साहित्यिक रेसिपीचे शाब्दिक अपचन

Submitted by निमिष_सोनार on 27 July, 2021 - 04:50

काही काही शब्द म्हणजे खरंच "खायची" गोष्ट नव्हे!

"रायता" हा कोशिंबीरीला हिंदी शब्द आहे पण मराठीत लोणच्याच्या रस्याला रायता म्हणतात.

कोथिंबीरीला हिंदीतून "धनिया" म्हणतात आणि ग्रामीण मराठीत नवऱ्याला बोलावतांना "धनी, या!" असे म्हणतात!

हिंदीत प्याज आणि प्यास चा जसा जवळचा संबंध नसतो तसा मराठीत कांदा आणि वांधा (समस्या) आणि रांधा (स्वयंपाक बनवणे) चा पण संबंध नसतो. काही वेळेस अक्कल कमी असली की त्या व्यक्तीला अकलेचा कांदा म्हटले जाते. पण रंगीला मध्ये आमीर खान हिंदीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरला "जा, कांदा काटके ला!" असे म्हणतो.

मीठ खारट असले तरी, ते खातांना हिंदीत "आ" वासला की ते गोड बनते (मीठ+आ = मीठा) आणि मीठात "ई" टाकला की मराठीत आलिंगन (मिठी) होते आणि हिंदीत "स्त्रीलिंगी गोड" बनते (उदाहरणार्थ - मिठी बच्ची) होते. मिठाई हा हिंदी शब्द असूनही तो अस्सल मराठी शब्द म्हणून वापरला जातो. मिठाई म्हणजे "गोडपणा" जसे ठंडाई म्हणजे थंडपणा (स्वभावातील किंवा गतीतील नव्हे तर तापमानातील!). आणखी काही हिंदी मराठी उदाहरणे -चढाई, लढाई, गोलाई, मनाई, बुराई, अच्छाई.

आस म्हणजे हिंदीत आशा! (वह आस लगाये बैठा है), पण मराठीत "आस" म्हणजे गरमपणाशी जवळीक आल्यानंतरची फिलिंग असा अर्थ होतो. गॅसच्या ज्योतीची आस लागते, ती आस किंवा शेक लागणे! हेच इंग्रजीत गेले की मिल्क "शेक" बनते! हाच शेक आणि ओटी एकत्र केले की शेकोटी बनते!

जास्त पाणी असलेली खिचडी किंवा भात हा "आसट" होतो आणि पाणी कमी झाले की त्याला आपण "आटले" म्हणतो.

कुठे ते गंगेची पवित्र फिलिंग देणारी "गंगाफळ" भाजी आणि कुठे तो "लाल भोपळा"? पण दोन्ही एकच! कुठे तो छानसा भोपळा आणि कुठे ते "लौकी"? भोपळ्याच्या "लैकीकाला" साजेसे नाही वाटत! खाण्याची भाजी आठवण्यापेक्षा अवेन्जर्स मधला तो लोकी आठवतो.

कुठे तो रवा आणि कुठे ती "सुजी"? गाल सुजल्यासारखे फिलिंग येते.

कुठे ती भजी आणि कुठे ते पकौडे? कुणीतरी "कोडे" मारतंय असे वाटते. कोडे (हिंदी अर्थ फटकारे आणि मराठीत कोडे म्हणजे पझल puzzle किंवा रिडल riddle).

भाजी आणि भजी यात फक्त एका "काना" चा फरक आहे, का? याचे कारण बहुदा असे असावे की, अनेक भाज्या घालून भजी बनवता येतात. गिलक्याची भजी, पालकाची भजी, मिरच्यांची भजी वगैरे.

पुणे परिसरात गिलके हा शब्द कुणालाच माहित नाही. ते त्याला घोसाळे म्हणतात. मात्र गिलक्याचा भाऊ दोडका सगळीकडे सारखाच ओळखला जातो. दोडका कुठला!! घोसाळे हा शब्द ऐकला की रवी वापरून "ताक" घुसळल्यासारखे वाटते! रवी म्हणजे माहिती नाही? अहो, घुसळणी! सूर्य नव्हे!!

