सफाई कामगार, ड्रेनेज मध्ये उतरून साफसफाई करणारा, मैला साफ् करणारे हे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत.
समाजाने केलेली घाण साफ् करण्याचे काम ते करतात.
मात्र त्याबद्दल तुटपुंजा मोबदला व समाजाच्या तिरस्कृत नजरा त्यांना झेलव्या लागतात.
महात्मा गांधी व गाडगेबाबा ह्यांनी स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देण्याचे कार्य केले.कुठलेही काम हलके नसते अशी शिकवण आपल्या विचारसरणीतून दिली त्या मागे प्रसिद्धी लोलुपता नव्हती खरी तळमळ होती.
जगातील काही देशात मिलिटरी ट्रैनिंग कम्पलसरी आहे. आपल्या देशात स्वछता ट्रैनिंग कायद्याने कंपलसरी करायला हवी.
तुमचे सामाजिक, आर्थिक स्थान कितीही मोठे असो कि ही ट्रैनिंग प्रत्येक नागरिकाला द्यायला हवी.थेअरी आणी प्रॅक्टिकल ज्ञान द्यायला हवे.
महाविद्यालयात हा विषय कम्पलसरी असावा त्यावर प्रोजेक्ट असावे. २० मार्काची थेअरी व ८० मार्काचे प्रॅक्टिकल हवे. त्यात विध्यार्थी वस्तोवस्ती जाऊन साफ सफाई
करतील.प्रॅक्टिकल वर लक्ष ठेवायला त्यात कोण घोळ करत् नाही ना हे पाहायला एक तज्ञ् ठेवायला हवा जो व्हिडिओ रेकॉर्डिंग ही करेल त्यांच्या कामाचे. ह्या पेपर मध्ये जो पास असेल त्यालाच पुढच्या तुकडीत प्रवेश मिळेल.१२ नंतर हा अभ्यासक्रम राबवणे योग्य राहील.
कर्मचारी, अधिकारी मग् तो कुठल्याही पदावर असो वर्षातील एक महिना त्याला कामाला सुट्टी देऊन तो महिना स्वछतेच्या कामासाठी घालवावा लागेल ह्यात , साफसफाई तत्सम कामे करून घ्यावी. कुचराई करणाऱ्यांना एक महिना वाढीव देण्यात यावा. ह्या परफॉर्मन्स चा बोनस, इतर भत्ते देताना विचार करावा ते रोखण्याचीही तरतूद असावी.
५५ ते ६० वया पर्यंतच्या नागरिकांना स्वयंसेवक नेमावे. ६० नंतर मात्र ह्या कामातून सुट द्यावी. जर कोणी स्व इचछेने सफाई दान करायला तयार असेल तर त्याचा विचार करण्यात यावा.
पारंपरिक, पिढ्या ना पिढ्या साफसफाईचे काम करणाऱ्यांना निरीक्षक नेमावे जेणेकरून काम सफाईने होईल.
समाजातील स्थानाचा विचार करू नये. कुणी विरोध करेल आम्ही असे हलके काम जरू शकत नाहीय त्यांना जाणीव करून द्यावी की तुम्ही उच्च असा किंवा हलक्या स्थानाचे त्तो मनाचा भ्रम असतो दोन्ही स्थान वाले नैसर्गिकपणे कचरा करतातच.निसर्ग तुमचे स्थान पाहत नाही तो कठोरपणे त्याच्या आज्ञा पाळायलाच लावतो.
'जावे त्याच्या वंशा' ही एक म्हण आहे.कर्माने प्रत्येक जन त्या वंशात गेला तर त्यालाही त्या कामातील श्रम,हाल अपेष्ठा ह्याची जाणीव होईल. व ह्या कामालाही एक आदराचे स्थान मिळेल.
व आपला भारत एक स्वछतेचा आदर्श म्हणून पूर्ण जगात नावाजला जाईन.
( हे होने कठीण आहे पण इचछा असेल तर मार्ग निघतो)
ह्याबाबत अजून काय करता येईल कुठले मुद्दे मांडता येतिल् ह्या बद्दल मायबोलीकराच्या सूचना अपेक्षित आहेत)
यु नेल्ड इट
यु नेल्ड इट
पटलं.
पटलं.
