आठवांचा त्रास आहे

Submitted by निशिकांत on 20 July, 2021 - 10:05

मोगर्‍याला वास आहे
आठवांचा त्रास आहे

पूजिल्याने देव भेटे
अंध हा विश्वास आहे

का उगा गुलमोहरावे?
ऊन का मधुमास आहे?

टाळसी का? मानतो मी
लग्न कारावास आहे

दूध जे पीता तुम्ही तो
वासरांचा घास आहे

"लोक म्हणती काय?" याने
कोंडलेली श्वास आहे

नाळ तुटली सौंगड्यांशी
ऑनलाइन क्लास आहे

मातृभाषा नावडे पण
इंग्रजी फर्मास आहे

शांतता असते टिकाऊ
वादळा! इतिहास आहे

अपयशातच ईश्वराची
नित्य धरली कास आहे

का असा "निशिकांत" तुजला
मृगजळाचा ध्यास आहे?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मनोरमा
लगावली---गालगागा गालगागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमला आहे छोटा बहर!

शांतता असते टिकाऊ
वादळा! इतिहास आहे

मोगर्‍याला वास आहे
आठवांचा त्रास आहे

दूध जे पीता तुम्ही तो
वासरांचा घास आहे

हे तर अगदीच खास