Cryptocurrency / USDT Daily Trading बाबत ...

Submitted by भ्रमर on 31 August, 2021 - 05:05

नमस्कार
काही 'तू नळी ' चॅनल पाहताना , Cryptocurrency अथवा USDT ह्यांचे daily trading करून दिवसाला 1500/2000 पर्यंत कमावता येतात असे बरेच व्हीडेओ पाहण्यात आले. एक कुतूहल म्हणून मायबोलीकरांना विचारावेसे वाटते की आपल्यापैकी कोणी अशा प्रकारचे ट्रेडिंग करून पहिले आहे का? video मध्ये केला गेलेला दावा कितपत सत्य आहे ?

धन्यवाद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cryptocurrency अथवा USDT ह्यांचे daily trading करून दिवसाला 1500/2000 पर्यंत कमावता येतात असे बरेच व्हीडेओ पाहण्यात आले.
>>
सर्व क्रिप्टोकरन्सी व USDT एकत्र करुन प्रश्न विचारल्यामुळे एकच थेट असे उत्तर देता येत नाही.
अलिकडच्या काळात USDT बद्दल ईटरनेटवर नकारात्मक चर्चा वाचनात आली.

कोणत्याही क्रिप्टोकरन्सि ट्रेडींग्ला कुठल्याही प्रकारचे सरकारी / कायद्याने बंधणकारक असे काहीच पाठबळ नाही.

एकच मध्यवर्ती असे सरकारच्या अखत्यारीत नसलेले किंवा एखाद्या बड्या उद्योगपती/संस्था यांच्या प्रभावाखाली नसलेले चलन - हा क्रिप्टोकरन्सीचा एक खूप महत्वाचा गुणधर्म होता - असे अनेकांचे मत आतापर्यंत होते.
पण अलिकडे, योग्य तेवढे पैसे असणा-या व अचूक जनसंर्पक करुन प्रतिमा तयार करण्यात हातोटी असणा-या विशिष्ट लोकांनी हीच मध्यवर्ती नियंत्रण नसलेली क्रिप्टो manipulate करुन दाखवली.

पूर्ण तपशीलात अभ्यास करुनच हे व्यवहार करावेत.
नवीन काहीतरी शिकायला मिळणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा माग ठेवणे व त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे या सारखे उद्देश ठेवुन व १००% बुडाले तरी काहीही फरक पडणार नाही एवढे पैसे टाकुन ट्रेडींग करावे.

आपली तोटा सहन करायची मर्यादा व किती वेळ अभ्यासाला देणे झेपेल हे बघुन व्यवहार केल्यास त्यानुसार समाधानकार निकाल मिळू शकतील.
.

ऐकले आहे. पण वापरण्याचा अनुभव नाही.
इतर ऑनलाईन आर्थीक व्यवहारांसाठी घेतो तशी काळजी घेऊन, ही साईट किंवा यासारख्या ईतर साईट्स वापरुन ट्रेडींग करु शकतो.

पण क्रिप्टोकरन्सिच्या बाबतीत, ट्रेडींग झाल्यावर आपले कॉईन्स कोणत्याही exchange वर न ठेवता स्वतःच्या ताब्यातील wallet मधे वेगळे खाते बनवुन ठेवणे जास्त सुरक्षीत आहे. अनेक hardware wallet सुद्धा मिळतात जे तुलनेने जास्त सुरक्षीत असतात.

पूर्वी काही प्रसिद्ध exchanges/trading platform होते जे चांगले होते / प्रसिद्ध होते पण संगणक सुरक्षेचे अगदी प्राथमीक निकषही न पाळल्यामुळे तिथले सगळे कॉईन्स चोरीला गेले अशा काही बातम्या वाचल्या आहेत.

Sharing some news articles as it is. They are not my opinion. They are not investment advice.
---

Anyone Seen Tether’s Billions?
A wild search for the U.S. dollars supposedly backing the stablecoin at the center of the global cryptocurrency trade—and in the crosshairs of U.S. regulators and prosecutors
https://www.bloomberg.com/news/features/2021-10-07/crypto-mystery-where-...

https://news.ycombinator.com/item?id=25788409

The Bit Short: Inside Crypto’s Doomsday Machine
https://crypto-anonymous-2021.medium.com/the-bit-short-inside-cryptos-do...

Tether’s $69 Billion Mystery: Five Takeaways From Bloomberg Businessweek’s Cover Story
https://www.bloomberg.com/news/articles/2021-10-07/can-you-trust-stablec...

ED freezes bank accounts of WazirX worth Rs 64.67 crore
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/tech/technology/ed-freezes-bank-acc...

After ED probe, Binance reveals it never owned WazirX
The acquisition of WazirX by Binance was understood to be closed back in 2019 after Binance had posted a blog announcing the same
https://www.moneycontrol.com/news/business/cryptocurrency/after-ed-probe...

ED freezes Rs 64.7 crore in bank accounts of crypto exchange WazirX
The Enforcement Directorate is carrying out a money laundering investigation against cryptocurrency exchange WazirX.
https://www.indiatoday.in/india/story/ed-conducts-searches-on-director-o...

ED freezes Rs 64.7 crore in bank accounts of crypto exchange WazirX >>> सरकरचे डोके फिरलेले आहे. मुर्ख सरकार.

ED ची कारवाइ आहे म्हणजे नक्किच वजीर एक्स मध्ये गदबडी नाहि आहे !