चक्रव्यूह (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 23 July, 2021 - 12:45

फोनचा आवाज ऐकून त्याच्या चेहेर्‍यावर त्रासिक भाव आले.

'राजूभाई?'
'क्या है शेलार? निघतच होतो मी पैसे घेऊन.'
'वोईच बतानेको फोन किया मैने. पैसा छोडो और निकलो वहासे'

'पागल हो गया क्या तू? पैसा यहीपे छोड दू? क्यो?'
'भाई, लॉकडाऊन लग गया है. पुलिसकी गाडिया घूम रही शहरमे. अभीके लिये पैसा छोड दो सेठके पास'

'लॉकडाऊन? कितने दिनका?'
'हफ्तेभरका बोला है. पर क्या मालूम'

राजेन्द्र मटकन खालीच बसला. पैसा गया भाडमे! बाहेर पोलिसांनी हटकलं तर काय उत्तर देणार?
पण एक आठवडा ह्या घरात तरी कसं रहाणार?

त्याने मागे वळून पाहिलं.

अर्धवट उघडलेल्या सूटकेसमध्ये नोटांची पुडकी होती...

.....आणि शेजारी खोसलासेठची डेड बॉडी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॉकडाऊनमधे बिनधास्त फिरतात लोक. नुकताच जाहीर झाला असेल तरी माहीत नाही घरीच जातो म्हणता आलेच असते
चक्रव्यूह म्हणता येईल अशी सिच्युएशन वाटली नाही.

लॉकडाऊनऐवजी नोटाबंदीची वेळ दाखवली असती तर.....

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार Happy

हर्पेन, तो खून करायच्या उद्देशाने आला नव्हता. झटापटीत खून झाला. त्यामुळे पैसे घेऊन कोणाच्याही नकळत सटकणं गरजेचं होतं. पोलिसांनी हटकलं तर त्यांच्या लक्षात ह्याचा चेहेरा राहणार ही भीती त्याच्या मनात होती. नंतर नंतर लॉकडाऊनचा अतिरेक झाला तेव्हा लोकांनी बिनधास्त फिरायला सुरुवात केली. पण तसं व्हायच्या आधी शुकशुकाटच असायचा. निदान आमच्या एरियात तरी.

मस्त कथा .. !

पण तसं व्हायच्या आधी शुकशुकाटच असायचा. निदान आमच्या एरियात तरी. >>>> हो मागील वर्षीच्या

हरपेन नामक बिनडोक प्रतिसादांची किव येते, कुठेही लाॅजिक लावत बसतात.
मला आबडली गोष्ट

छान शशक !

पण हर्पेन म्हणतात, त्या प्रमाणे आमच्याकडे देखील संचारबंदी नावापुरती. काहीही फालतू ईमरजन्सी च्या नावाखाली दुनिया फिरून येतात लोक.

लॉकडाऊनऐवजी नोटाबंदीची वेळ दाखवली असती तर..... +१११

छान.
<< लॉकडाऊनऐवजी नोटाबंदीची वेळ दाखवली असती तर..... >>
हे तितकेसे बरोबर वाटत नाही. तो सरळ ५०० च्या नोटा घेऊन गेला असता आणि मग त्या बदलून घेतल्या असत्या.

हर्पेन, तो खून करायच्या उद्देशाने आला नव्हता. झटापटीत खून झाला. त्यामुळे पैसे घेऊन कोणाच्याही नकळत सटकणं गरजेचं होतं. पोलिसांनी हटकलं तर त्यांच्या लक्षात ह्याचा चेहेरा राहणार ही भीती त्याच्या मनात होती. >>

शतशब्दमर्यादे मुळे असावे कदाचित पण हे कथेतून ध्वनित होत नाहीये.
मी आधी म्हटले तसे 'चक्रव्यूह' म्हणता येईल अशी सिच्युएशन वाटली नाही.
पण असो.
लिहित रहा.

आवडली कथा.

<अभीके लिये पैसा छोड दो सेठके पास'> यातून कळलं की मारायचा प्लान नव्हता.

भरत अगदी बरोबर.

हर्पेन, माझ्यामते नोटाबंदीची वेळ दाखवली असती तर त्याने तरीही नोटा नेल्या असत्या....निदान पैश्यांचा काही भाग तरी. ह्या अश्या लोकांकडे पैसे बदलून घ्यायचे मार्ग नेहमीच असतात.

पण खून केल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली . पैसे सोबत नेता येत नाहीत कारण पोलिसांनी झडती घेतली तर तो अडकणार. पैश्याशिवाय बाहेर पडला आणि पोलिसांनी हटकलं तरी त्यांच्या लक्षात ह्याचा चेहेरा रहाणार. खून झालाय हे कळलं की अनोळखी चेहेरा ह्या एरियात दिसला होता हे त्यांना आठवू शकतं. आणि बाहेर पडला नाही तर डेड बॉडीसोबत अनेक दिवस रहावं लागणार.

बाहेर पडायचा सोपा मार्ग नाही म्हणून चक्रव्यूह म्हटलं. तुम्हाला अजूनही पटलं नसेल तर जाने दो. शेवटी एक गोष्टच आहे ही. Happy

प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार.