लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 21:50

sanyojak-2021- maze covid lasikaran.jpg

नमस्कार मंडळी, सालाबादप्रमाणे ह्यावर्षीदेखील तुमची गणपती आगमनाची जोरदार तयारी सुरू असेलच. कितीही संकटे आली तरी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत आपण मागील वर्षीही केले आणि या वर्षीही करणार आहोतच. आपला लाडका बाप्पा आहेच ना आपला सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील!

गत वर्षात संपूर्ण जगात अचानकपणे महारोगाने थैमान घातले. कधी झाली नव्हती इतकी जिवीतहानी झाली आणि दुर्दैवाने अजूनही सुरूच आहे.
हुशार मनुष्यप्राण्याने या रोगावर मात करण्यासाठी औषधे आणि लस शोधलीच आणि अनेकांचे प्राण वाचविले.
मंडळी, जगभरात तुम्ही कोठेही असाल तरी तुमचे लसीकरण झाले असेलच किंवा काही जण प्रतिक्षेत सुद्धा असतील.

ह्याच लसीकरणचा तुमचा किंवा इतरांचा गंभीर किंवा मजेशीर अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करूयात.

चला तर मग, पटापट लिहायला घ्या आणि हो लक्षात असुद्या, हि स्पर्धा आहे.

स्पर्धा नियमावली :
१. प्रवेशिकेतील लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
२. लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३. स्पर्धेच्या प्रवेशिका १० सप्टेंबर २०२१ पासून पाठवू शकता. (IST)
४. प्रत्येक आयडी फक्त १ प्रवेशिका देऊ शकेल.
५. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण - {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
६. स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.
७. लेखन पाठविण्याची शेवटची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ .
८. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वेळ मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लसीकरणाचे डोस दोन पण प्रवेशिका एक... बहुत नाइंसाफी है............ सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!!

इथे सगळ्यात जास्त डोकं चालवावे लागेल Wink कारण वेळ घेतली, गेलो, लस घेतली परत आलो. फोटो ही घेतला नाही. इतकं दोन ओळी वर्णन लिहावं लागेल नाहीतर! Happy
पण छान आहे हा विषय पण!

व्यत्यय यांनी उगाच आधी लिहिला अनुभव म्हणायचा.

जिद्दु हे वाचले नाही का?
:ह्याच लसीकरणचा तुमचा किंवा इतरांचा गंभीर किंवा मजेशीर अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करूयात. >>
इतरांचाही अनुभव नसेल तर वेळ आहे अजून कुणाला तरी धरून घेऊन जा लसीकरणाला, मस्त अनुभव लिहिता येईल.

तुमचा किंवा इतरांचा
>>>>
याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. कारण माझा स्वत:चा अनुभव माझी नेहमीची धांदल वगळता चारचौघांसारखा सरळसोट होता. आईचा आणि मुलीचा मात्र फारच नाट्यपुर्ण घडामोडींचा होता. मी तेच विचार करत होतो की आता आपल्या नावावर त्यांचा कसा खपवायचा. पण आता प्रश्न मिटला. त्यांचाच किस्सा लिहितो Happy

स्पर्धेची प्रवेशिका कशी पाठवावी या बद्दल कृपया सविस्तर मार्गदशन करावे. (पूर्वी कधी पाठवलेली नाही.)

१) या ग्रूपचे सभासद व्हा (मायबोली गणेशोत्सव २०२१)
२) ग्रूपमधे नवीन धागा सुरु करा
३) धाग्याला शीर्षक पुढील प्रकारे द्या -
"लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण - {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
४) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्या
५) प्रकाशित करा.