Submitted by mandard on 25 July, 2021 - 13:47
घरातुन सिगरेटचा वास कसा घालवायचा? Split AC service करून घेतला. त्याने थोडा कमी झाला. अजून काही उपाय असल्यास सुचवा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही दिवस लागतील, जाईल आपोआप.
काही दिवस लागतील, जाईल आपोआप.
तो पर्यंत सुगंधित उडबत्ती, वास सहन होत असतील तर एअर फ्रेशनर स्प्रे वापरा.
धूप कापूर सोबत मिंटॉस जाळून
धूप कापूर सोबत मिंटॉस जाळून बघा
तुम्ही जर सिगरेट ओढत असाल तर
तुम्ही जर सिगरेट ओढत असाल तर सिगरेटचा वास कसा घालवायचा यापेक्षा सिगरेट तुमचं आयुष्य वाया घालवते ते कसं थांबवायचं याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही ओढत नसाल तर जो ओढतोय त्याला त्यापासून पराववृत केलं पाहिजे.
घरात कोणी सिगरेट ओढत असेल तर
घरात कोणी सिगरेट ओढत असेल तर त्याला/तिला सांगायचे, घरात ओढली तर चालेल पण श्वास बाहेर सोडू नको.
ज्यांना सिगरेट सोडायची आहे ते
ज्यांना सिगरेट सोडायची आहे ते माझ्याकडे येतात. मग मी त्यांना थेटरात पिक्चर बघायला नेतो. सोबत चार पाच जण नेतो. सुरवातीलाच ती धूम्रपान सेहत के लिये खतरनाक है ऍड आली की मी सोबतच्या चार पाच जणांना इशारा करतो मग ते त्या व्यक्तीचे हात पाय डोळे पकडून जबरदस्ती त्याला ती ऍड बघायला लावतात. त्यातील ती दृश्य पाहून त्या व्यक्तीची सिगरेट ओढायची ईच्छा मरते. सिगरेट सोडण्याच्या या निन्जा टेक्निक चा वापर करून मी अनेकांना आजपर्यंत व्यसनमुक्ती दिले.
बेकिन्ग सोडा चा बोक्स उघडा
बेकिन्ग सोडा चा बोक्स उघडा करुन ठेवा.
कार साठी हि आयडिया मस्त काम करते
ओडर इटर्स म्हणुन इथे
ओडर इटर्स म्हणुन इथे चारकोलच्या बॅगा मिळतात; पाळीव प्राणी, दमट/कुबट वास इ. शोषुन घेण्या/घालवण्याकरता. व्हेरी इफेक्टिव. १-२ बॅगा लटकुन ठेवल्या कि काम फत्ते. भारतातहि मिळत असाव्यात. किंवा दारं, खिडक्या सताड उघड्या टाकुन एसी फक्त फॅनवर चालवा...
सिगरेटचा वास शोशून घेऊन
सिगरेटचा वास शोशून घेऊन नाहीसा करण्यासाठी
अक्वेरियम फिल्टरमधे घालण्यासाठी अॅक्टिव्हेटेड चारकोल नावाची कोळशाची पूड मिळते. ती पूड एखाद्या बशीत / ताटात पसरून घरात लहान मुले / पाळीव प्राणी यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवा.
बेकिंग सोडा सुद्धा असाच बशीत / ताटात घालून ठेवता येईल.
क्रॉस व्हेंटिलेशन होइल अशा पद्धतीने खिडक्या उघड्या ठेवल्या तर मदत होईल.
घरातच स्मोकिंग होत असेल तर चादरी, टॉवेल. पडदे अशा गोष्टी धूऊन, उन्हात वाळवल्या तर त्यातला वास पण जाईल.
वास मास्क करण्यासाठी
थोड्या पाण्यात लिंबाच्या चकत्या उकळून ते पाणी पण सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल
उदबत्ती , कापूर , एअर फ्रेशनर स्प्रे, धूप हे सर्व ( एकत्र नव्हे ) वापरता येईल.
ऍक्टिव्हेटेड चारकोल, बेकिंग
ऍक्टिव्हेटेड चारकोल, बेकिंग सोडा अथवा कॉफी बीन्स ताटलीत ठेवून उघड्यावर ठेवा. शक्यतर ४-५ ठिकाणी ठेवा.
वास घालवण्यापेक्षा खोली सोडा
वास घालवण्यापेक्षा खोली सोडा
I don't smoke. But the
I don't smoke. But the earlier person who use to stay here was smoking. This problem is only in one room of 3 bhk flat. So can't leave flat for that
Anyway thanks for all suggestions.
विम'चे पाणी बरेच
विम'चे पाणी बरेच दुर्गंधीयुक्त पदार्थ नाशक आहे. पण सिगारेट तंबाखूचा वास जातो का माहिती नाही.
विम'मध्ये ट्राइसोडिअम फॉस्फेट असते. म्हणजे तुमच्या देशात मिळणारी वस्तू पाहा.
खोलीत जर सॉफ्ट फर्निशिन्ग
खोलीत जर सॉफ्ट फर्निशिन्ग असेल पडदे व सोफा कुशन्स वगैरे तर त्यात वास अडकून राहतो. ते एकदा चांगले ड्रायक्लीन करून घ्या. जमेल तितकी खोली उघडी टाकून वारे खेळेल असे बघा. वरचे उपाय बरोबरच आहे. गोदरेज एअर व स्ट्रॉन्ग रूम फ्रेशनर वास मास्क करू शकतील.
पण जितका वेळ तो वास जमायला लागला तसाच हळू हळूच वास जाईल. शक्य असल्यास खोलीचा नवा रंग काढून घ्या. म्हणजे नवा रंग व प्रायमर च वास राहील.
लवंग दालचिनी व्हॅनिला मिंट हे सुवास फ्रेश नेस आणतील. इसेन्शिअल ऑइल एका वाटीत घालू न ठेवा कोपर्यात.
वास घालवायला उदबत्ती व मेणबत्ती वापरायची म्हणजे अजूनच हानिकारक रसायने घरातील हवेत भरायची. त्यात खोली बंद असल्यास ती ही साठून असतात.
घरात सोडे तळा... सुकट भाजा..
सिगारेटचा वास घालवण्यासाठी साधा, सोपा, स्वस्त, बिना केमिकल वापरता आरोग्यवर्धक आणि भूकवर्धक उपाय म्हणजे घरात सोडे तळा... सुकट भाजा.. सिगारेटच्या वासाचा एकही अंश नक्कीच शिल्लक रहाणार नाही.
हे कसं? इतर वासांच्या वरचढ
हे कसं? इतर वासांच्या वरचढ झाल्याने ते वास रद्द नाही होत.
पांचजन्य धूप कप च्या बादल्या
पांचजन्य किंवा लोटस धूप कप च्या बादल्या मिळतात.त्या एक दोन दिवस घरात लावा.ज्या कोपऱ्यात लावल्यास वास सगळीकडे पसरेल त्या कोपऱ्यात.अत्यंत ओव्हर पॉवरिंग वास असतो.एक दोन दिवसभर नाकात तोच वास येईल.मग नंतर खिडक्या उघडून सगळे वास हळूहळू जातील.
https://www.flipkart.com/lotus-dhoop/p/itmeh8xgj8ghhkhp
@बोकलत
@बोकलत
सिगरेट सोडण्याच्या या निन्जा टेक्निक चा वापर करून मी अनेकांना आजपर्यंत व्यसनमुक्ती दिले.
---आ रा रा ... म्हणजे तो ७ जणांच्या तिकिटाचा खर्च तुमच्या खिशातून तुम्ही करता?
सिगारेट ओला करून ओढा. धूरच
सिगारेट ओला करून ओढा. धूरच निघणार नाही.
रवातीलाच ती धूम्रपान सेहत के
रवातीलाच ती धूम्रपान सेहत के लिये खतरनाक है ऍड आली की मी सोबतच्या चार पाच जणांना इशारा करतो मग ते त्या व्यक्तीचे हात पाय डोळे पकडून जबरदस्ती त्याला ती ऍड बघायला लावतात. >>>>>
हातपाय ठीके, पण डोळे कसे पकडतात?

हातपाय ठीके, पण डोळे कसे
हातपाय ठीके, पण डोळे कसे पकडतात>>>यासाठी सुशींच्या मंदार कथा वाचायला लागतील,त्यातला प्रिन्स गुंडांचे डोळे पण उघडे ठेवू शकतो
ऍक्टिव्हेटेड चारकोल मागवलं
ऍक्टिव्हेटेड चारकोल मागवलं आहे. खिडक्या उघड्या ठेवून cross ventilation ने बराच कमी आला आहे. धन्यवाद सर्वांना.