चांगला उपक्रम आहे हा. सरकार
चांगला उपक्रम आहे हा. सरकार दरबारी याबद्दल प्रयत्न करायला हवेत. सामाजिक संस्थांनी यावर लक्ष द्यायला हवं.
छान विचार मांडले आहेत.
छान विचार मांडले आहेत.
<<मात्र त्याबद्दल तुटपुंजा मोबदला व समाजाच्या तिरस्कृत नजरा त्यांना झेलव्या लागतात. >>
-------- हे बदलायला हवे. कुठलेही काम कमी महत्वाचे नाही आहे हे सर्वांनाच पटायला हवे. जेव्हढा सन्मान वैद्यकीय डॉक्टर, परिचारिका यांना त्यांच्या कामाबद्दल मिळतो तेव्हढाच सन्मान सफाई काम करणारांना पण मिळायला हवा... समाजाने केलेली घाण करतांना परतीमधे त्यांना मिळतो तुटपुंजा पगार, अवहेलना, तिरस्कार.
शालेय किंवा महाविद्द्यालयात स्वच्छता विषय असावा किंवा त्याला जोरदार प्रोत्साहन द्यावे, पण सक्तीचा नको (त्याचे वेगळे दुष्परीणात आहेत). विषय का आहे आणि त्याचे महत्व पटवले तर सक्तीचा करण्याची अवशक्ता भासणार नाही.
अहो पगारे, हे राहु द्या आधी
अहो पगारे, हे राहु द्या आधी बाजूला. मुळात आपल्या कडच्या समस्त भिकार्यांना आधी डस्टबीन कसे वापरायचे ते शिकवायला हवे. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा असे सरकारने डोके फोड करुन सांगीतले तरी लोक करायचे तेच करतात. दर वर्षी मुंबई किंवा इतर शहरे कशी तुंबतात हा PhD चा विषय आहे. लोकांना कितीही सांगीतले तरी लोक गटारात नको नको ते टाकुन गटारे तुंबवुन ठेवतात.
सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे वर्कर्स आहेत त्यांना ते पिपीई किट टाईप युनिफॉर्म दिला पाहीजे. त्या मोठाल्या गटारातल्या विषारी वायुमुळे बर्याच लोकांचे जीव गेलेत. गटारांमध्ये खोल उतरुन कामे करावी लागतात, त्यात उंदीर घुशी यांचा सुळसुळाट तर विचारायलाच नको. त्यांचे दंश पण असतीलच की.
बाकी लेख उत्तम आणी मनातला आहे.
महागुरूंनी आमची मुंबई चांगली
महागुरूंनी आमची मुंबई चांगली मुंबई गाणं काढून डान्स केला होता तसंच अजून एक मनावर घेऊन आमचा भारत चांगला भारत स्वच्छ भारत असं गाणं काढून डान्स केला तर फायदा होईल असं मला वाटतंय. अजून एक म्हणजे महागुरूंचा तो म्हातार डान्स बघून लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल की आपण इकडे तिकडे कचरा फेकला तर महागुरू परत नाचायला सुरवात करतील. त्यामुळे लोक्स कचरा फेकायचे कमी येतील.
बोकलत बास करा.
बोकलत
बास करा. 
आणि हा सगळा कचरा टाकायचा कुठे
आणि हा सगळा कचरा टाकायचा कुठे?
अमेरीकेत.
अमेरीकेत.
(No subject)
<< अहो पगारे, हे राहु द्या
<< अहो पगारे, हे राहु द्या आधी बाजूला. मुळात आपल्या कडच्या समस्त भिकार्यांना आधी डस्टबीन कसे वापरायचे ते शिकवायला हवे. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा असे सरकारने डोके फोड करुन सांगीतले तरी लोक करायचे तेच करतात. दर वर्षी मुंबई किंवा इतर शहरे कशी तुंबतात हा PhD चा विषय आहे. लोकांना कितीही सांगीतले तरी लोक गटारात नको नको ते टाकुन गटारे तुंबवुन ठेवतात.
सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे वर्कर्स आहेत त्यांना ते पिपीई किट टाईप युनिफॉर्म दिला पाहीजे. त्या मोठाल्या गटारातल्या विषारी वायुमुळे बर्याच लोकांचे जीव गेलेत. गटारांमध्ये खोल उतरुन कामे करावी लागतात, त्यात उंदीर घुशी यांचा सुळसुळाट तर विचारायलाच नको. त्यांचे दंश पण असतीलच की.
बाकी लेख उत्तम आणी मनातला आहे. >>
------- स्वच्छता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे जनतेला समजायला हवे. स्वच्छता कर्मचारी जे काम करतात त्या कामाला समाजामधे आदर/ सन्मान मिळवून देण्यासाठी आपल्याला काय करता येईल ? मुख्य म्हणजे एक छोटा काळ (३ महिने, ६ महिने) प्रत्येकानेच हे काम केले तर ? असे त्यांना सुचवायचे आहे असे मला वाटते.
संपुर्णपणे दुर्लक्ष केलेला हा वर्ग आहे. ( काही दशके आधी ) स्वच्छता कर्मचारी लोक डोक्यावर मैला न्यायचे - कल्पनाही करवत नाही किती अन्याय केला आहे त्यांच्यावर.
उदय, सगळ्या प्रतिसादांना +१.
उदय, सगळ्या प्रतिसादांना +१.
रश्मी यांचा पहिला प्रतिसाद या विषयावर विचार व काम करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे.
सर्वांकडून सक्तीने स्वच्छतेचे
सर्वांकडून सक्तीने स्वच्छतेचे काम करवून घेणे अशक्य व अव्यवहार्य आहे.
पण गटारीत उतरून ती साफ करणारे लोक असतात त्यांना महिना एक लाख पगार, योग्य ती साधने व इन्शुरन्स, पेन्शन वगैरे द्यावीत. दुर्दैवाने हे भारतात होणार नाही कारण हे उतरून साफ करणारे समाजाच्या वंचित घटकातून आलेले असतात. उच्चवर्णीय नसतात. ते महापालिकेचे कर्मचारीही बहुतेकदा नसतात, कंत्राटी असतात. तुटपुंजा पगार, जिवाची शाश्वती नाही, ग्लोव्हज नाहीत, हेल्मेट नाही, गेलोच तर नुकसान भरपाई नाही. यांचे काम सैनिका पेक्ष कमी महताचे वा रिस्की नाही.
अमेरिकेत कधी कधी आमच्य टोयलेट मध्ये काहीतरी अडकते, आम्ही फोन करतो व तो माणूस येतो. त्याला सर्वत्र सन्मानानेच वागवले जाते. त्याच्याकडे जाडजूड ग्लोवज, बूट वगैरे असते. तो टॉयलेट अनक्लोग करतो व पैसे घेऊन निघून जातो. त्याला कमी लेखले जात नाही. माझ्या मुलानेही हे करीअर निवडले तर मला आश्चर्य वा वाईट वाटणार नाही. Dignity of Labor !
ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा
ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा असे सरकारने डोके फोड करुन सांगीतले तरी लोक करायचे तेच करतात
मला एक गोष्ट कळत नाही.. हे कचरा वेगळेकरण प्रकरण सावंतवाडीसारखी लहान नगरपालिका समर्थपणे राबवू शकते तर मुंबईत का शक्य नाही? इथे कचरा वेगळा केला नाही तर गाडीवाले त्या सोसायटीत कचरा उचलतच नाहीत. आणि कचरा एकत्रित करुन टाकला तर तिथल्या तिथे दंड वसुल करतात. माझ्या तिथल्या सोसायटीत संध्याकाळी ठराविक वेळी बिल्डिंगीतील स्त्रीया आळीपाळीने खाली जाऊन उभ्या राहतात. मग बिल्डिंगीतले इतर लोक आपापला कचरा घेऊन खाली येतात आणि वेगवेगळ्या कुंडीत कचरा टाकतात. मिक्स कचरा कोणी आणला तर तिथेच त्याला तो वेगळा करावा लागतो. आता सवयीने सगळे वर्गीकरण करुनच आणतात.
छान विचार मांडलेत.
छान विचार मांडलेत.
साधनाशी सहमत! प्रत्येकाने
साधनाशी सहमत! प्रत्येकाने तेवढी जबाबदारी उचलली तरी खूप आहे. माझा कचरा (मी केलेला) माझी जबाबदारी !