Submitted by अभिषेक९ on 17 August, 2021 - 03:18
आजचे पान कोरे-करकरीत आहे,
अगदी पांढरे शुभ्र ....
इतके की पेन टेकवायची पण भय...
कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
मागची पाने गच्च आहेत
आहेत असंख्य रंग
लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट..
आहेत अनेक अक्षरे
काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली...
आहेत आकडे पण
बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे... अगदी मागच्याच पानावर
पुढची पाने खुणावत आहेत, आपल्या स्वच्छ रंगानी
"टेकव पेन, निर्मितीचा आनंद दे मला,
नष्ट व्हायच्या आधी बहरून टाक मला,
रंगव असंख्य चित्रातून, अर्थ दे मला भारदस्त शब्दातून..
मग मीच दाखवील तुला उद्याचा उष:काळ, माझ्यातूनच ..."
पण आजचे पान काही पुढे सरकेना
पांढऱ्या शिवाय दुसरा रंग दाखवेन
आणि पेन काही केल्या टेकेना...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा