झी-मराठी : ती परत आलीये

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:08

आज रात्री १०.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

जेष्ठ कलावंत विजय कदम यांची मध्यवर्ती भूमिका असावी असं ट्रेलर वरून वाटतंय.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

या मालिकेचा ट्रेलर बघितला आताच. हे भूत म्हणजे तेच आहे ना कोरिया कि जपान मधलं. या भुताचा जबडा जोकर सारखा कट केलेला असतो. हे भूत एकट्या दुकट्या माणसाच्या मागे लागतं. आणि त्याला पकडून विचारातं मी कशी दिसते. यावर तो माणूस म्हणाला कि तू छान दिसतेस कि हे भूत खुश होतं आणि माणसाला बोलतं थांब तुला पण माझ्यासारखं छान करते आणि त्याचा जबडा कापून टाकतं. माणूस बोलला बेकार दिसतेस कि राग येऊन जबडा कापून टाकतं.

पहिलाच एपिसोड सपक वाटला.

स्वामिनीमधल्या राघोबादादांच्या बायकोचे काम केलेली स्त्री कलाकार या सिरीयलमध्ये सायलीच्या भुमिकेत आहे. विजय कदमचे काम भयानक इरिटेटिंग आहे. उगाच कोकणी बोलतो असे वाटते.

पहिला भाग अ आणि अ वाटला. परत बघायची हिम्मत आणि हौस नाही. सगळे मित्र वेगवेगळ्या वर्षी पास झाल्यासारखे वाटतात. विजय कदम अगदीच बोर वाटले.

मी एक मिनिटं प्रोमो बघितला, त्यात श्रेयस राजे दिसला मला, तो भेटी लागी जिवा मध्ये होता, चांगला अभिनय करायचा. एकजण जीव झाला येडापिसामधला सिद्धीचा भाऊ सागर आहे. सगळे यंग होते त्या प्रोमोत.

सगळे कॉलेज मित्र रियुनियन करायला एका जंगलातील रिसॉर्टमध्ये जातात. ते रिसॉर्ट बरेच वर्षे बंद असतं. तिथे गेल्यावर यांना समजतं यांच्यातील कोणीही बुकिंग केलं नाही. आणि जो व्हाट्सअप ग्रुप बनवला तो पण यांनी नसतो बनवला. दहा वर्षांपूर्वी यांनी चुकून की मुद्दामून यांच्या एका मैत्रिणीचा खून केलेला असतो. म्हणजे हे सगळे तिला मजेत स्विमिंग पुलच्या कमरेपर्यंत असलेल्या पाण्यात टाकतात तर ती बुडून मरते आणि हे सगळे काठावर उभे राहून घाबरून बघत असतात. तर सगळ्यांना वाटतं तिनेच बदला घेण्यासाठी आपल्याला रिसॉर्टला बोलवलंय. मग हे घाबरतात तिथून पळून जायचा असफल प्रयत्न करतात. दुसऱ्या दिवशी सगळं विसरून पार्टी करतात. पार्टी करताना एका मित्राचा खून होतो. हे सगळे घाबरतात आणि आपल्याला पोलीस पकडतील म्हणून बॉडीला एका ठिकाणी पुरतात. मेल्यावर पण त्या मित्राचा हात थरथरणे, पुरल्यावर पण त्याचा हात बाहेर आलेला दाखवणे असले भीतीदायक प्रकार घडतात. मग पुरल्यावर दुसऱ्या दिवशी हे चेक करायला जातात तर ती बॉडी तिथे नसते कोणीतरी ती तिथून घेऊन जातं. आतापर्यंत हे असं घडलं आहे.