‘हाय झोपलीयेस का?’
मध्यरात्र उलटून गेली होती. संपी पेंगुळलेले डोळे मोठे करून करून dan brown वाचत बसली होती आणि तेवढ्यात मंदारचा मेसेजने टुन्न केलं. इतक्या उशिरा त्याचा मेसेज पाहून तिने पुस्तक बाजूला ठेवलं. आणि डोळ्यांसमोर मोबाइल धरत आडवी झाली.
‘नाही अजून.. पुस्तक वाचतेय’
‘अच्छा..’
‘तू बोल नं.. काय करतोयस?’
खोदुन विचारल्याशिवाय हा जे बोलायचंय ते पटकन बोलत नाही हे संपीच्या एव्हाना लक्षात आलेलं होतं.
‘काही नाही.. आईचा वाढदिवस celebrate केला बारा वाजता..’
‘अरे.. हो की.. वाढदिवस आहे ना आज.. विसरलेच मी..’
‘हम्म.. साडी आवडली आईला खूप..’
‘दिलीस तू? काय म्हणाल्या?’
‘तुझा चॉइस नाहीये हा असं म्हणाली..’
‘तू काय म्हणालास मग?’
‘माझ्या चॉइस चा चॉइस आहे असं म्हणालो..’
यावर दोन-तीन मिनिटं विचार करून संपीने रीप्लाय केला,
‘म्हणजे? किती कॉम्प्लिकेटेड बोलतोस रे’
‘किती साधं-सरळ वाक्य आहे.. तूच माठ आहेस.’
‘ओये.. गप्प बस तू.. तूच आहेस माठ’
‘हाहा..’
संपीला पहिल्या प्रथम झेपलं नाही. पण मग काही मिनिटांनी तिची ट्यूब पेटली. तो ‘मला’ त्याचा चॉइस म्हणाला का?? ती आतून शहारली. मनाला कितीही शहाणपणाचं वळण दिलं तरी त्याला आतून काय वाटतंय ते सांगितल्याशिवाय ते राहतही नसतं.
सुट्ट्या संपल्या तशी काही दिवसांनी संपी पुन्हा पुण्यात आली. पावसाळा सुरू झाला होता. भुरभुर पावसानं सगळीकडे हजेरी लावली होती. असा पाऊस पाहिला की मनसुद्धा हिरव्या मखमालीसारखं होऊन जातं.. त्यात सध्या तर संपीच्या मनात नव्या जाणिवांचा, नव्या नात्यांचाही पाऊस पडायला लागला होता. स्वप्नांनी भरलेलं, अशक्य स्वप्नं पाहणारं मन गार वार्यावर तरंगत होतं. सगळं जग खूप सुंदर वाटायला लागलं होतं..
हे सगळं मंदारमुळे वाटतंय.. तो आपल्याला आवडतो.. हे तिने आता तिच्या मनाशी कबूल केलं होतं. पण त्याचं काय? त्यालाही असंच वाटत असेल का? बोलण्यातून, vibes मधून जाणवतं पण खरंच तसं असेल का? या सार्या प्रश्नांची उत्तरं तिला हवीहवीशी वाटू लागली होती..
ती आलेली असली तरी तो अजून पुण्यात आलेला नव्हता.
संपीचं कॉलेज सुरू झालं होतं. सेकंड येयर ऑफ इंजीनीरिंग. सगळ्यांचे डेपार्टमेंट्स आता आपआपल्या ब्रांच नुसार वेगवेगळे झाले होते. मीनलची ब्रांच वेगळी असल्याने संपी आणि ती आता एका वर्गात नसणार होत्या. नव्या मैत्रिणी, नवे विषय.. प्रॅक्टिकल्स.. इलेक्ट्रॉनिक्सशी खर्या अर्थाने होत असलेली ओळख यात संपी गुंतून गेली. दुसर्या वर्षाचं अॅडमिशनही झालं. पण आता डोक्यावर टांगती तलवार होती ती रिजल्टची. फर्स्ट येयर चा रिजल्ट अजून लागलेला नव्हता. पहिल्या सेम पेक्षा दुसर्या सेम मध्ये केलेली ढिलाई टेंशन वाढवत होती.
वर्गात आता डिप्लोमाचे नवे चेहरेही डोकावू लागले होते. डायरेक्ट सेकंड येयरला अॅडमिशन घेतलेले. त्यांचा वेगळा ग्रुप जिथे-तिथे दिसायचा. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या नव्या टीचिंग स्टाफशीही आता ओळख व्हायला लागली होती. पहिलं वर्ष तसं मजेतच गेलेलं असल्यामुळे इंजीनीरिंग म्हणजे नेमकी काय चीज आहे ते संपीला यावर्षी कळणार होतं. त्याची झलकही नव्या subjects मधून दिसत होती. सिग्नल्स अँड सिस्टम्स, सॉलिड स्टेट डिवायसेस अँड सर्किट्स.. एकेक नावं वाचूनच घेरी यावी.
