भास, कुणाला तरी भावलो

Submitted by निशिकांत on 22 July, 2021 - 09:44

उगाच मृगजळ जरा प्यायलो
भास, कुणाला तरी भावलो

एक कटाक्षाने ओझरत्या
स्वप्नांच्या दुनियेत हरवलो

संस्कारांचे टाळत ओझे
हवे नेमके तसाच घडलो

पाप धुवाया नकोच गंगा
पाश्चातापे दग्ध जाहलो

झोतामध्ये कधीच नव्हतो
आड स्वतःच्या स्वतःच दडलो

काळाच्या ओघात पोहणे
जमले नाही, मागे पडलो

नाराजी का कोणावरती?
पडलो, उठलो अन् सावरलो

सुरकुतलेल्या सायंकाळी
आठवणींनी गुलमोहरलो

"निशिकांता"च्या आत्मचरित्री
एकच मिसरा, "सुखात जगलो"

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--पादाकुलक
वृत्त--पादाकुलक--(१६ मात्रा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users