वन वे टिकिट टू स्पिती भाग २

Submitted by मधुवन्ती on 16 July, 2021 - 22:46

day 2-photo.jpg

मुंबई दिल्ली प्रवास गप्पा मारतच पार पडला. दिल्ली ला उतरलो तेव्हा रात्रीचे 11.30 झाले होते, इथे आम्हाला एअरपोर्ट बाहेर भेटणार होता आमचा चौथा साथीदार राजु.
राजु ची गाडी डस्टर पुढचे 8-10 दिवस आमचे वाहन होते.
सामान डिकी मधे ठेवुन जेव्हा गाडी सुरु केली आणि गणपती बाप्पा मोरया! म्हणुन प्रवासाला सुरुवात केली.दररोज बाप्पा ची घोषणा होवुनच मग प्रवासाची सुरुवात होवु लागली.
गाडीने दिल्ली बाहेर पडुन निघालो आणि गाडीचा वेग एकदम कमी करावा लागला.रस्त्याच्या दोन्ही बाजुने किसान आंदोलन कारींचे तंबु,पत्र्याची घरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोदुन ठेवलेला रस्ता. हा आंदोलनकारींनी वेढुन ठेवलेला रस्ता बघताना आपण नुकतेच भारताच्या राजधानीच्या बाहेर पडलोय ह्यावर विश्वास बसेना!
ह्या भयंकर वाईट रस्त्यावर जवळ जवळ तासभर चालवल्यावर अखेर मुरथल नावाच्या ठिकाणी असलेला प्रसिद्ध अम्रिक सुखदेव ढाब्यावर रात्री साधारण 2 वाजता दाखल झालो.हा ढाबा बहुतेक 24 तास चालु असावा.रात्रीच्या 2 वाजता सुद्धा इथे प्रचंड गर्दी होती.इथलं प्रसिद्ध म्हणजे आलु पराठा आणि केसर वाली चाय.इथल्या खाण्याचं जाणवलेलं वैशिष्ठ्य म्हणजे उगाच जळजळीत तिखट नाही त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. पोट भरुन घेतल्यावर परत एकदा आमचा प्रवास सुरु झाला.

पहाटे च्या दरम्यान आम्ही शिमला च्या जवळ येउन पोहोचलो होतो...अर्थात शिमला ला फ़ाटा देउन आम्ही पुढे निघणार होतो...
नारकंडा इथे नेगी धाब्यावर गरम गरम सुप पिउन पुढे मार्गस्थ झालो.
साधारण दोन तासांनी रामपुर मधे पोहोचलो.आमची राह्ण्याची व्यवस्था तिथल्या पी.डब्ल्यु.डी च्या रेस्ट हाउस मधे होती. ब्रिटिशकालीन दिसणारी ही छोटी वास्तु प्रशस्त खोल्या आणि आजुबाजुला बगिचे....
आम्ही अर्थात फ़क्त आरामच केला.जवळ जवळ 15 तासाचं ड्रायविंग झाल्यानंतर हे आवश्यक होतं.

क्रमशः

#onewaytickettopiti

rampur guesthouse.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users