याच सुमारास कधीतरी रात्री ती मेस मध्ये जेवायला गेलेली असताना तिला मंदारचा फोन आला. नेहमी मेसेजेस मधूनच बोलणारे ते एकमेकांना क्वचितच फोन वगैरे करायचे.
‘हाय.. संपदा जी.. कशा आहात..’
‘हाहा.. हे काय जी वगैरे.. bdw, चक्क फोन केलास तू आज? मला वाटलं गायब झालास कुठेतरी. मेसेज नाही काही नाही..’
‘अगं आजच आलो पुण्यात..’
‘इतक्या उशिरा? का?’
‘लग्न होतं चुलत बहिणीचं..’
‘ओह अच्छा..’
‘ऐक नं.. रिजल्ट लागला आमचा आज..’
‘काय सांगतोस? स्कोर?'
'नाईन पोइंटर.. सेकंड इन द कॉलेज..’
‘वॉव.. omg.. कसलं भारी!! topper!’
‘ ’
‘नुसती स्माइल नकोय.. पार्टी हवी! ती पण मोठ्ठी!!’
संपी excite होऊन बोलत होती. तिला मंदारचं जाम कौतुक वाटत होतं.
‘नक्की.. कुठे आणि कधी सांग..’
‘ह्या वीकएंडला?’
‘डन!’
दोघांनी फोन ठेवला. संपीला त्याचा रिजल्ट ऐकून अर्थात छान वाटलं. पण आता स्वत:च्या रिजल्टचा विचार करून तिच्या पोटात गोळाही येऊ लागला..
राठीचं प्रोजेक्ट पहायला संपदा आणि राधा दोघी पाचगणीला निघाल्या होत्या. पावसाळा तोंडावर होता. या दिवसात त्यांच्या कामाचा लोड खूपच वाढायचा. पावसाळ्याच्या पुढे-पुढे landscapes design करून घ्यायची ज्याला-त्याला घाई..
राधा ड्रायविंग करत होती. संपदा खिडकी बाहेर पाहत होती..
‘काय गं तब्येत ठीक नाही का?’ राधाने तिला विचारलं.
‘अम्म.. हो.. का गं?’
‘गप्प गप्प आहेस.. तुझी बडबड ऐकायची सवय झालीये मला..’
जरासं हसत संपदाने तिच्याकडे पाहिलं,
‘काही नाही गं.. उगाच उदास वाटतंय कालपासून..’
‘क्युं?’
‘पता नही यार.. feeling a bit nostalgic.. आईने काल तो आठवणींचा पेटारा पाठवला आणि सगळं आठवायला लागलं..’
‘ओहह.. हम्म.. सगळं म्हणजे..’
संपदाने राधाकडे पाहिलं.. आणि गप्पच राहिली.
राधाच म्हणाली,
‘अम्म.. समझ गयी.’
यावरही संपदा काहीच म्हणाली नाही.
‘काय घडलं होतं गं एवढं तेव्हा.. अजून ती गोष्ट सोडायला तयार नाहीस ती..’
‘ट्रक!’
विषय टाळत आणि राधाचं लक्ष रस्त्याकडे वळवत संपदा म्हणाली.
‘ठिके मॅडम नका सांगू.. टॉप सीक्रेट! तू आणि तुझा मंदार.. वेडे आहात दोघेही.’
संपदाने आता सरळ कानांत हेडफोन्स घातले आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली..
क्रमश:
सांज
www.chaafa.com
छान चालू आहे मालिका.
छान चालू आहे मालिका.
चांगलं चाललंय संपीचं.
चांगलं चाललंय संपीचं.
तू माझी 'चॉईस' आहेस असं त्याने आडवळणाने का होईना, पण सांगून टाकल्यावर ते दोघे पुढे काही गांभीर्याने बोलणार नाहीत का? )
(पण परत तेच वाटलं
मंदारचं किंवा संपीचं किंवा
मंदारचं किंवा संपीचं किंवा दोघांचंही कॉलेज ऑटोनॉमस आहे वाटतं
रिझल्ट वेगवेगळ्या दिवशी लागतायत.
देवभुबाबा, थॅंक यू!
देवभुबाबा, थॅंक यू!
वावे,
शंका वाटूच शकते. पण पुढचा भाग वाचल्यावर कदाचित निरसन होईल शंकेचं!
हो, मंदारचं आॅटोनाॅमस आहे. संपीची पु.यू.
‘ Happy ’
‘नुसती स्माइल नकोय.. पार्टी हवी! ती पण मोठ्ठी!!’
>>> फोनवर बोलता बोलता चॅट सारखं झाल हे.
बाकी मस्तच !!
मस्त चालु आहे.वाचतेय.
मस्त चालु आहे.वाचतेय.