पाककृती स्पर्धा २ : पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:02
spinach cream

नमस्कार मायबोलीकरहो!

गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची!
दरवर्षी संयोजक मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात.
अनेक शंका-कुशंका, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल!
पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते.

आणि का नाही होणार..? मायबोली वरचा गणेशोत्सव हा प्रत्येकाला आपल्याच घरचे कार्य आहे इतका आपलासा वाटतो

यंदाही आम्ही प्रयत्न केलाय थोडी अवघड, थोडी सोपी अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचा!

चला तर मग, बघूया काय आहेत यंदाचे विषय आणि अर्थातच नियम!

पाककृती विषय क्र २ - पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ

नियम
१. तयार पदार्थात पालेभजीचा वापर सढळ हस्ते केलेला असावा म्हणजेच इतर घटकांच्या तुलनेत पालेभाजी चे प्रमाण जास्त असावे.
२. विविध पालेभाज्या एका पदार्थात वापरलेल्या असल्या तरी चालतील.
३. पदार्थ पूर्ण शाकाहारी असावा.
४. साहित्य, पदार्थ बनवताना ची एखादी स्टेप, आणि पूर्ण झालेला पदार्थ अशी किमान 3 प्रकाशचित्रे देणे आवश्यक आहे.
५. साहित्याचे प्रमाण आवश्यक आहे.
६. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
७. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
८. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ रात्री १२ पर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाकंभरी देवीचे ध्यान
-----------------------------------
शान्ता शारदचन्द्रसुन्दरमुखी शाल्यन्नभोज्यप्रिया
शाकैः पालितविष्टपा शतदृशा शाकोल्लसद्विग्रहा ।
श्यामाङ्गी शरणागतार्तिशमनी शक्रादिभिः शंसिता
शङ्कर्यष्टफलप्रदा भगवती शाकम्भरी पातु माम् ॥

@आरारा,
नियमात बदल केला आहे. पदार्थ शाकाहारी असावा. पालक चिकन चालणार नाही.