खेळ : प्रकाशचित्रांचा झब्बू

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 21:58
prakashchitrancha zabbu

नमस्कार मायबोलीकर!
सर्वांचे स्वागत, 'प्रकाशचित्रांचा झब्बू' या आपल्या सर्वांच्या आवडत्या उपक्रमात !

या वर्षी रोज एक नवीन विषय दिला जाईल आणि मग येउद्यात प्रत्येकाच्या आठवणीतले, मनातले क्षण बंदिस्त करून ठेवलेले प्रकाशचित्र.

तर तो खजिना खुला करून व्हा सामील,

आपल्या सर्वांच्या सहभागाने दणक्यात साजरा करूयात
मायबोली गणेशोत्सव २०२१..........

'एकातल्या विविधतेचा' आनंद घेण्यासाठी सज्ज आहात का मग?

सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोलीकर' असायला हवे.
३. रोज एक नवीन छायाचित्र विषय झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला तर मग, सुसंगत फोटो शोधायला घ्या आणि द्या झब्बू !!!

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा खेळ माझ्या बुद्धीला चालना देणारा झाला आहे. विषयानुरूप आपल्याकडे कोणते फोटो आहेत , एखाद्या विषयासाठी आपला कोणता वेगळा फोटो इथे add करू शकतो हे विचार करणे मग सगळ्या फोटोमधून तो शोधणे हे सगळं माझ्यासाठी बुद्धीला , समरणशक्तीला चालना देणार आहे. त्यासाठी थॅंक्यु संयोजक.