हळद आणि हडळ - ३
अमृता लगबगीने घरी आली. तीच चित्त थाऱ्यावर नव्हतं. अजूनही ती संभ्रमातच होती. तो भास होता कि आणखी काही. खात्रीशीर काहीच नव्हते. हातपाय स्वच्छ धुवून, जेवण उरकून ती आणि अवंती, त्यांनी केलेली एक एक खरेदी आई-आजी आणि घरातल्यांना दाखवू लागले. कपड्यांची Quality आणि रंग बेमिसाल होते. शेवटी पसंती अमृताची होती. सर्वांनाच तिने निवडलेल्या वस्तू आवडत. थोडं आराम करण्यासाठी अमृता खोलीत गेली. बेडवर पडून, कपाळावर हात ठेऊन ती छताकडे पाहू लागली. कामात गुंतल्यावर काही नाही पण एकटी असल्यावर तिला ते विचार सतावत होते. रात्रीचे स्वप्न, तो आवाज, ते शब्द, तो बंगला आणि दुपारी पाहिलेली ती पुसटशी सावली. खात्री नसूनही ती त्या विचारांत गुंतत चालली होती.
संध्याकाळ झाली. अंधुक उजेडातच अमृता घराच्या मागे असलेल्या पडवी मध्ये गेली. हात पाय स्वच्छ धुवून बाहेर आली. मागील दारातून घरात शिरणार तोच तिला काहीतरी आठवले. ती मागे फिरली. पुन्हा पडवीच्या दिशेने गेली. स्वप्नात जिथे पडली होती त्या ठिकाणी निरखून पाहिले, रक्त कुठेही सांडलं नव्हतं. पायाचा अंगठा चाचपला. ठेच कुठे लागली नव्हती. आता तर १०० टक्के खात्रीच झाली, कालच स्वप्न हे फक्त स्वप्नच होत. मनातून थोडी निर्धास्त झाली.
मैत्रिणींना भेटायला जायचंय म्हणून तयारी केली. लग्नाची Batchlor पार्टी तशी हल्ली सर्वत्रच होते.
आजीने अमृताला हटकले," अमृता, या वेळेला कुठे जातेस गं?, तुला सांगितलं ना, संध्याकाळी, रात्री अपरात्री बाहेर जाणं टाळायचं म्हणून"
(एक स्त्री हि आई होण्यापेक्षाही जास्त पटीने आनंदी असते आजी होण्यात. आणि मुलांपेक्षाही जास्त लळा असतो तिचा आपल्या नातवंडांवर)
अमृता आजीला मनवण्यात पटाईत होती. न दुखावता, गोड गोड बोलून तिने आजीला मनवले. आजीने अमृताची द्रिष्ट काढली. डोळे झाकून काहीतरी पुटपुटत हाताच्या मुठीवर हलकेच थुंकली आणि जाऊन चुलीमध्ये निखाऱ्यावर ती मूठ रीती केली.
घाणेरड्या वासाबरोबरच आत फेकलेल्या स्फटिकांनी विचित्र आकार घेतला. आजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"अमृता, नको गं बाहेर जाऊस. बघ किती घाण वास येतोय. द्रिष्ट लागतें गं पोरीं " आजी म्हणाली.
"आजी, नको काळजी करुस. नेहमीच तर जाते ना मैत्रिणींकडे. आज गेलं तर काय झालं? येईन लगेच" अमृता म्हणाली.
अमृता आणि अवंती अमृताच्या मैत्रिणींना भेटायला गेल्या. अनेक जुन्या आठवणी, थट्टा-मस्करी, एकमेकांना चिडवणे आणि वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मैफिलीत रंगल्या होत्या. खिडकीतून वाऱ्याची झुळूक अमृताचे केस हळूच उडवत होते. बाहेर हवा तर साधारणच होती, त्यामुळे अशी थंड हवा लागल्यावर तिच्या अंगावर शहारे येत होते. शॉपिंग, लग्नाची तयारी, बस्ता, पत्रिका, नवऱ्याची नोकरी, परिवार वगैरे सर्वच विषयांवर उडता संवाद साधून मैफिलीची सांगता झाली.
एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. रिक्षातून उतरताना अमृताला थकल्यासारखे जाणवू लागले. अवंतीचा हात हातात धरून अमृता चालू लागली. तारासाहेबांचा बंगला नजीक येताच तिने त्याकडे बघणे टाळले. खाली मान घालून ती चालत राहिली. अचानकच कावळ्यांच्या आणि घुबडांच्या आवाजाने परिसर दुमदुमला. बंगल्याजवळील भोकराच्या झाडावर पक्ष्यांचा किलकिलाट चालू झाला. ईच्छा नसतानाही अमृताने तिकडे पाहिलं. अवंतीही घाबरून अमृताकडे पाहत होती. झाडावरून विचित्र सावली समोर डोकावताना दिसली. अमृताने क्षणातच डोळे घट्ट मिटले. मनात धस्स झालं. तिने अवंतीचे हात घट्ट हातात धरले. पक्ष्यांच्या आवाजाने अवंतीच्याही अंगावर शहरे आले. दोघीही घाबरल्या. एकमेकांना सावरत, दोघी घाईघाईने घरी आल्या.
घरी असं काही सांगितलं तर पुन्हा बाहेर पाठवणार नाहीत. शिवाय अमृता अजूनही साशंक होती. अवंतीने फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकला होता. दोघींनी घरी काही सांगणं टाळलं. रात्री झोपताना अमृता तापाने फणफणली. आजीने मीठ पाण्याची पट्टी कपाळावर ठेवली. रात्रीचे बारा वाजले असतील. सर्वजण झोपी गेलेले. बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अमृताचा ताप कमी झाला होता. तिला पडवीकडे जायचं होत पणं आता तिची हिम्मत होत नव्हती. तिने अवंतीला आवाज दिला. अवंती झोपेतच नको नको म्हणत पुन्हा झोपी गेली. अमृताने मागील दरातील बल्ब चालू केला. बाहेर डोकावून पाहिलं. दोन मिनिटे तिथेच थांबून मनाची तयारी केली. हातात काठी घेऊन ती जमिनीवर आदळत, जोरजोरात गाणी म्हणत अमृता पडवीकडे निघाली.
बरीच धाडसी आहे अमृता. हिच्या
बरीच धाडसी आहे अमृता. हिच्या जागी मी असते तर केव्हाच अॅटॅक येऊन रामनाम सत्य झाले असते माझे.
बघ किती घाण वास येतोय.
बघ किती घाण वास येतोय. द्रिष्ट लागतें गं पोरीं>>>>
मी जे ऐकले होते त्याप्रमाणे दृष्ट लागली तर घाण वास येत नाही म्हणे. ...जाणकार सांगतीलच. ..
बाकी कथा चांगली चालली आहे
हळद लागल्याच्या दुसऱ्या दिवशी
हळद लागल्याच्या दुसऱ्या दिवशी नॉर्मली लग्न असते न....
मग ति दुसऱ्या दिवशी शॉपिंग ला कुठे गेली???
माझ्याकडून कही मिस झालं का वाचायच???
@अनिश्का
@अनिश्का
तुम्ही दुसऱ्या भागाची सुरुवात वाचली नसावी बहुतेक.
अच्छा बघते ठनक्स
अच्छा बघते thanks
अच्छा वाचली सुरुवात 2 र्या
अच्छा वाचली सुरुवात 2 र्या भागाची... म्हणजे हळदी ची रात्र ही तीला स्वप्नात च दिसलेली असते???
स्वप्न बघते ती.
स्वप्न बघते ती.
हा भागही छान जमलाय....
हा भागही छान जमलाय....
Ok got it thanks
Ok got it thanks
वाचतेय. पुभाप्र.
वाचतेय.
पुभाप्र.
हडळ कधी येणार ? पुभाप्र
हडळ कधी येणार ?
पुभाप्र
हा आ
हा आ
छान
छान
आशिक किती आतुर झालाय.
किल्ली, नुसते छान असे लिहु नकोस, पुढे अजून काहीतरी जोड. नाहीतर तू लोकांना ( माझ्यासकट ) ब्लॅककॅट यांचा ड्यु वाटशील.
त्यांना नुसतेच छान अशी लिहायची सवय आहे.
नाहीतर तू लोकांना ( माझ्यासकट
नाहीतर तू लोकांना ( माझ्यासकट ) ब्लॅककॅट यांचा ड्यु वाटशील
ड्यू वगैरे सगळी मोहमाया आहे, रश्मी.
आपण भलं आपलं अक्षर भलं
त्यांना नुसतेच छान अशी
त्यांना नुसतेच छान अशी लिहायची सवय आहे. >>>>
ही बाहुली वापरणं हीसुद्धा काळमाऊ यांची जन्मोजन्मीची सवय आहे. 
ही बाहुली वापरणं हीसुद्धा
ही बाहुली वापरणं हीसुद्धा काळमाऊ यांची जन्मोजन्मीची सवय आहे.>>आणि तुम्हीपण तीच बाहुली वापरली! आपण बोकोबांचा दुसरा अवतार तर नाही ना??