एक यशस्वी तप
तो खूप डिस्टर्ब होता. मनःशांती मिळावी म्हणून त्याने इंटरनेट वर खूप काही शोधलं पण समाधान मिळेल असं उत्तर मिळालं नाही. काहींनी सुचवलं, "अश्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या" पण तरीही त्याला ते पटलं नाही. शेवटी त्याने तप करायचं ठरवलं. आणि मग रात्री झोपताना त्याने डोळे बंद करून घेतले. तब्बल ८ तास शांतपणे तप केल्यावर त्यालाही ब्रम्हज्ञान मिळालं.
फार पूर्वी काही गोष्टी फक्त पृथ्वीवर दिसायच्या. आणि आता मानवाच्या प्रगतीबरोबरच त्यांचीही प्रगती झाली आणि इंटरनेटवर सुद्धा त्यांनी आपले बस्थान बसवले.
माणसातील प्रकार आणि त्यांतील विकार ओळखून डॉक्टर त्याची ट्रीटमेंट करतात. ट्रीटमेंट होत नसेल तर त्याला त्याच उरलेलं आयुष्य घरच्यांसोबत जगायला discharge देतात.
आता हे दोन प्रकार कोणते?
एक म्हणजे ज्यांमध्ये प्राणी जसे कि "डुक्कर" यासारखे गुण असतात. हे काय करतात, इतरांच्या पोस्ट वर जाऊन बेमतलब कंमेंट करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात. वाद लावायचा प्रयत्न करतात. यांचा तोंड उघडलं कि "गटार".
आणि दुसरा प्रकार म्हणजे रस्त्यावर पडलेली कुत्र्याची "शीट". जी फक्त दुर्गंधी फैलावते. याला हातसुद्धा लावता येत नाही आणि पाय सुद्धा.
आता अश्या घाणीशी माणसाने कसा व्यवहार करावा?
पाहिलं म्हणजे डुक्कर गुणधर्म असलेल्याना पाळता येत. माणसात ते येणार नाहीत याची खात्रीच असते. पण तरीही माणूस म्हणून, प्राणिप्रेम म्हणून यांची दया करायची. थोडं अंतर ठेऊन, याच्या घाणीची बाधा होणार नाही हे पाहून यांच्याशी व्यवहार करायचा.
आणि दुसरं आहे कुत्र्याचं "शीट". हे कुठेही पडलेलं असत. दुर्गंधी फैलावतं असत. येतां-जाताना आपल्या नाकावर हात ठेऊन यांच्यापासून दुरूनच जायचं असत. याला हाताने फेकता येत नाही आणि पायाने लोटतां येत नाही.
टीप: याचा माझ्या "अर्धजळीत चिता" कथेशी काहीही संबंध नाही. हा...हा...हा...
काही लोक सुधारण्यातलेच नसतात.
काही लोक सुधारण्यातलेच नसतात. खरच दुर्लक्ष करा. तुम्ही तर नेटवर याचा सामना करत आहात, पण मला तर माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात ज्येष्ठ नातेवाईकांशी पण तडजोड करावी लागतीय. जितके शांत रहाल, तितका तुम्हालाच फायदा होईल. म्हणणे सोपे आहे, पण ईलाज नाही. तुम्ही जर रागवुन निघुन गेलात तर आमच्या सारख्या वाचकांचे नुकसान होईल.
राजकारणाच्या धाग्यावर असाच एक माथेफिरु ट्रोलिंग करायला लागला. माझे त्याच्याशी वै काहीही वैर नसले तरी मुद्दाम जुन्या पोस्ट उकरुन काढुन धिंगाणे करायला लागला. अश्या आंधळ्यांकडे आपणच पाठ करायची. नाच म्हणावे तुला किती नंगा नाच करायचा ते. मी ते राजकारणाचे धागे सोडुन दिल्यापासुन मला खरच मनःशांती मिळालीय.
त्या दोन प्रकारातील कोण आहेत
त्या दोन प्रकारातील कोण आहेत ते स्वतःच येऊन परिचय करून देतील. बघा तुम्ही. त्यांची ओळख व्हावी इतरांनाही म्हणूनच मी त्यांच्या कंमेंट्सवर रिप्लाय केला. आता त्याचे SUPPORTER पण बाहेर येतीलच. प्रभुदेसाईंना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं असेल. पण आता त्यांची स्वतःची लायकी पण दिसून येईल.