मराठीतले "ताक" हिंदीत छाछ बनते! कुणीतरी शिंक दिल्यासारखे वाटते. "छाछ"!!

आणि पावाची महती काय वर्णावी? वडा पाव असो की मिसळ पाव असो की पाव वडा असो! अनेक खाद्यापादार्थांना हा पाव पावला आहे! पाव म्हणजे किलोचा चौथा भाग, पाव म्हणजे बटाटेवड्यासोबतचा पाव आणि पाव म्हणजे "प्रसन्न हो"!!

"कडू कारले" हे हिंदीत "कडवे करेले" बनतात! अक्षरे जास्त वेगवेगळी नाहीत! थोड्या फार फरकाने सारखीच आहेत! असो! कडू असल्याने कुणी जास्त त्याला वेगवेगळी नावे देण्याच्या फंदात पडले नसावे!

तर असे हे चविष्ट खाद्यपदार्थ आपल्याला मिळाले की आपली जीभ पावते म्हणजे "प्रसन्न होते!"

ता. क.: इतकी चविष्ट कोशिंबीर, खेळ खेळताना मात्र "आंधळी" का बनते? हे कोडे मला उलगडलेले नाही.

- निमिष सोनार, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच अपचन.>>> नक्कीच!

जाता जाता,
गॅसच्या ज्योतीची आस लागते, >>>> आस नव्हे,आच

तुकोबांच्या अभंगातली ओळ ...भेटीलागी जीवा, लागलीसी आस..तेव्हा मराठीतही आस म्हणजे उत्कट इच्छा होय.

.

रायता म्हणजे दह्यात भाज्या नाहीतर फळे नाहीतर बुंदी वगैरे घालतात ते असा माझा पुनेरी समज आहे. पालखी परत नेते माझी.

पाचक खाल्ले की अपचन दूर होते. पण हाताला बोटे 'पाच'. त्याने 'कळ'फलकावर काहिही बडवले की बहुतेक 'पाचकळ' होत असेल.

खान्देश भागात लोणच्याच्या रस्स्यास रायता म्हणतात.>> नाही हो. मी खान्देश कडचीच आहे, खार म्हणतात.

मला तुमच्या रहस्य कथा आवडतात. हा लेख आवडला नाही.. आवाज मासिका तला भाग वाटला.

रायता म्हणजे दह्यात भाज्या नाहीतर फळे नाहीतर बुंदी वगैरे घालतात ते असा माझा पुनेरी समज आहे. पालखी परत नेते माझी.
अमा थांबा थोडं खान्देशी आर्या तिची पालखी घेवुन येईल मग पालख्यांची गळाभेट घ्या नी मग न्या तुमची पालखी परत. Happy

नाही हो. मी खान्देश कडचीच आहे, खार म्हणतात.
खारं म्हणजे ती चिनीमातीची बरणी किंवा मडकं आणी लोणच्याचा सुका मसाला तेल टाकण्याआधीचा तो पण खार. किंवा पापडखार.

खारं म्हणजे ती चिनीमातीची बरणी किंवा मडकं आणी लोणच्याचा सुका मसाला तेल टाकण्याआधीचा तो पण खार. किंवा पापडखार.>>> पण मग बागेत गेलात की तीईटुकली पिटुकली खार होते. आमच्याकडे खारट काही असलं की आम्ही खार म्हणतो. भाजी खार झालीये...
खारं म्हणजे भरपुर मीठ लावून सुकवलेली मच्छी. बांगडा सुरम ई वैगेरे.
आता अजुनच अपचन.

खारट काही असलं की आम्ही खार म्हणतो. भाजी खार झालीये...>>>हो ,सासरी ऐकला हा शब्द याच अर्थाने.आमच्याकडे खारट असं म्हणतो.

हो