हे टाळून जा

बांधलेल्या चौथर्‍याला कर हळूसा स्पर्श तू
अन्यथा सार्‍या स्मृतीना तू पुरे जाळून जा

चौथर्‍याच्या खालती ती जागते तव चिंतनी
जोजवाया चौथर्‍यावर सावली ढाळून जा

जोवरी जगली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली
तू समजण्याला उशिर केलास ते सांगून जा

मी इथे साक्षीस, ज्याने जीव तिजवर जडविला
मूक माझ्या प्रीतिवरती मौन, रे, पाळून जा

गुलमोहर: 

मुकुंदजी, तुम्हाला सलाम! एकेक ओळ ओले करणारी आहे.
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

.................................................................................................................

जोवरी जगली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली
तू समजण्याला उशिर केलास ते बोलून जा>>>

सुरेख, क्या बात है !

***********************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्रीयुत केशवसुमार)

बांधलेल्या चौथर्‍याला कर हळूसा स्पर्श तू
अन्यथा सार्‍या स्मृतीना तू पुरे जाळून जा

एक नंबर!!!
कल्प्

''थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा
आणि ना थांबायचे तर वळण हे टाळून जा''...............इथेच जिंकले तुम्ही...............खुप छान......!!!!

सुहास शिन्दे

सुंदर!

मला हे शेर, कडवी काय सांगतील, कुठच्या वृत्तात आहेत वै. माहीत नाही.. पण ही रचना मात्र भावनेच्या दृष्टीने सुरेख जमलीये. Happy

क्या बात है!!
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी