आज काही गोड आणि ग्लॅमरस गाण्यांबद्दल बोलू यात म्हणजे टिनेज क्रश विषयावरती बेतलेली अगदी शुगरस्वीट गाणी. म्हणजे भर उन्हाळी दुपारी, रवाळ कलिंगडाच्या थंडगार फोडीसारखी रिफ्रेशिंग, बासुंदीतील सायीच्या लपक्यासारखी जीभेवर विरघळणारी गाणी.
'स्ट्युपिड क्युपिड' हे कॉनी फ्रान्सिसचे गाणेच घ्याना. - स्टुपिड क्युपिड हे गाणे सापडल्यानंतर मी सतत काही दिवस ते ऐकत होते. पण त्याची खुमारी काही कमी होत नव्हती. एका टीनेजर मुलीचे 'क्युपिड' बद्दलचे गोड आणि लटक्या तक्रारीचे गाणे आहे हे. हा क्युपिड कसा आहे तर खोडकर व दुष्ट आहे. याने या मुलीला प्रेमात पाडले आहे. व्हॉट अ शेम करेक्ट!! आणि आपली नायिका म्हणते आहे, मला टार्गेट करण्याच्या गुन्ह्याबद्दल खरे तर तुझे सुंदर पंखच कातरुन टाकायला हवेत ज्यायोगे ना तू उडू शकशील ना परत कोणाला तुझ्या बाणांनी विद्ध करु शकशील.
I can't do my homework and I can't think straight
I meet him every morning 'bout a half past eight (stupid Cupid)
I'm acting like a lovesick fool (stupid Cupid)
You've even got me carrying his books to school (stupid Cupid)
नायिका शाळेत जाताना रोज तिच्या क्रशला (तो ही टीनेजरच) त्याला सकाळी भेटते, आणि त्याला खूष करण्याकरता, स्वत:च्या दप्तराबरोबर, त्या मुलाचे दप्तरही वाहून नेते. शोभतं का या क्युपिडला प्रेमात असे काम करवुन घेंणे रॉबिनहुडगिरी करायची असेल तर ती अन्य कोणाच्या हृदयाबरोबर का नाही करत हा क्युपिड बिचाऱ्या हिचे हृदय परस्पर त्याला देउन टाकतो हे म्हणजे आयजीच्या जीवावरती बायजी उदार झाले की नाही तुम्हीच सांगा.
अजुन एक असेच गोड , टीनेजरी गाणे म्हणजे आय विश आय न्यु व्हॉट ड्रेस टु वेअर या गाण्यातरली नायिका, कोणत्या तरी कार्यक्रमाला जाणार आहे व तिथे तो येणार आहे. भूतकाळात याने कधीतरी तिचा किस घेतलेला आहे व नंतर मैत्रीत दुरावा आला आहे. पण त्याचे लक्ष जावे म्हणुन कोण धडपड. मी कोणता ड्रेस् घालू, काय ॲक्सेसरीज मॅच करु न काय नको. त्याला काय आवडेल. हे म्हणजे ती आरशासमोर १० वेळा कपडे काढ-घाल करते आहे.
What kind of bracelet on my wrist
Which lipstick on these lips he kissed
Which shade of powder would be right?
To hide the tears that I cried each night
जॉनी वेट फॉर मी नायिका व नायक बालपणीचे मित्र आहेत. मित्र म्हणजे काय तर साडेतीन वर्षाची असल्यापासून, ही त्याचे शेपूट आहे. नायक होता ७ वर्षांचा व तो जाईल तिथे, आपल्या नायिकेलाही जायचे असायचे, तो करेल ते करायचे, त्याचेच खेळणे हवे असायचे. आणि त्याला नायिकेचे हे मध्ये मध्ये कडमडणे नको असे. पण आता ती झालीये मोठी आणि ती म्हणतेय मी पटकन मोठे व्हायचा प्रयत्न केला, आणि आता तरी तू माझ्याकडे बघ.
डम डम डीडली डम
आपली टीनेजर नायिका त्याच्या घरी अभ्यासाचे निमित्त काढून गेलेली आहे. आणि त्यांचा अभ्यास चालू आहे (?) वडीलही शेजारच्या खोलीत आहेत, कदाचित टीव्ही पहात असतील, आईची लगबग सुरू आहे. यातून काही चोरटे क्षण नायक-नायिका वेचत आहेत. स्टॉलन किसेस आर द स्वीटेस्ट म्हणतात ते काही खोटे नाही काय!!
