प्राण्यांशी (कुत्र्यांशी) संवाद कसा साधावा यावर आधारित पुस्तक, प्राणीमित्र संस्था यांबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by सुर्या--- on 23 August, 2021 - 03:26

प्राण्यांशी (कुत्र्यांशी) संवाद कसा साधावा यावर आधारित पुस्तक, प्राणीमित्र संस्था यांबद्दल माहिती हवी आहे.
ते आपणास काही सांगू इच्छित असतील तर कसे ओळखावे. आपल्याकडून त्यांना काही हवे असेल, त्यांना काही दुखत खुपत असेल, काही त्रास होत असेल, आनंद होत असेल, काही आवडत असेल अथवा नसेल या आणि अश्या अनेक गोष्टी माहित करून पाळीव अथवा इतर प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी काही उपाय / शिक्षण / पद्धती असल्यास आपापल्या अनुभवासहित माहिती मिळाल्यास अतिउत्तम.

Group content visibility: 
Use group defaults

आमचा सिम्बा (जर्मन शेफर्ड) आता एक वर्षाचा आहे. मागील आठवड्या मध्ये तो खूप आजारी होता. त्याला मागील ३ महिन्यांपासून दर महिन्याला फिट येते. एकदा आली कि पुन्हा ४ तासात दुसऱ्यांदा येते. पण यावेळेस ६ वेळ फिट आली. आणि खूपच त्रस्थ, अस्वस्थ होता. त्याला सलाइन लावल्यानंतर १ तासभर झोपला आणि त्यानंतर रात्री १२.३० ते ६.३० पर्यंत घरभर तो फेऱ्या मारतच होता. त्याच दुखणं आणि अस्वस्थ राहणं आम्हाला पाहवत नव्हतं. आता ठीक आहे पण पुन्हा असं काही होऊ नये यासाठी अश्या संवाद शिक्षणाची गरज वाटत आहे. कृपया मदत करावी.

@Sparkle---धन्यवाद. बघतो.

@Srd---आंघोळ घालू नये म्हणून तसं करतो का??
( माझ्याकडे कुत्रा नाही.)---नाही, तस काही नाही. त्याला काहीतरी त्रास होत होता, ज्याचं आकलन आम्हाला करता येत नव्हते. आम्ही वेगवेगळे उपाय केले. जसे त्याच पोट साफ व्हावं, त्याने व्यवस्थित वेळेवर खावं, औषध वेळेत आणि योग्य प्रमाणात पोटात जावीत, शांत झोप लागावी, आणि कुठल्याही प्रकारच्या आवाजाने तो डिस्टर्ब नाही व्हावा. तसेच ताण कमी व्हावा यासाठी जास्त अंगमेहनत नाही होणार अश्या प्रकारे त्याच्याशी खेळात राहिलो आणि त्याच्याशी बोलत राहिलो. ८-१० दिवस आम्हाला मेहनत घ्यावी लागली जास्तच. पण आता त्यातून तो सावरला आहे.

@देवकी---व्हेट ना दाखवून औषधोपचार सुरू करा.---हो. उपचार चालू आहेत.

जर्मन शेफर्ड क्रॉस आहे कि प्युअर ब्लडलाईन आहे ? क्रॉस असेल तर काळजीचं कारण नसतं. प्युअर असेल तर तो या हवामानाला जुळवून घेताना असे होऊ शकते. इथून आणला आहे त्यांनाही विचारा. डॉक्टरांनाही विचारा. तीव्र उन्हं, दिवाळीचे फटाके याचा त्यांना त्रास होतो.

@ शांत माणूस... जर्मन शेफर्ड क्रॉस आहे कि प्युअर ब्लडलाईन आहे ?
---प्युअर आहे. हवामान बदलाचा त्रास होतो. TEMPERATURE वाढल्यावर त्याला ताप येतो आणि ताप असल्यावर तो जेवण बंद करतो. आणि बऱ्याचदा अश्या वेळेसच फिट येते. आणखी ऑबसेर्व्हशन म्हणजे जेवणातील अंडी आणि चिकन चे प्रमाण जास्त असल्यावर त्याला ऍसिडिटी चा त्रास होतो आणि मग जेवण बंद करतो. हे माझे साधारण ऑबसेर्व्हशन आहे. याव्यतिरिक्त हि काही असू शकेल का? कुणाचे अनुभव असतील तर कळू शकतील.