हळद आणि हडळ - ४
पडवीची लाईट लावून ती आत गेली. बाहेर कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज, रातकिड्यांचा किर्रर्र किर्रर्र आवाज येत होता. मध्ये मध्ये दुरूनच रेल्वेच्या हॉर्न चा आणि गाडीच्या येण्याजाण्याचा फटफट खटखट आवाज रात्रीच्या गंभीरतेला वाचा फोडत होता. अमृता बाहेर आली. पडवीची लाईट बंद केली. बाहेरची हवा कानांना घासून जात होती. छातीत धडधड होत होती. तिने आजूबाजूला पाहणे टाळले. पुन्हा जोरजोरात गाणी बोलत मनातल्या मनात देवाचा धावा करत पळतच घरात आली. दरवाज्या बंद केला. अमृताला खूप हायसं वाटलं. ती लाइट बंद करून झोपी गेली.
"लाल फुलांनी बहरलेला गुलमोहर पाहण्यात ती दंग होती. गुलमोहरावर चिमण्यांची चिव चिव ऐकू येत होती. "अमृता, ये ना आत, ये बैस". बंगल्यातून सावलीने हाक दिली.
" हा, आले थांब, इथे किती मस्त फुलांचा सडा पडलाय बघ, मी आलेच" अमृता म्हणाली.
हसत, आनंदातच अमृता बंगल्यात शिरली. बंगल्याच्या भिंती फिकट गुलाबी रंगाने रंगवल्या होत्या. भिंतीवर जुने फोटो लावलेले होते. बहुदा सावलीच्या आजोबा पणजोबांचे असावेत. फोटोच्या खालील बाजूला सोफा, टी पॉय, समोरच्या बाजूला दोन खुर्च्या, खाली सतरंजी अंथरलेली, छताला रेखीव कलाकृती, आणि मधोमध भला मोठा झुमर. मधल्या भिंतीसमोर छानस शो केस, त्यामध्ये टीव्ही. बंगल्यात गेल्यावर अमृता एका वेगळ्याच दुनियेत आले असं तिला वाटू लागलं. तिच्या साधारण घराशी तुलना करता, बंगल्यातील सुविधा, टापटीपपणा उच्च राहणीमानाचं द्योतक होत.
सावली आणि अमृता गप्पा मारू लागल्या. सावलीच्या कानपिचक्यांवर अमृता अधूनमधून जोरजोरात हसायची.
पहाट होत आली होती. अवंती ला जाग आली. ताई झोपेतच हसते हे पाहून तिलाही हसू येत होत. परंतु तरीही तिने अमृताला उठवले नाही. थोड्या वेळाने अवंती पुन्हा झोपी गेली.
अमृता अजूनही गाढ झोपेत, स्वप्नात रमली होती. बोलता बोलता सावली उठली. दरवाज्या बंद केला. अमृता समोर येऊन तिचा हात पकडला आणि क्षणातच अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. सावली विक्षिप्त हसू लागली. अमृताला आत खेचण्याचा प्रयत्न करू लागली. "मी म्हंटलं होत ना, तुला ईथेच यायचंय, आलीस ना? आता चल माझ्याबरोबर "
अमृता किंचाळू लागली. "सोड मला, मला नाही यायचं , सोड" म्हणत हात पाय झटकू लागली.
"तायडे उठ, पुन्हा घाबरलीस का? काय होतंय, तायडे तुला?"
अवंती अमृताला उठवू लागली.
डोळे उघडताच अमृता शांत झाली. आपण पुन्हा भयानक स्वप्न बघितलं. पण स्वप्नातून बाहेर पडताच, स्वप्नात पाहिलेल्या सावलीचा चेहरा ती विसरली. तसही माणसाची स्वप्नांची स्मरणशक्ती तशी कमकुवतच असते. काही लक्ष्यात राहत, काही विसरतो.
आई आणि आजी अमृताच्या खोलीत आल्या. आजीने तिच्या कपाळाला आणि गळ्याला हात लावला. ताप उतरला होता.
"अमृता, काय होतंय तुला, सारखं सारखं घाबरतेस , काय दिसलं स्वप्नात?"
अमृता शांत झाली होती, पणं काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. आईने आजीने कितीही विचारलं तर "काही नाही झालं, स्वप्न होत". एवढंच ती बोलायची.
शेवटी न राहवून अवंती मध्ये बोललीच.
"आजी काल घरी येताना तारासाहेबांच्या बंगल्यासमोर पक्ष्यांचा जोरात किलकिलाट झाला. आम्ही दोघी घाबरून तेथून पळत सुटलो आणि पहाटे तायडी स्वप्नातच हसत पण होती".
अवंतीचे शब्द आजीला निखाऱ्या सारखे झोंबले.
"तुला काल काय झालं होत सांगायला?", आजी चिडून बोलली. आजी आतल्या खोलीत निघून गेली. देवघरातून अंगारा आणून अमृताच्या कपाळावर लावला. पुन्हा एक काळा धागा तिच्या आणि अवंतीच्या मनगटाला बांधला. आजी बडबड करत स्वयंपाक घरात निघून गेली. अमृताची आईसुद्धा तिच्या मागोमाग गेली. "आपल्याला देवभुबाबांकडे जायला हवं, तेच यातून बाहेर काढतील" आजीने आईला सांगितलं.
"आता कुठे तेवढा वेळ आहे आणि अमृताचे बाबा तरी कुठे घरी आहेत? ते गेलेत पत्रिका वाटायला. त्यांना बोलावलं तर पुन्हा पत्रिका वाटायला वेळ उरणार नाही. अमृताला काही झालं नाही, ती फक्त घाबरले." अमृताची आई, आजीला बोलू लागली.
आजीचा काळजीवाहू चेहरा आणखी मावळला. तिचाही नाईलाज होता.
नातीच्या काळजीपोटी ती शांत बसणारी नव्हती. गावातील एका ओळखीच्या इसमाला तिने गावदेवींना नारळ फोडायला पाठवले. ती स्वतःही मारुतीरायाला साकडं घालायला गेली.
अमृता तयार झाली. आज बाहेर जायचा काही बेत नव्हता. तिने मोबाईल काढला. होणाऱ्या नवऱ्याला Message केला "Hi, शुभ सकाळ"
नवरोबाचा उत्तर आला," हॅलो, शुभ सकाळ. थांब फोन करतो"
नवरोबाने फोन केला, पण आवाज स्पष्ट येत नव्हता. Range चा प्रॉब्लेम असावा बहुतेक म्हणून ती मागच्या दारात गेली. अजूनही आवाज स्पष्ट येत नव्हता. पायात सॅंडल घालून अमृता घराच्या मागील शेताकडे चालू लागली. आणि तिच्या मागोमाग एक सावली.
छान. वाचतोय.
छान. वाचतोय.
सावलीचा चेहरा कधी दिसणार
चांगली सुरूए कथा. पुलेशु.
चांगली सुरूए कथा.
पुलेशु.
हाडळीचा आशिक .....दिसेल हो
हाडळीचा आशिक .....दिसेल हो ,किती घाई..

हा भागही छान
छान सुरू आहे कथा...पुभाप्र!
छान सुरू आहे कथा...पुभाप्र!
छान.
छान.
छान
छान
कथेतले हे बाबा तुम्ही स्वतः
कथेतले हे बाबा तुम्ही स्वतः आहात का ? भूत वगैरे उतरवता का ?
@शांत माणूस ...हा हा हा...
@शांत माणूस ...हा हा हा...