हस्तकला उपक्रम : आकारा येई बाप्पा !

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:07

*हस्तकला उपक्रम - १ :

* विषय : "आकारा येई बाप्पा"

विविध आकारातून प्रकटलेला, असंख्य रंगात रंगलेला आपला बाप्पा. त्याचे गोजिरवाणे रूप सर्वांचे मन मोहून टाकते.

मायबोलीकरांनो, तुमच्यातील कलाकारी दाखवायला यावर्षीही उत्सुक आहात ना?

मग चला, या उपक्रमा अंतर्गत सुचवलेल्या साहित्याचा वापर करून, आपल्या मनातील बाप्पाचे साजिरे रूप साकारायला सज्ज व्हा!

साहित्य :
१. धान्य, कडधान्य वगैरे
२. भाजी
३. फळे
४. पाने, फुले वगैरे
५. सुकामेवा
६. शालोपयोगी वस्तू,
७. स्वयंपाक घरातील वस्तू किंवा भांडी,
८. शिवणकाम, सजावट साहित्य,
९. खेळणी,
१०. भौगोलिक आकृती यांचा योग्य वापर करून गणपती साकारणे.
*** वरील दिलेल्या साहित्यातील एकच प्रकार एका वेळी वापरावा परंतु त्या वर्गातील इतर प्रकार वापरण्यास परवानगी आहे, उदा. -धान्य - वेगवेगळी चालतील पण फक्त धान्ये वापरुन बाप्पा साकारायचा आहे.

(अ) लहान गट : वय वर्ष ५ ते १५ (ब) मोठा गट : १५ वर्षापुढील

धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
मोठा गट - आकारा येई बाप्पा- मायबोली आयडी.
छोटा गट -आकारा येई बाप्पा- तुमचा मायबोली आयडी.- छोट्यांचे नाव

प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी

लक्षात असुद्यात, हा उपक्रम आहे स्पर्धा नाही !!

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो तुमच्या घरातील वस्तू /साहित्य वाट बघतायत, त्यांना कधी बाप्पाचा आकार येतो त्याची. चला मग त्यांना लवकरच बाप्पाचे रूप देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करा.