भयकथा

Submitted by Abhishek Sawant on 15 August, 2021 - 13:50

मी नाईट शिफ्ट मध्ये असलो की मला भयकथा वाचायला खूप आवडते आणि मग चालू होतात भास आभास यांचे विचित्र खेळ. तसा मी अंधाराला किवा एकट्याने रात्री फिरायला घाबरत नाही पण मला कुत्र्यांची जाम भिती वाटते.
तर गोवा मध्ये येऊन आज पाच वर्षे पूर्ण झाली. या पाच वर्षांमध्ये खूप नाईट शिफ्ट्स केल्या. गोव्याचे एक वैशिष्टय़ आहे ते म्हणजे 8 किवा 8.30 झाले की सगळे काही सुनसान होते. काही काही ठिकाणी जे जास्त फेमस नाहियेत अश्या ठिकाणी तर भरदिवसा तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही.
आज इथल्या भयकथा वाचता वाचता मला आलेला एक अनुभव आठवला आजही मला जसाच्या तसा तो प्रसंग आठवतो. जास्त लांबड न लावता सरळ विषयाला हात घालतो.
तर ही गोष्ट आहे 2018 मधली मी एका मेडिसिन बनवणाऱ्या कंपनी मध्ये काम करत होतो. कंपनी 24x7 चालू असल्याने आम्हाला नाईट शिफ्ट करावी लागत असे. नाईट शिफ्ट करायला जाम वैताग यायचा कारण त्या कंपनीचा काही भाग चालू असायचा बाकीचे सगळे रात्री बंद असायचे म्हणजे पूर्ण बिल्डिंग ला तीन मजले होते तर खालचे दोन मजले बंद आणि वरचा एकच फ्लोअर चालू असायचा. आणि माझं डिपार्टमेंट ग्राउंड फ्लोअरवर होते. त्यामुळे रात्रभर एकट्यालाच रहायला लागत असे. काही लागले तर त्यांचा कॉल यायचा मग आम्ही त्या फ्लोअर वर जाऊन चेक करायचो. खालचे दोन फ्लोअर बंद असल्याने सगळ्या लाईट्स बंद असायच्या आणि फक्त आमच्या डिपार्टमेंटमधे लाईट चालू असायची.
तर आमच्या शिफ्ट चा पॅटर्न होता म्हणजे 3rd शिफ्ट, 2nd शिफ्ट आणि 1st शिफ्ट म्हणजे 3rd शिफ्ट रात्रीची 12:30 ते सकाळी 8:30, 2nd शिफ्ट दुपारी 4:30 ते रात्री 12:30 आणि 1st शिफ्ट म्हणजे सकाळी 08:30 ते 5:30.
तर माझी त्या दिवशी 2nd शिफ्ट होती पण नाईट शिफ्ट वाल्याने ऐन वेळेला दांडी मारल्याने मला नाईट शिफ्ट continue करायला लागली. आधीच नाईट शिफ्ट चा वैताग त्याच्यात झोप पण झाली नव्हती.
मी शिफ्ट continue करत असल्याने मला झोपण्याची मुभा होतीच तर 12:30 झाले तसे सगळे निघून गेले आता ऑफिस मध्ये फक्त मीच होतो. पावसाळ्याचे दिवस होते बाहेर पाऊस धो धो कोसळत होता.
AC खुपच कमी temperature वर असल्याने मला थंडी वाटायला लागली म्हणून मी AC बंद केला आणि तेवढ्याच पाऊस पण थांबला आता ऑफिस मध्ये भयाण शांतता मी लॉग इन केलं आणि PC वर आपले काम करू लागलो आता फक्त क्लिक चा आणि टायपींग चा आवाज ऑफिस मध्ये घुमत होता.
पण थोड्या वेळाने मला जाणवले की अजून कुठून तरी क्लिक चा आवाज येतोय तसा मी थांबलो तर खरच असा आवाज येत होता की कोणीतरी काम करत आहे. मी उठून आजूबाजूला बघितले तर कुणीच नव्हते आता तो आवाजही बंद झाला होता. मी भास असे समजून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत काम करू लागलो. काही वेळाने परत आवाज येऊ लागला आता मात्र माझी जाम तंतरली मी सरळ PC लॉक केला आणि document review करत बसलो. तर तो आवाज कमी कमी होत बंद झाला आणि कोणीतरी खुर्ची वरुन उठल्यानंतर जसे आवाज येतो तसा आवाज आला. आता मात्र मी पूर्ण पणे इग्नोर करायचे ठरवले पण माझे कान सर्व काही टिपत होते. अचानक प्रिंटर चा आवाज आला मला आश्चर्य वाटले मी प्रिंट दिलीच न्हवती तर प्रिंट कशी आली?
प्रिंट आली तसा मी उठलो आणि ती प्रिंट पाहू लागलो तेवढ्यात ऑफिस मध्ये लाईट बंद झाली डोळ्यात बोट घालून पाहिले तरी काही दिसणार नाही असा अंधार मी जाम घाबरलो आहे तिथेच उभा राहिलो मला इकडे तिकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती. काही मिनिटांनी लाईट्स चालू झाल्या मी इकडे तिकडे पाहू लागलो तर मला कळले की माझ्या हातातली प्रिंट गायब होती. आता मात्र मला दरदरून घाम सुटला. मी प्रिंट शोधू लागलो तसा मला पेपर shrader चा आवाज आला.
मी जे समजायचे होते समजून गेलो आणि मी एकदम फास्ट दरवाज्याकडे धावलो..
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults