चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.
____________________________________________
बुध-बृहस्पतीं कहाणी
ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत.
(कॅलेंडली सारख्या स्केड्युलिंग/शेड्यूलिंग ऍप्सची गरज प्राचीन आहे. सूनांनी रिकामे हात कधी असतील तेवढेच मिटींग अवर्स ठेवावे.)
असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणें भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले.
(मामा भाच्यांनाही प्रॉस्पेक्टिव्ह डोनरला आधी तपासायची/ व्हेटिंग ची सवय नाही. आहेच घर रस्त्यात तर मागू असा वेळेचा अपव्यय करायची सवय दिसते).
सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, आम्ही संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे, आतां आम्हीं पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा !
(ए, त्यांना माहिती असता तर त्यांनी भिक्षा का मागितली असती?????????????? भिक्षा काय छंद म्हणून मागत नाहीत.)
ते म्हणाले, श्रावणमासीं दर बुधवारी आणि बृहस्पतवारीं जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावं पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात ! त्याप्रमाणं ती करूं लागली.
( कॉमन सेन्स पाहिजे असल्यास स्वतः बाहुलीची टिकली लावावी का ?)
एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यांत तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनीं तिची थट्टा केली.
(जावा जेवीत आहेत मी चांदीच्या भांड्यात तूप वाढते अशी गोष्ट सांगावी. स्टेकहोल्डर मंडळी बरी वागतात, इतरांना ‘लेना ना देना, तूप वाढा बारा आना’ च वाटणार. )
इकडे काय चमत्कार झाला ! तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं, म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली, पुन्हां त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे तीनदां झालं.
(हत्तीण ऍप मधे ग्लिच आहे हो !! आधीच का लाँच केली?? )
पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हां तीं अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली.
(अरे त्या नगराचे काही भले कर आधी!!)
मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं.
(ऐकलं का काय माझं !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!)
हजारों मजूर खपूं लागलें. तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला.
(सॉंग सिच्यूएशन - तसवीर 'तेरी दिल में जिस दिन से उतारी है, खपू तुझे संग लेके … )
तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं, तूप वाढूं सांगितलं, ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं.
(किंवा इथेही सॉंग सिच्यूएशन आहे - गल्ला गुडिया किंवा म्हारे हिवडा में नाचे मोर बजेटनुसार काय ते करा)
त्यांचा सन्मान केला, मुलंबाळं झालीं, दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध-बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत ! ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण
(शक्यतो आधी वेळ न ठरवता कुठे जाऊ नये. अतिथी विन्मुख पाठवू नये, शक्य तशी शक्य तेव्हा मदत करणे बरे, जनहितार्थ जे करतो त्यात स्वहित ही आपसूकच घडते. #मॉडर्न चातुर्मास)
टायटल सुचवल्याबद्दल धनुडी
टायटल सुचवल्याबद्दल धनुडी धन्यवाद.
नवा धागा आला..सही !
नवा धागा आला..सही !
सी ताईची कॉमेंट्री
टायटल पण भारीच!
छान कल्पना आहे सीमंतिनी!
छान कल्पना आहे सीमंतिनी! कॉमेंट्री मस्तच.
या कहाण्या लहानपणी कित्येक वेळा वाचल्या आहेत. पाठ नाहीत पण प्रत्येक वाक्य आठवलं आत्ता वाचताना!
सुरुवातीला 'ऐका अमुक अमुक तुमची कहाणी' असं असतं ना?
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी.
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती.
(सून नेहमी पूर्णांकांत लागतात. हाफ गर्लफ्रेंड सारखी हाफ सून चालत नाही)
तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.
(दिक्षित डायट वर होती काय? नाय म्हणजे स्वतःच्याच घरातलं खाल्लं तर अपडेट द्यावा लागतोय)
इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली.
(पाहुण्याला पर्व्हर्ट म्हणून घालवायचे तर हिला घालवली!!! सुटलीच म्हणायची)
हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
(प्रॉडक्ट प्लेसमेंट - पितांबरी ऍड, किंवा सॉंग सिच्यूएशन - थिंक प्रियांका इन बाजीराव)
पुढं ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली.
(त्याच्या दृष्टीस चमत्कार पडला - दिवे अदृश्य रूपात --- एक पे रहना दृश्य या अदृश्य)
त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ?
(#चांभारचौकशा दीपक. दीपक जमातीत "बिग हग्ज" करत नाहीत काय??)
मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले.
(#फ्लॅशबॅक)
ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.
(हाच तो ‘शिर्डीवाले साईबाबा’ मधला दिवा, इथेही कॅमिओ!!!!)
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली.
(सालं दिव्याने दिवे पाजळलेले चालतात, त्यावर विश्वास पण सख्ख्या सुनेला तिची बाजू विचारायची नाही, तिच्यावर विश्वास नाही.)
तिला मेणा पाठवून घरीं आणली.
(एवढया अपमानानंतर ती आली …. ऐसी भी क्या मजबूरी थी…)
झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली.
(नाऊ यू आर टॉकिंग ससुरजी, गो ऑन …. )
ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(वेळेवर घरातले दिवे बंद करा, वीज वाचवा, वर्षातून एक दिवस नाही तर नेहमी दिव्यांची काळजी घ्या. #मॉडर्नचातुर्मास)
डिस्क्लेमर: कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. चौकस वाचनाची सवय असावी एवढ्यासाठीच इतका प्रपंच.
Submitted by सीमंतिनी on 8 August, 2021 - 08:05
ही कहाणी मी copy करून ठेवली
ही कहाणी मी copy करून ठेवली होती
(थेट वाड्यावरून आलीये, by सी ताई )
हे छान केलस मस्त लिहितेयस
हे छान केलस
मस्त लिहितेयस
भारीच!
भारीच!
हाहाहा भारी कॉमेन्ट्री आहे.
हाहाहा भारी कॉमेन्ट्री आहे. ख-त-र-ना-क!!!
Lai bharee.
Lai bharee.
सी मस्त कल्पना आहे धाग्याची!
सी
मस्त कल्पना आहे धाग्याची! दोन्ही कहाण्या पण जबरदस्त झाल्या आहेत
सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली >>> कसले हुशार उंदीर आहेत. टीव्हीच्या मालिका बघतात वाटतं
मानवजातीत कशाचा काय परिणाम होईल हे परफेक्ट ठाऊक!
मजा आली वाचताना
मजा आली वाचताना
मस्त धागा, जबरी कहाण्या, सही
मस्त धागा, जबरी कहाण्या, सही शीर्षक.
मा 'सी' ना प्रणाम.
सी च्या त्या कथेतले ते अल्लख
सी च्या त्या कथेतले ते अल्लख वाचलं की नेहमी एक प्रश्न पडायचा मला,त्याला माहित आहे ती निपुत्रिक आहे तर मग रोज का तिच्या दारासमोर जाऊन अलख करून मग नको भिक्षा म्हणायचं???
ज्जेब्बात, आता निवांत वाचता
ज्जेब्बात, आता निवांत वाचता येतील चातुर्मासी कहाण्या (चतुर मा सी कडून )
वाडा हलला होता. किल्ले बरे केलेस गो परत दिवे पेटवलेस ते. 
टायटल सुचवल्याबद्दल धनुडी धन्यवाद.>>>> कसचं कसचं
दिपकांची कहाणी जबराटच होती.
किल्ले बरे केलेस गो परत दिवे
किल्ले बरे केलेस गो परत दिवे पेटवलेस ते---
माझं कामच आहे ते, u know what I mean
लपुन सुवर्णाची भिक्षा कशाला
लपुन सुवर्णाची भिक्षा कशाला घालायची? शाप-उ:शाप खेळच करायचा होता तर पोत्यातले तांदुळ काय वाईट होते? ऑ?
अरे म्हणजे युनिकॉर्न चा शोध आपलाच आहे की! वा वा!
>>>तिच्या दारासमोर जाऊन अलख
>>>तिच्या दारासमोर जाऊन अलख करून मग नको भिक्षा म्हणायचं???
सुवासिनी ची सत्वपरीक्षा बघण्यासाठी
भारी आहेत कथा
भारी आहेत कथा
अल्लख कथेचा पुढचा भाग कुठे
अल्लख कथेचा पुढचा भाग कुठे आहे? दुसरी कथा आलीये.
भ्याणक कथा "सीतेच्या"
भ्याणक कथा "सीतेच्या"
छोट्या छोट्या क्विकबाईट्स्नी (स्वगत) जाम मजा आलीय.
भारी आहे हे
भारी आहे हे

श्रावण मा.सी. (माननीय सीमंतीनी)
हर्ष माणशी
____________________
____________________
कहाणी मंगळागौरीची
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता.
(गोष्टीच्या सुरुवातीला देण्यापुरतही बाकी गुण नाही का? उदा: त्याला सरसर पुडी सोडता यायची, त्याला खूप फेकायची सवय होती.. पोती इ इ)
त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई.
(अरे मग आधी ‘अल्लख’ आवाज कशाला दिला?? बाईच्या फिगर वरून ही निपुत्रिक असा अंदाज केला का काय?? व्हॉट चेंज्ड इन अ मिनीट??)
ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला.
(सुवर्णाचा अपडेट द्या. बोवा ने नेलं नसावं, गोष्टीतले बोवा अपरिग्रह करणारे असावेत.)
तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.
(सॉंग सिच्यूएशन - अरे घोडे … अरे घोडे, ए निगोडे देखी तेरी चतुराई… )
वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली.
(वर तर रान होतं, देऊळ खाली होतं मग वर मागून काय मिळणार?)
“घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.”
(बायको घरी, वाणी रानात .. शाळेत जीवशास्त्र तासाला लक्ष द्यायला हवे होते.)
देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.”
(…ह्यापेक्षा रेल्वे कँटीनचा मेन्यू बरा असतो. #अच्छा सिला’दिया तूने मेरे खणणे का)
त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला.
(मैंने तेरे लिए ही सातरंग के सपने चुने… )
देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं.
(… स्लो मोशन अंग्रेजा… )
नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.”
(हे गणपतीने सांगण्याचे काय प्रयोजन? गणपती आहे का सुभाष घई कॅमिओ करायला??)
फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला.
(बाकीचे पुढच्या मंगळवारी... क्रमशः)
धन्यवाद किल्ली. दिपक कथा
धन्यवाद किल्ली. दिपक कथा प्रतिसादात देण्याची कल्पना छान आहे. नवी रिसेंट कथा मूळ मजकूरात टाकते नि बाकी जुन्या प्रतिक्रियेत देते.
सर्वांना धन्यवाद.
पण मग नविन वाचणाऱ्यांचे
पण मग नविन वाचणाऱ्यांचे प्रतिसादाबद्दलचे संदर्भ चुकतात ना..
आणि पुन्हा वाचणाऱ्यांनाही थोडं चुकल्या चुकल्यासारखं होतं.
अर्र मीच बाहुलीची टिकली
अर्र मीच बाहुलीची टिकली लावायला पाहिजे की
ओके पुढच्या कथा प्रतिसादात टाकते.
हा, मलाही कळेना प्रतिसाद तर
हा, मलाही कळेना प्रतिसाद तर वाचलेले पण मुळ कथा वेगळी कशी....
प्रत्येक कथेचा नवा धागा का बरे काढत नाही?? की असे काही रेशनीण्ग करायचे असे नवे धोरण आहे?
असो, मला ह्या चातुर्मासी कथा अ. अ. वाटायच्या, आता इथे वाचुन त्या विनोदीही वाटायला लागल्या....
आधीचे शीर्षक मस्त होते.
चातुर्मासाची कथा रोज साधारण
चातुर्मासाची कथा रोज साधारण एक असतेच (निदान आठवड्याच्या ५ तरी असतातच.) इतके नवे धागे काढू?? रक्षाबंधनला ऋन्मेषच मला राखी बांधायचा.... पण बरोबर सजेशन आहे. काढते रोज नवे.
बाण्धुदे की. मग त्यावरही तो
बाण्धुदे की. मग त्यावरही तो धागा काढेल ( कशाला ..कशाला .. कशाला... कल्पना देतेय्स??????)
भारी लिहिलं आहे. इथेच पुढच्या
भारी लिहिलं आहे. इथेच पुढच्या कथा वाचायला आवडल्या असत्या. पण नवीन धागे काढण्याचा मोहही काही वाईट नाही. ये मोह मोह के धागे!
खपु तुझे संग लेके, कॉमन
खपु तुझे संग लेके, कॉमन सेन्सवाली टिकली
Pages