एक होता अवचट --- भाग १२

Submitted by सुर्या--- on 28 July, 2021 - 07:31

अवचटची आईसुद्धा हळू हळू बरी होत होती. अवचट कामाच्या व्यापात आणि आईच्या आजारपणात पुरता अडकल्याने त्याचे पवळ्याकडे फिरकणे कमी झाले होते. शाम्भवी मात्र त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसायची. नाहीच काही सुचलं तर पवळ्याच्या आईला विचारपूस करायची. पवळ्याच्या आईने देखील मनातून जाणलं होत. त्यामुळे न राहवून, वेळ साधून तिने एकदाचे स्पष्ट विचारलेच.

पवळ्याची आई:- शाम्भवी, तुला राग येणार नसेल तर एक विचारू?
शाम्भवी:- काय आत्या?
पवळ्याची आई:- तुला अवचट सारखा नवरा भेटला तर चालेल का?
(शाम्भवी आ .. वासून पाहत राहिली. काय बोलावं तिलाही समजत नव्हते. )
पवळ्याची आई:- म्हणजे काय होईल ना, तुला सारखं बाल्कनीमध्ये येऊन वाट पण पाहायला नको आणि त्यालाही सकाळी उठून मॉर्निंग वॉल्क करायला नको.
बिचारे कुत्रे पण शांत झोपतील आणि त्या पोरांना पण त्रास राहणार नाही.
शाम्भवी:- आत्या... बोलून पवळ्याच्या आईला मिठी मारते.
पवळ्याची आई:- (शाम्भवीच्या डोक्यावरून हात फिरवत) मी बोलेन भुरकटरावांशी आणि तुझ्या आईशी.

संध्याकाळची वेळ असते. भुरकटराव टीव्ही पाहत बसलेले असतात. मीनाक्षीदेवी पसारा आवरत असतात. शाम्भवी आतल्या खोलीत बसलेली असते. पवळ्याची आई दार वाजवत आत येते.

पवळ्याची आई:- काय भुरकटराव. कशी आहे तब्येत? बरं वाटतंय ना आता?
भुरकटराव:- या ताई... या... बस.
मीनाक्षीदेवी:- चहा घेणार का?
पवळ्याची आई:- चहा ठेव नंतर. पण मला बोलायचं आहे तर जरा ऐकून घ्याल का?

भुरकटराव मीनाक्षीदेवींकडे पाहून डोळ्यानेच खुणावतात. मीनाक्षीदेवी माहित नसल्यासारखे तोंड करून पाहतात.

पवळ्याची आई:- शाम्भवीच्या लग्नाचं काय ठरवलंय पुढे?
नाही म्हणजे तुमच्या घरातल्या गोष्टीत मला नाही जास्त बोलता येणार. पणं मला एक सुचवावंसं वाटलं म्हणून आले.
मीनाक्षीदवी:- काय झालं ताई? स्पष्ट बोला. कोणी आहे का तुमच्या पाहण्यात?

शाम्भवी आतून ऐकत होती आणि मनातून अस्वस्थ होत होती.

पवळ्याची आई:-तुम्हाला अवचट कसा वाटतो, शाम्भवी साठी?
भुरकटराव:- ताई, अहो काय बोलता तुम्ही? किती वेंधळा मुलगा आहे तो. अजून नीट कामाला नाही. आपल्या पोरीला शोभेल का तो?
मीनाक्षीदेवी:- अवचट वेंधळा आहे, पण चांगला मुलगा आहे तसा. शाम्भवीला सुखात ठेवेलही, पणं .....
पवळ्याची आई:- "पणं" .... हा "पणं" मध्ये आला कि चांगलया गोष्टीसुद्धा शंकेत अडकून पडतात. कामाचं म्हणाल तर तो शांत बसणाऱ्यातला नाही. नशिबावर अवलंबून राहणारा तो नाही, तर स्वकर्तुत्वाने करून दाखवणारा आहे. तुम्ही कितीही वेंधळा समजा, पण कठोर स्वभावापेक्षा भोळसटपणा चांगलाच ना?

सर्वत्र शांतता पसरते. मीनाक्षीदेवी आणि भुरकटरावांना काय बोलावं सुचत नसल्याने शांतच विचार ते करू लागतात. दोघेही काहीच बोलत नाहीत हे पाहून पवळ्याची आईसुद्धा तेथून निघून जाता जाता बोलते, "तुम्ही विचार करा शांतपणे, काही चुकीचं बोलले असेन तर माफ करा".
शाम्भवीसुद्धा घाबरते. आई आणि पप्पांचं शांत राहणं तिला पेचात टाकतं.

दोन दिवसांनी अवचट ची आई बरी होऊन घरी आल्याचे समजते. पवळ्याची आई आणि शाम्भवी त्यांना पाहायला अवचटच्या घरी जातात. अवचट नुकताच आई ला घरी पोचवून पुन्हा कोणा Patient ला हॉस्पिटल ला पोहोचवण्यासाठी कामावर गेलेला असतो.

घर तस छोटच, पण स्वच्छ, सुंदर ठेवणी, हॉल मध्ये एका संत महात्म्याचा फोटो. जटाधारी, पाठमोरी आकृती. "देवभुबाबा" नाव लिहिलेली.

पवळ्याची आई:- नमस्कार ... रुक्मिणी ताई. कसं वाटतंय आता, बरं ना?
अवचटची आई:- (आश्चर्याने पाहत) अगबाई , तुम्ही आलेत, या... बसा ... आणि हि कोण? शाम्भवी का? ये... ये... बाळा, पहिल्यांदाच आलीस ना आमच्याकडे?

शाम्भवी हसतच अभिवादन स्वीकारते. अजूनही तिचं घराच्या भिंती वगैरे न्याहाळणं चालूच असत. मनातल्या मनात ती विचार करत होती. ह्याची आई एवढे दिवस हॉस्पिटलला असूनही घर किती स्वच्छ, सुंदर ठेवलंय.

अवचटची आई:- (शाम्भवीकडे पाहून) अगं आमच्या अवचटला स्वच्छता लागते. मी नसले तरीही बघ घर किती साफ ठेवलय. करतो बाप्पा आपल्या परीने जमेल तसं.
पवळ्याची आई:- नाव काढतोय पोरगा खूप. शहरात सगळेच त्याच्याबद्दल बोलत असतात.
अवचटची आई:- हम्म ,.. मला आता काही करवत नाही, थकवा जाणवतो. हा बाबा लवकर लग्न करेल तर बरा.
पवळ्याची आई:- पाहिले का मुलगी?
अवचटची आई:- कुठे पाहणार? कोण देणार मुलगी? नोकरी नाही. धंदा चालू केलेला तर हा मेला कोरोना चा रोग लागला.
पवळ्याची आई:- होईल. नका काळजी करू. (शाम्भवीकडे पाहत)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे अवचट हे त्या मुलाचे नाव आहे का?
मी आतापर्यंत अवचट हे फक्त आडनाव म्हणूनच वाचले किंवा ऐकले आहे.
नाव असेल तर त्याचा अर्थ काय होतो?