Come on baby don't you be so shy
You know that I love you let me tell you why
You got a heart I know that it's true
I couldn't love you any more than I do
पॉल अंकाचे - ओह कॅरॉल ही असेच हार्टब्रेकचे गाणे
शुगर शुगर देखील असेच गोड , टिनेजरी कॉलेजिअन गाणे.
Honey
Ah, sugar, sugar
You are my candy girl
And you got me wanting you
नील सेडाका चे लिटल डेव्हिल
अजुन एक नील सेडाकाचेच - कॅलेन्डर गर्ल नायकाची स्वत:ची खोली आहे आणि ती त्याने बरीच पोस्टर्स लावुन सजवलेली आहे. पैकी कॅलेंडर स्प्रेड भन्नाट आहे आणि त्याची कॅलेन्डर गर्ल विषयीची फॅन्टसी या गाण्यात मस्त मांडली आहे. मजेशीर गाणे आहे.
I light the candles at your sweet sixteen
(October) Romeo and Juliet on Halloween
(November) I'll give thanks that you belong to me
(December) You're the present 'neath my Christmas tree
जिमी क्लॅनटॉन चे- व्हिनस इन ब्लु जीन्स
My Venus in blue jeans
Is everything I hoped she'd be
A teenage goddess from above
And she belongs to me....
तुम्हीदेखील पाहीली असेल कुलुप-किल्ली असलेली डायरी दुकानात मिळते. नायिकेची तशी डायरी आहे. आणि नायकाला ती हवी आहे का तर, त्यात कोण्या मुलाचे नाव ती सारखी लिहीते? आपण तिच्या खिजगणतीत तरी आहोत का? आपले नाव ती बदामात लिहीत असेल का, हे सारे सारे त्याला वाचायचे आहे. डायरी वाचणे म्हणजे तिचे मन वाचण्याचा राजमार्गच नाही का? - द डायरी
When it's late at night what is the name you write?
Oh, what I'd give if I could see
Am I the boy that you care for?
The boy who's in your diary
हॅन्डस अप गिव्ह मी युअर हार्ट -
Angel face, I love your smile
Love your ways, I like your style
What can I do to get closer to you
Don't think twice or count to ten
Don't take advice, don't ask me when
Just come my way
Simply kiss me and say
एकंदरीत हे टीनेज क्रश भलतेच गोड प्रकरण असते याबद्दल दुमत न व्हावे.
आपुन के लिये इट वील ऑलवेज बी
आपुन के लिये इट वील ऑलवेज बी "पेहेला नशा, पेहेला खुमार"..स्वप्नाळू डोळ्यान्ची बाहुली.
आमच्या टिनेज मध्ये एवढी
आमच्या टिनेज मध्ये एवढी इंग्रजी गाणी नव्हती.
छ्या, पूर्वीचं टीनेज आता काही राहिलं नाही.
आमच्यासाठी ब्रायन अडम्स
आमच्यासाठी ब्रायन अडम्स
Wise men say only fools rush
Wise men say only fools rush in
But I can't help falling in love with you
Elvis As Well As UB40
**************
Every night in my dreams
I see you, I feel you
That is how I know you go on
Titanic, Celine Dion
मराठी आणि हिंदी तर अनेक
रिकी मार्टिन
रिकी मार्टिन
Back street boys
ब्रिटनी
एनरिके
Mj
वेंगाबॉयस
आम्ही कालेजात असताना , "words
आम्ही कालेजात असताना , "words" famous होतं.
माझ्या लहानपणीचे ऑल टाइम
माझ्या लहानपणीचे ऑल टाइम फेवरीट "पेहला नाश पेहला खुमार'
आणि आता माझ्या (अनुक्रमे इयत्ता ) ६/९ मधल्या मुलींना K - POP BTS फॅन्स सर्व कोरियन गाणी पाठ त्यात अजून BLACK PINK , STRAY KIDS , J B , ची भर
अगदी टीनेज नाही पण कॉलेजवयीन
अगदी टीनेज नाही पण कॉलेजवयीन दिवसात सोनूचा "दिवाना" अल्बम.... परतपरत रिपीट मोडवर असायचा
कॉलेजवयीन दिवसात सोनूचा
कॉलेजवयीन दिवसात सोनूचा "दिवाना" अल्बम.... परतपरत रिपीट मोडवर असायचा Happy>>>+१
अजूनही ती गाणी रिपीट मोडवर असतात.
लेख नेहमीप्रमाणे छानच..!!
भलताच गोड धागा आहे .... !
भलताच गोड धागा आहे .... !
मस्त वाटली ह्या गाण्यांची ओळख ...देवा मला रोज एक अपघात कर आणि तिच्या हातानीच जखमा ह्या भर टाईप !!!
>>>>देवा मला रोज एक अपघात कर
>>>>देवा मला रोज एक अपघात कर आणि तिच्या हातानीच जखमा ह्या भर टाईप !!!
येस्स!! मला संदीप खरेही फार आवडतो.
>>>>६/९ मधल्या मुलींना K - POP BTS फॅन्स सर्व कोरियन गाणी पाठ
इकडेही त्यांची फार क्रेझ आहे. त्यातले लोक तर मला मुलं आहेत की मुली तेच ओळखु येत नाही.
>>>>>Every night in my dreams
>>>>>Every night in my dreams
I see you, I feel you
निव्वळ स्वर्गिय!
>>>>पेहेला नशा
ते ही फार आवडतं.
@रुपाली - धन्यवाद.
त्यातले लोक तर मला मुलं आहेत
त्यातले लोक तर मला मुलं आहेत की मुली तेच ओळखु येत नाही.
र मला मुलं आहेत की मुली तेच ओळखु येत नाही.
नवीन Submitted by सामो on 22 July, 2021 - 07:4१
असे मी सुद्धा पहिल्यांदा माझ्या मुलींना बोलून दाखवले तर दोघीनी मला एक डेड लुक दिला। पण मीही ऐकली त्यांची गाणी आणि मीही BTS आर्मी (फॅन) बनले। छान आहेत त्यांची गाणी।
Bultaoreune(불타오르는)
j-hope 'Chicken Noodle Soup (feat. Becky G)
Agust D '대취타'
BTS (방탄소년단) BUTTER
BTS (방탄소년단) '작은 것들을 위한 시 (Boy With Luv)
BTS (방탄소년단) 'Permission to Dance'
अजून आहेत बरीचशी मला तर बरी वाटली यामुळे मम्मीला सुद्धा आर्मी बनविल्याचे आनंद आणि गर्व आहे मुलींना ........ हा s हा ss हा sss
आमच्या टिनेज मध्ये एवढी
आमच्या टिनेज मध्ये एवढी इंग्रजी गाणी नव्हती. >>+1
असतील पण आम्ही शाळेत मराठी मिडीयम वाले कोसो दूर होतो इंग्लिश गाण्यांपासून, एकतर नीट ऐकायला यायचं नाही वर अर्थ त्याहून कळायचं नाही .
टीनेज मध्ये शाखा फॅन असल्याने त्याची सगळी गाणी आणि एक अलबम होता, छोटा टेडी बिअर वाला ,
मी सेम तसली टेडी बिअरची की चेन सुद्धा विकत घेतलेली त्यावेळी . स्कुलबस असल्याने तसा उपयोग ही नव्हता कि चेन चा नाही तरी.
वर्णिता + १
वर्णिता + १
असतील पण आम्ही शाळेत मराठी
असतील पण आम्ही शाळेत मराठी मिडीयम वाले कोसो दूर होतो इंग्लिश गाण्यांपासून, एकतर नीट ऐकायला यायचं नाही वर अर्थ त्याहून कळायचं नाही . + १००००००० .
ईन्ग्लिश गाणी ऐकायला कोलेज आणि ऑफिस मध्ये सुरुवात केली .
तो पर्यन्त आम्ही ते हिन्दी अल्बम्स ऐकायचो . त्याकाळी एकदम पेव फुटलं होतं .
हमे महोब्बतसी हो गयी है .. ( जस अरोरा , अब्बास अशी लोक क्रश होते )
मीदेखील अमेरीकेत येईपर्यंत
मीदेखील अमेरीकेत येईपर्यंत इंग्रजी गाणिच ऐकलेली नव्हती.
त्याकाळी एकदम पेव फुटलं होतं
त्याकाळी एकदम पेव फुटलं होतं .
हमे महोब्बतसी हो गयी है .. ( जस अरोरा , अब्बास अशी लोक क्रश होते )>>>> आहाहा स्वस्ति काय मस्त आठवण काढलीत.
आखोंमे तेरा ही चेहरा, के जब भी कही आहट हूए, दिवाना, पिया बसंती, ऑक्सिजन चॅनल वर लागायची ही गाणी. रोजच लावली जायची.
आणि एक अलबम होता, छोटा टेडी
आणि एक अलबम होता, छोटा टेडी बिअर वाला ,
मी सुद्धा ती कीचेन घेतली होती. मीच काय माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे होते ते.
मी सेम तसली टेडी बिअरची की चेन सुद्धा विकत घेतलेली त्यावेळी>>> चुईमुईसी तुम लगती हो
इंडीपॉपचे सोन्याचे दिवस होते
इंडीपॉपचे सोन्याचे दिवस होते ते..... आलिशा चिनॉय, लकी अली, शुभा मुदगल, पलाश सेन, अदनान, सोनू, फाल्गुनी पाठक सगळेच बहरात होते!!
दिवाना तर होताच पण त्याशिवाय तुम याद आये आणि विवा पण खास आवडीचे अल्बम होते
अगदी , i टीव्ही वर लागणारी
अगदी , i टीव्ही वर लागणारी इंडी पॉप क्युट असायची .
पिया बसंती रे ..
आमच्या टीनेजा आधी का कुणास
आमच्या टीनेजा आधी का कुणास ठाऊक पण बोनी एम जुना झाला तरी गाजत होता. किमान ब्राऊन गर्ल इन द रिंग तरी.
किंवा डोरिस डे, 'आय वॉक्ड डाऊन द स्ट्रीट लाईक अ गूड गर्ल शुड' म्हणताना तरी ऐकू यायची. क्वचित कुणी डार्क गॉगल घालुन 'आय जस्ट कॉल्ड टू से..' म्हणताना दिसायचे.
की सेरा सेरा म्हणताना अचानक "याद आ रही है, तेरी याद आ रही है', आणि "मैं आई आई आई आजा" हे आमच्या मोठ्या ताया दादांचे क्रश केव्हा आणि का झाले कळलेच नाही.
कळले तेव्हा शाका खान, मॅडोना, फिल कॉलीन्स, रिक ऍस्टली यांच्या सोबत टीव्हीवर मायकेल जॅक्सन आणि एडी मर्फी बाजी मारून नेऊ लागले होते. तशात ट्रेसी चॅपमनची 'फास्ट कार' आणि टिफनीच्या 'आय थिंक वि आर अलोन नाऊ' ने हंगामा केला.
आणि मग आला QSQT. पापा कहते है, गजब का है दिन एवढे गाजले की माधुरीचे एक दो तीन सुद्धा त्यापुढे फिके पडले होते सुरवातीला.
मग क्रश संपले.
'दिल दिवाना बिन सजना के माने ना'
आणि 'कबुतर जा जा जा' ही बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशनवर पैसे मागण्यासाठी खास तयार केलेली गाणी वाटू लागली.
"परदेसी परदेसी जाना नही" हे गाणे तर चौका चौकात दिसू लागले.
तो पर्यंत टीनेज केव्हाच संपले होते.
>>>>पापा कहते है, गजब का है
>>>>पापा कहते है, गजब का है दिन
आहाहा!!! क्या याद दिलाई मानवजी.
गोरी तेरी आंखे कहे...रातभर
गोरी तेरी आंखे कहे...रातभर सोयी नही- लकी अली चा जादुई आवाज.
दीवाना, फाल्गुनी आणि बरेच बाकिचे
याच्या गालातील खळ्यात हरवले
.
इंटरेस्टिंग! वेळ काढून ऐकणार
इंटरेस्टिंग! वेळ काढून ऐकणार ही गाणी. (कारण एकही माहिती नाहीये.
) कदाचित चाली माहिती असतील पण शब्द नाही.
आमच्या टीन-एजमध्ये सर्वात लाडकं इंग्लिश गाणं - Nothing's gonna change my love for you
आणि बॉलिवूडची छान छान गाणी
RHTDM सगळी गाणी...
RHTDM सगळी गाणी...
हम तुम च खास पावसातले.. सासो
हम तुम च खास पावसातले.. सासो को सासो मे..
कुठलीही रोमॅंटिक गाणी ऐकताना
कुठलीही रोमॅंटिक गाणी ऐकताना मनात मी तेवढीच तरूण असते. फक्त आताच्या काही गाण्यांचे शब्द डोक्यावरून जातात सामो तू सुचविलेली गाणी ऐकीन. ललिताला मम. हे, केअरलेस व्हिस्पर आणि क्लिफ रिचर्डस् ची लव्ह सॉंग अजूनही आवडतात ऐकायला. "व्हेन व गर्ल इन माय आर्म इज द गर्ल "
लेख आवडला हे वेगळं सांगायला नको.
ललीता-प्रीती & धनुडी - गाणी
ललीता-प्रीती & धनुडी - गाणी जरुर ऐकून कळवा. धन्यवाद.
Pages